दर कोसाला वेगवेगळ्या भाषा आणि लेहजांनी समृद्ध असलेल्या मराठी मुलुखात महाराष्ट्राच्या लोकधारेच्या लोकगीतांची,पारंपारिक वाद्यांची ओळख नवीन पिढीतील तरुण The Folk आख्यानाच्या माध्यमातून करत आहेत. हल्ली नवीन पिढीवर सातत्याने टीका होताना आपण पाहतो परंतु नवीन पिढीत प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहेत जुन्या पिढ्यांसह सर्वच पिढ्यांनी मात्र स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे आणणारा दैदिप्यमान इतिहास फुले,शाहू,आंबेडकर यांच्या
प्रबोधनातून हस्तांतरित करत राहावा. हेे सर्व होत असताना सर्व वयोगटाच्या मराठी माणसांना जोडणारा आपल्या सर्वांच्या हृदयातील महत्त्वाचा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं स्पंदन आणि रुबाब.
The Folk आख्यानाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच हे अनुभवलच पाहिजे. विशेषतः हा कार्यक्रम लहान मुलांना दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.मराठी लोकसंगीताची श्रीमंती अधोरेखित करणारं मराठी मातेचं आणि मातीचं आख्यान नक्की बघाव सतत बघत राहावं असंच आहे.
अंगावर शहारे आणणाऱ्या, रक्तात सळसळ निर्माण करणाऱ्या ,बेधुंद मनाच्या लहरींवर स्वार करणाऱ्या एकूणच निसर्गानं मानवाला दिलेल्या सर्व भावभावनांच्या क्षणांचे वाटेकरी होण्यासाठी The Folk आख्यान अगदी समर्पक आहे.
यातील सर्व गाणी, आणि अख्यानाच लेखन, सूत्रसंचालन युवा लेखक ईश्वर अंधारे (लमाणबंधू) यांनी लिहिलेली असून कंपोझिंग, संगीत आहे राऊत आणि विजय कापसे यांचं मुळात आख्यानाची ही संकल्पनाच हर्ष आणि विजय यांची आहे. तरुणांच्या या टीमनं स्वतःच अस्सल, युनिक अस केल अफाट आख्यान मांडलं आहे. कुठेही पूर्वी कोणी दुसऱ्याने गायलेल, संगीतबद्ध केलेल गाणं नाही सगळं काही अगदी Self Made. आख्यानाला ८० पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून संगीताचा साज शृंगार उपस्थिथितांना बेफाम होऊन ठेका धरायला लावतो.विशेष बाब म्हणजे या सर्व कलााावंत तरुणांचं वय कमी आहे सरासरी फक्त २५ असेल, या स्टेजवर जरी २५ कलावंत दिसत असले तरी बॅकस्टेजचे सहकारी मिळून एकूण ४० तरुण कलावंत आहेत. यांचा प्रत्येकच शो हा घोषित झाल्यावर लगेचच हाउसफुल होतो.
आपली लोककला किती समृद्ध आणि प्रचंड उत्साह, उमेद देणारी ऊर्जा आहे हे अनुभवण्यास मिळेल. या कार्यक्रमाचे गारुड आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील असा काहीसा अनुभव घेऊया.The Folk आख्यानाच्या उत्साहित तरुणांना साद घालूया ही साद केवळ तरुणांना नाही तर महाराष्ट्राच्या लोकधारीलाच असेल.
पुण्यात पुस्तक महोत्सवात The Folk Akhyan च्या टीमने विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केले. या टीमचा युवा शाहीर चंद्रकांत माने यांच्या सुमधुर आवाजात गायलेले प्रेरणादायी गीत "शिवबा राजं छत्रपती झालं ग" तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतं. या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच आणि त्यागाच उत्तम वर्णन आहे. चला तर मग तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय म्हणत स्फूर्तीदायी गीत (घाटोळी) ऐकूया !
✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव.
🙏Special Thanks Amazing Memories
Fergusson College Pune.🙏
And factsforindia
घाटोळी लोकगीताचा महाविद्यालयीन तरुणाईस सोबतचा पूर्ण व्हिडिओ पहा दोन्ही चॅनेल सबस्क्राईब करा. 👇
खूपच सुंदर... नवीन पिढीला आशा संस्कारातून वाढवलं तर...सध्याच्या वाकड्या वाटांवर ती वळणारच नाही...🤗👏👍
ReplyDelete