त्या निरागस मुलींसाठी
आपण बांधायला हवे होते सेतू,
सुंदर जगाकडे जाण्यासाठी....
आपण दाखवायला हवी होती सुंदर वाट,
मानवतेकडे घेऊन जाणारी....
आपण द्यायला हवा होता एक परिवेश,
जीवनाच्या सौंदर्यावरचा विश्वास वाढवणारा....
आपण त्यांना द्यायला हवं होतं असं वातावरण,
ज्यात त्यांना वाटली असती सुरक्षितता,प्रेमाची ऊब व विश्वास....
आपण त्यांना काय दिलं????
अकाली मरण,
हिंसक रानटी विश्वाचा परिचय,
बेजबाबदार,अहंकारी,निर्लज्ज वागण्याचं उन्मत्त प्रदर्शन,
आपण 'माणसं' म्हणून अपात्र असल्याच्या साक्षी...
आम्ही आमच्याच पिल्लांना निर्लज्जपणे चिरडून टाकू हा युद्धमाज....
आणि या लेकरांना आपण हे पण दाखवून दिलंय की, या विश्वात तुम्ही किती अदखलपात्र व गौण आहात.
अखिल मानवी विश्वाला प्रेम,करुणा व शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या ख्रिस्त व पैगंबराच्या नावाने आम्ही मनुष्यसंहार करणार,रक्ताचे पाट वाहवणार.
वरून त्यांच्यासाठी,त्यांच्या भूमीसाठी,त्यांच्या राज्यासाठी व त्यांच्या आज्ञार्थ हे करतोय असं सांगत करणार बीभत्स प्रदर्शन दांभिकपणा व ढोंगीपणाचं!
निसर्गाने आपल्याला डुकरं म्हणून जन्माला घातलं असतं तर इतका अनर्थ झाला नसता!
#लेकरांनो आम्हाला माफ करा.
- मंगेश नंदा काशिनाथ

No comments:
Post a Comment