Sunday, 11 September 2016
Saturday, 3 September 2016
बाप्पास पत्र
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याबाबत..
✍बाप्पा तुम्ही आमच्या सोबत कायमच आहात तुमच्या आगमनाची तयारी असं न म्हणता. मी असं म्हणेल सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे आणि या गणेशोत्सवात आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला ' अजून वेगळे आणि अजून चांगलं ' कसं देता येईल यासाठी आमचीही तयारी सुरू आहेच. आपल्या देशाच्या नव्या पिढीत, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा,आपल्या उज्ज्वल भारतीय परंपरेची ओळख व्हावी
या व्यापक आणि सकारात्मक उद्देशाने एका नवीन सहशालेय उपक्रमास सुरुवात केली आहे...
।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।।
बाप्पा आता आजचं उदाहरण बघ ना.आजआणि काल आमावस्येला रस्त्यांवर वाहनांना दृष्ट लागू नये आणि वाहनांचे रक्षण व्हावे म्हणून लावलेले मिरची लिंबू बऱ्याच ठिकाणी खाली पडले होते.मिरची लिंबू फार पूर्वी जंगलातून प्रवास करताना फर्स्ट एड बॉक्स सारखी वापरलं जायचं, परंतु आता त्याची गरज नाही आणि लिंबू मिरचीचा खरा उपयोग जाणून न घेता त्याचा विपर्यास आपण केला.बाप्पा विज्ञानानं आम्हाला हे शिकवलं लिंबू म्हणजे सायट्रिक ऍसिड.लिंबात *'क' जीवनसत्व* असतं क जीवनसत्व आपल्या पोषणास अत्यंत उपयोगी असं जीवनसत्व आहे,जगभरात कुठल्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात क जीवनसत्वयुक्त फळं देणारी मृदा नाही हे जसं सत्य आहे तस जगभरात कुपोषण असणाऱ्या देशांच्या यादीत आपला देश सुद्धा आहे, हेही नाकारून चालणार नाही. *बाप्पा केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे पोषणास उपयुक्त असे 'क' जीवनसत्व असलेले लाखो लिंबू आपण अक्षरशः वाया घालवतो.हे क जीवनसत्व अस वाया न जाता आपल्या देशातील कुपोषित मुलांना मिळावं अशी सद्बुद्धी आम्हाला मिळो.🙏🙏
आपली भारतीय राज्यघटना आपल्याकडून खालील अपेक्षा व्यक्त करते त्या अशा 👇
'It is duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and unionism'. म्हणजे👉
*' वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.आपण सर्वांनीच
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे.✍
बाप्पा *आपला देश,आपली संस्कृती ही खूप मोठी आहे,महान आहे. या आपल्या मातृभूमीनेच जगाला शून्याचा शोध लावणाऱ्या आणि पृथ्वीच्या खगोलीय रचनेचा अभ्यास करणाऱ्या आर्यभटांसारखा महान गणिती आणि खगोल शास्त्रज्ञ दिले आहेत.दुर्दैवाने आपल्यालाच आपल्या महान शास्त्रज्ञांचा आणि संस्कृतीचाही विसर पडलाय..
जगाला आपल्या महान संस्कृतीत जन्माला आलेल्या महान सुपुत्रांची ओळख व्हावी आणि आपल्याच देशातील विद्यार्थ्यांच्या रूपाने येणाऱ्या पिढ्यांना विज्ञान अभ्यासकांची माहिती असावी असे वाटते.प्रत्येक भारतीय नागरिकाने शोधकबुद्धी, वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद याचा विचार अंगीकारल्यास आर्यभट्ट
महर्षी कणाद,महर्षी सुश्रुत,भास्कराचार्य,बोधायन,डॉ. सी. व्ही. रमण,जगदीश चंद्र बोस,श्रीनिवास रामानुजन,डॉ. होमी भाभा,हरगोविंद खुराणा,सत्येंद्रनाथ बोस,विक्रम साराभाई,वेंकटरामन,रामकृष्णन,जानकी अम्मल,बी. विजयलक्ष्मी, डॉ.एपीजे अब्दुल कलाम,डॉ. जयंत नारळीकर,डॉ. विजय भटकर या सारखे महान भारतीय घडतील यात शंका नाहीच.. (क्रमशः)
तुझाच
शैलेश शिरसाठ.
विज्ञान उपक्रम ।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।।
Thursday, 1 September 2016
Tuesday, 30 August 2016
Sunday, 21 August 2016
Dear Brothers and Sisters,
Wednesday, 1 June 2016
इंग्रजी विषय नव्हे भाषा रुजवतांना..
इंग्रजी विषय नव्हे भाषा रुजवतांना..
ज्या देशात इंग्रजी ही दुसरी किंवा तिसरी भाषा आहे, त्या देशात इंग्रजी फक्त विषय म्हणून न शिकवता ती एक भाषा म्हणून शिकवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गात इंग्रजीतून संभाषण करणे व सूचनांच्या माध्यमातून बोलणे फार आवश्यक ठरते.
शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना इंग्रजीत सूचना देतात – जसे की “Open your books,” (तुमची पुस्तके उघडा), “Work in pairs,” (जोडीने काम करा), किंवा “Listen carefully and repeat after me” (काळजीपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ म्हणा) – तेव्हा विद्यार्थी भाषेचा अर्थ व वापर प्रत्यक्षात समजू लागतात. त्यामुळे इंग्रजी ही फक्त व्याकरण व पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाशी जोडलेली भाषा बनते.
उदाहरणार्थ:
"उभे रहा" सोबतच '"Stand up, please"असं सांगू शकतात.
गट क्रियाकलापांदरम्यान शिक्षक प्रोत्साहन देऊ शकतात, "शाब्बास,Good job! किंवा “Try again.”
अशा सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा ऐकण्याचा व बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना इंग्रजी ही केवळ परीक्षेसाठी लिहायची भाषा नसून प्रत्यक्ष संभाषणासाठी वापरायची भाषा आहे, हे जाणवते.
म्हणूनच शिक्षकांनी इंग्रजीतून दिलेली बोलकी संवाद व सूचना ही नैसर्गिक भाषिक वातावरण निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात.यामुळे इंग्रजी शिकणे हे रटाळ न वाटता रंजक, अर्थपूर्ण व उपयोगी अनुभव बनते.
Download Classroom Instructions.(दैनंदिन अध्यापनात इंग्रजीत सूचना)👇
https://drive.google.com/file/d/1JX_HF0XupGMyWSycvSdE54bkGlOi5mh_/view?usp=drivesdk
In countries where English is a second or third language, it is very important to teach English not just as a subject but as a language. For this, teachers need to communicate in English in the classroom and give instructions in English.
When teachers give students instructions in English – such as “Open your books,” “Work in pairs,” or “Listen carefully and repeat after me” – students begin to understand the meaning and usage of the language in real situations. As a result, English is no longer limited to grammar and textbooks but becomes connected to daily life.
For example:
Along with saying "उभे रहा" (Stand up), teachers can say "Stand up, please."
During group activities, teachers can encourage students by saying, “शाब्बास, Good job!” or “Try again.”
This continuous use builds students’ confidence in listening and speaking. They realize that English is not just a language for writing exams but also a language for real communication.
Therefore, teachers’ spoken communication and instructions in English play a crucial role in creating a natural language environment. This makes learning English not boring, but rather an interesting, meaningful, and practical experience.✍️
Shailesh Shirsath.(Subject Assistant )
District Institute of Education and Training, Jalgaon.
English Language Ambassador, Jalgaon.




