Sunday, 19 November 2023

आपण हरलो पण काय शिकलो ?

प्रिय नातवांनो आज आपण विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला.खेळात हरलात तर हरकत नाही पण थोतांड असणाऱ्या अवैज्ञानिक भाकितांवर आणि अंधश्रद्धेवर मात्र विश्वास ठेवू नका.हरण्याच्या निमित्ताने आपण एवढे जरी शिकलो तरी पुरे आहे विज्ञान नसणाऱ्या अवैज्ञानिक खोटे भविष्य सांगणार्‍यांवर अति विश्वास ठेवू नका.विश्वगुरू असणारा आपला भारतच अंतिम सामना जिंकेल असं नामवंत म्हणवणारे ज्योतिषी भारतीय संघाची आणि खेळाडूंच्या कुंडल्या काढून दावे करत होते आज ते सर्व दावे आणि त्यांनी मांडलेल्या कुंडलीच्या माध्यमातून त्यांचे भविष्य भाकीत देखील खोटं ठरल आहे म्हणून आपला भारतीय संघ हरला तर हरकत नाही या निमित्ताने भारतीयांना हे कळेल की अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही ज्यामुळे अंधश्रद्धा वाढते.



 


No comments:

Post a Comment