आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी शाळेत क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती बालिका दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बालिका दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वाचन उपक्रम राबविण्यात आला. बालिका दिवसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची विशेष संगीतमय कवायत घेण्यात आली. या कवायतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढीस लागला.
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य, स्त्री शिक्षणाचे महत्त्व व बालिकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच माता-पालकांसाठी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेतून माता-पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य, संस्कार व पालकांची जबाबदारी याविषयी सखोल माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष सौ. सोनी ज्ञानेश्वर भोई तसेच माता-पालक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी प्रभावीपणे केले. सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या व माता-पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीपणे पार पडले.

No comments:
Post a Comment