नदीत दुधाचा टँकर अर्पण: डोळस श्रद्धा, पर्यावरण रक्षण आणि पोषण यांचा समतोल गरजेचा नाही का?
अलीकडे नर्मदा नदी मध्ये धार्मिक कर्मकांडाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात दुधाचा टँकर अर्पण केल्याची घटना चर्चेत आली. जर सदर बाब खरी असेल तर श्रद्धा आणि परंपरा या भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असल्या तरी, अशा कृतींचे सामाजिक, पर्यावरणीय आणि नैतिक परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे.
धार्मिक श्रद्धा की संसाधनांची नासाडी ?
भारतात नदीपूजनाची परंपरा प्राचीन आहे. अनेक ठिकाणी दूध, फुले, नारळ इत्यादी अर्पण केले जाते.परंतु आजच्या परिस्थितीत मानवतावादी आणि विवेकी दृष्टिकोनातून विचार केल्यास असा प्रश्न उभा राहतो की,जे दूध हजारो मुलांच्या पोषणासाठी उपयोगी ठरू शकते, ते नदीत ओतणे योग्य आहे का? अजूनही लाखो मुले कुपोषणाला सामोरे जात आहेत. २०२५ च्या आकडेवारीनुसार ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये आपल्या भारताचा क्रमांक १२३ देशांमध्ये १०२ क्रमांकावर आहे भारताचा क्रमांक अनेक दक्षिण आशियाई देशांपेक्षा मागे आहे.बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.अनेक कुटुंबांना दररोज पुरेसा आहार मिळत नाही यामुळे धार्मिकतेच्या नावाखाली नदीला दूध अर्पण करण्यासारख्या कृती आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये संतुलन आवश्यक आहे.नदीत दूध टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढू शकते यामुळे
जलचर जीवांना हानी पोहोचण्याचा धोका निर्माण होतो याखेरीस पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावतेम्हणजेच, श्रद्धेच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहोचते.आपल्या देशात बालकांमधील कुपोषणाची समस्या मोठी आहे अशा परिस्थितीत दूधासारख्या पौष्टिक अन्नाचा अपव्यय करणे अधिकच गंभीर ठरते.
नैतिक आणि सामाजिक प्रश्न
ही घटना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करते:
• श्रद्धेच्या नावाने होणारी अंधश्रद्धा महत्त्वाची की मानवकल्याण?
• अन्नाचा अपव्यय करून देव संतुष्ट कसे होतील ?
• समाजातील दुर्बल घटकांची जबाबदारी कोणाची?
• खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे मानवसेवा आणि समाजकल्याण नाही का?
धार्मिक श्रद्धा जपत पुढील उपाय अवलंबता येऊ शकतात:
• दूध नदीत टाकण्याऐवजी गरजू मुलांना वाटप करणे.
• अनाथालय, शाळा, आश्रम येथे अन्नदान करणे
• पर्यावरणपूरक पूजा पद्धती अवलंबणे
• समाजात जागरूकता निर्माण करणे
• एखादी धार्मिक विधी करत असतांना पर्यावरण संवर्धनाचा कृतीयुक्त संकल्प आवश्यक असला पाहिजे उदाहरणार्थ आपल्या पूर्वजांच्या श्राद्धाच्या दरवर्षीच्या कार्यक्रमासाठी नवीन वृक्ष लावणे आणि जुन्या वृक्षांचे संगोपन करणे.
यामुळे श्रद्धाही जपली जाईल आणि समाजालाही फायदा होईल.
नदीत दुधाचा टँकर अर्पण करणे ही भावना आणि श्रद्धेची अभिव्यक्ती असली तरी, आजच्या काळात ती पर्यावरण आणि समाजाच्या दृष्टीने योग्य नाही.
भारतासारख्या देशात, जिथे अजूनही कुपोषण मोठी समस्या आहे, तिथे अन्नाचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.धर्म म्हणजे केवळ विधी नाही, तर मानवतेची सेवा आहे" — ही जाणीव समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.
माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...
- शैलेशकमल किसन शिरसाठ.
Courtesy Lokmat Hindi
ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index – GHI) हा जगातील भूक आणि कुपोषणाची स्थिती मोजणारा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. हा अहवाल दरवर्षी Concern Worldwide आणि Welthungerhilfe या संस्थांकडून प्रसिद्ध केला जातो.
globalhungerindex.org
हा निर्देशांक एखाद्या देशातील भूक, कुपोषण आणि आरोग्याच्या स्थितीचे व्यापक चित्र देतो.
भारताची सध्याची स्थिती (2024 व 2025)
2024 मध्ये भारताचा क्रमांक: 127 देशांपैकी 105 वा
GHI स्कोअर: 27.3 (गंभीर स्थिती)
2025 मध्ये भारताचा क्रमांक: 123 देशांपैकी 102 वा
GHI स्कोअर: 25.8 (गंभीर स्थिती)
https://www.facebook.com/share/r/1DuSvMzbyQ/
No comments:
Post a Comment