Monday, 27 February 2023

'म'मराठीचा...

मराठी चित्रपटात कधीही नायक हा अहिराणी बोलीतील दाखवला नाही. भाषादेखील प्रमाण मराठी भाषाच वापरली किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बोली, वऱ्हाडी भाषेतील नायक किंवा नायिका आपल्याला पाहायला मिळाले नाही.
मराठीच्याच बहिणी असणाऱ्या बोलीभाषांना मात्र चित्रपट,नाटकांमधून पाहिजे तो न्याय मिळाला नाहीच. ग्रामीण बोलीभाषांना Vernacular Accent असे न हिणवता  खऱ्या अर्थान Vernacular Accent चा योग्य सन्मान केला गेला पाहिजे कारण प्रमाण भाषेला आदर्श ठेवून बोली भाषेच्या उच्चारांना आपण अशुद्ध कसं म्हणू शकतो ? मग बोली भाषेच्या दृष्टीने देखील शहरीकरण झालेली प्रमाण मराठी भाषेतील शब्दही अशुद्ध असू शकतील. त्यामुळे प्रमाण भाषेने बोलीभाषेवर न्यूनगंड लादता कामा नये. असं श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व लादणं हे जात आणि वर्ण व्यवस्था लाागण्यासारखं तर नाही ना..? याचाही विचार व्हावा.
मराठी भाषेला अभिजात भाषेसाठी प्रयत्न होत असताना मराठी भाषेच्याच बहिणी असणाऱ्या बोलीभाषांना आपुलकी भावनेने पाहणे महत्त्वाचे आहे. आपला प्रयत्न हा मराठी मुलाखातील डोंगर दर्या खोरे वने आणि समुद्रांच्याही पलीकडे जगभरात पसरलेल्या अशा मायबोली  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न आहे की एक-दोन शहरांच्या मर्यादित प्रमाण मराठी भाषेसाठी असाही प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो.

सैराट चित्रपटाच्या यशामागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे चित्रपटातील भाषा.सैराट चित्रपट हा बोली भाषेचाही एक प्रकारचा बॅकलॉक होता तसा बॅकलॉग एका चित्रपटाने भरून निघणार नाहीच.

 मुंबई-पुण्यातील प्रमाण मराठी भाषेच्या जवळच्या असणार्‍या भाषाखेरीज इतर प्रमुख बोलीभाषांना कधीही मराठी चित्रपट सृष्टीत स्थान देण्यात आले नाही. आपल्या  देशात एक सर्वात जुनी असणारी एक भाषा जेव्हा फक्त एका विशिष्ट वर्गाला (जातीला) शिकण्याचा अधिकार असतो त्या वेळेला ती भाषा आणि त्याच्याशी संबंधित सांस्कृतिक घटकांचं संक्रमण थांबण्याचा धोका देखील असतो. स्वतःची भाषा संकुचित ठेवणाऱ्या संस्कृतीचा इतिहास कितीही दैदिप्यमान सांगितला गेला तरी त्याचं वर्तमान आणि भविष्य समाजातील सर्व घटकांना सोबत घेतल्याशिवाय वैभवशाली होऊ शकत नाही हे आपण समजून घेणे महत्वाचे आहे. 

इंग्रजांनी कधीही इंग्रजी आपल्या पुरता मर्यादित न ठेवता त्या भाषेतून व्यवहार करणे, ज्ञान देणे जगभरात सुरू ठेवलं इतर भाषेतील शब्दांना देखील आपलंसं केलं त्यातून आपल्या इंग्रजी भाषेतील शब्द भरणा वाढवला म्हणून आज आंतरराष्ट्रीय भाषा असणारी इंग्रजी जगातील एक महत्वाची भाषा बनली आहे.-✍️ shaileshshirsath.blogspot

 मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या मिलन चित्रपटातील या गाण्याचा आनंद घ्या Thanks to Supergane YouTube Channel

Monday, 13 February 2023

विद्यार्थ्यांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचं काय ?

शेगावीचे गजानन महाराज यांच्या बाबतीत मनात अपार निष्ठा आणि श्रद्धा असणारे विद्यार्थी आणि इतर भक्त लोकही शाळा महाविद्यालयात आहेत परंतु शाळेत जेव्हा तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घ्यावा लागला त्यावेळेला त्यांचा गोंधळ उडाला. शेगावीचे गजानन महाराज हे चिलीम ओढतांनाची मनमोहक प्रतिमा त्यांनी लहानपणापासून पाहिली आहे शाळेत आल्यावर तंबाखूमुक्त शाळा अभियानात मात्र तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना शिकायला, समजून घ्यायला मिळाले. 

 शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनासह धुम्रपानाचे दुष्परिणाम समजून घ्यावे की,आपल्या समाजाची, पालकांची आई-वडिलांची अपार श्रद्धा असणाऱ्या चिलीम ओढणाऱ्या गजानन महाराजांचा आदर्श घ्यावा या संदर्भात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला कारण शाळेतील सुविचारांचा फळा गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छाही देतो आणि धूम्रपानमुक्त जीवनाचा संकल्पही...

माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून..✍️ shaileshshirsath.blogspot.com