Tuesday, 5 November 2024

 स्पोकन इंग्लिशच्या माझ्या विद्यार्थ्यांनो आज

फ्रेड्रिक्स डग्लस यांचे एक वाक्य आठवले, ते म्हणतात...

Knowledge makes a man unfit to be a slave.

ज्ञान मनुष्याला गुलाम होण्यास अयोग्य बनवते. या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्ञान ही अशी शक्ती आहे जी मनुष्याला त्याच्या स्वातंत्र्याची आणि हक्कांची जाणीव करून देते.अज्ञानाने भय जन्माला येते भीतीमुळे अंधविश्वास जन्म घेतो अंधविश्वासामुळे अंधभक्ती जन्माला येते अंध भक्तीमुळे व्यक्तीचा विवेकशून्य होतो आणि विवेक शून्य झालेली व्यक्ती मानसिक गुलाम होते. ज्ञानामुळे तो गुलामीचे बंधन स्वीकारत नाही, सत्य जाणून घेतो चिकित्सा करायला शिकतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला सत्य आणि न्यायाचा मार्ग सापडतो. गुलामी म्हणजे स्वातंत्र्याची वंचना होणे, पण जेव्हा मनुष्य शिक्षित आणि जागरूक होतो, तेव्हा त्याच्यात आत्मनिर्भरता आणि स्वाभिमान निर्माण होतो. त्यामुळे, ज्ञान माणसाला स्वातंत्र्य आणि सन्मान यासाठी लढण्यास प्रेरित करते, आणि त्याला गुलाम होऊ देत नाही.

माझ्या विद्यार्थ्यांनो इंग्रजीचे वाक्य पाठ करू नका त्याचा अर्थ समजून घ्या कारण एखादी भाषा शिकत असताना त्यासोबतच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणाऱ्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत नाहीतर शिक्षण हे फक्त पुस्तकी आणि परीक्षेत गुण मिळवण्यापुरतेच मर्यादित राहते.











Video Courtesy and thanks to Navbharat Times 

No comments:

Post a Comment