जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी ता. धरणगाव, जि. जळगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रामुख्याने “समावेशक भविष्यासाठी वृद्धांच्या आवाजांना सक्षम बनवणे” हा संदेश अधोरेखित करण्यात आला. शाळेचे शिक्षक श्री. भटू पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना आजी-आजोबांविषयी जिव्हाळा व आपुलकी निर्माण करणारी एक बोधकथा सांगितली. या बोधकथेतून वृद्धांचे अनुभव, ज्ञान व त्यांच्या मार्गदर्शनाचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून देण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रश्नोत्तरांचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे आपल्या आयुष्यातील स्थान, त्यांच्याशी असलेले नाते व त्यांच्यावरील कृतज्ञता अधिक दृढ केली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील ज्येष्ठ शिक्षिका वंदना ताई पाटील श्री विश्वास पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेश शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती छायाताई घुगे यांनी केले
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच एकंदरीत शाळेचा महत्त्वाचा वाटा राहील यावर भर देण्यात आला. यासाठी शाळा स्तरावर देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वृद्धांबद्दल सन्मान, आपुलकी व कृतज्ञतेच्या भावना वृद्धिंगत झाल्या. अशा प्रकारे शाळेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन शैक्षणिक व मूल्याधिष्ठित वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
No comments:
Post a Comment