Sunday, 1 January 2017

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा... आणि काही प्रश्न.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संगीत,क्रीडा,सृजनशीलता, नेतृत्व,वक्तृत्व,चित्रकला यासह इतर क्षेत्रातील सर्वांगिन गुण आणि कौशल्यावर आधारित नवोदय प्रवेश परीक्षा आहे काय? की,केवळ विद्यार्थ्यांचा स्मरणशक्तीवर आधारित प्रवेश परीक्षा आहे? अर्थात ज्याची स्मरणशक्ती चांगली तोच हुशार आणि पात्र नवोदय विद्यालयातील शिक्षणासाठी... या प्रक्रियेतून जो केवळ अभ्यासात हुशार त्यालाच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार. आपण आपल्या शाळांमध्ये हुशार विद्यार्थ्यांना निवडून नवोदय विद्यालयांना देणार,मुळातच हुशार असलेल्या विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षण व्यवस्था काम करणार. अर्थात नवोदय विद्यालयातील हुशार शिक्षकांचा या प्रवेश परीक्षेत असलेल्या अपात्र ठरलेल्या साधारण विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. त्यांच्यासाठी आपण आहोत, या परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याच कठीण आणि कौशल्याचं काम आपल्या साऱ्या बांधवांना करायच आहे. नवोदय विद्यालयात प्रवेश का मिळवायचा? शालेय शिक्षणात यामुळे एक वर्गवारी होत नाही ना याचाही चिकित्सकपणे विचार करावा लागेल. शिक्षणात भेद नसावा किमान शालेय शिक्षण तरी संपूर्ण देशात एकाच दर्जाचं मिळायला पाहिजे. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला तर अधिक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल असं म्हटलं जातं मग याचा दुसरा अर्थ असा आहे की नवोदय सोडून इतर विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा चांगला नाही हे आपण प्रत्यक्षरित्या मान्य करत आहोत. नवोदय विद्यालयात इतर विद्यालया पेक्षा जास्त सोयी सुविधा मिळतात आपण प्रत्यक्षरित्या मान्य करीत आहोत. जे शिक्षणाच्या सर्वांगिन आणि एक समान शिक्षणाच्या धोरणाच्या तत्त्वांशी विसंगत आहे. नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या मुलांना अधिक संधी आहे , आणि इतर विद्यार्थ्यांना संधी नाहीत असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे शिकवण्याच्या दोन संस्थांमध्ये सुविधांचा मोठा फरक असून तो आपण अशा परीक्षांच्या माध्यमातून मान्य करत आहोत. अर्थात तो फरक आहे कारण नवोदय विद्यालयातील शिक्षकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामे नाहीत त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे तुलनेने कमी हुशार आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या यांना अधिक शैक्षणिक काम दिले गेल्यास हरकत नाही.. हे सारच विरोधाभास निर्माण करणारे आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल पात्र किंवा अपात्र असा येणार.. याचा दुसरा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आपण पास करत आहोत ते विद्यार्थ्यांना मात्र नवोदय प्रवेश परीक्षा अपात्र ठरवणार. शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धापरीक्षा असू शकतात परंतु शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे कारण आपण कितीही म्हटलं तरीस्पर्धा म्हटली कि . मुळातच शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच Basically, schooling is a system for finding all the special qualities that a student has, schooling is a not a system which assess or qualify learners only on the basis of intellectual memory. .आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो. शेवटी एवढच विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन शिक्षका पेक्षाही सुलभकाचे नव्हे मित्राचं काम करायचे आहेे... शैलेश शिरसाठ,जळगाव.

Wednesday, 30 November 2016

Sunday, 16 October 2016


https://drive.google.com/file/d/0B_pe4WXDbUd6by1nSU1oN0tmRFE/view?usp=sharing
https://docs.google.com/document/d/1NHNGidVO7LpRT8v5528jB1rnFoEvCzhv_n9URG2_YcA/edit

Saturday, 3 September 2016

बाप्पास पत्र

महत्त्वाचं पत्र.👇
          विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याबाबत..
✍बाप्पा तुम्ही आमच्या सोबत कायमच आहात तुमच्या आगमनाची तयारी असं न म्हणता. मी असं म्हणेल सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे आणि या गणेशोत्सवात आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला  ' अजून वेगळे आणि अजून चांगलं ' कसं देता येईल यासाठी आमचीही तयारी सुरू आहेच. आपल्या देशाच्या नव्या पिढीत, विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा,आपल्या उज्ज्वल भारतीय परंपरेची ओळख व्हावी
या व्यापक आणि सकारात्मक उद्देशाने एका नवीन सहशालेय उपक्रमास सुरुवात केली आहे...
।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।।
बाप्पा आता आजचं उदाहरण बघ ना.आजआणि काल आमावस्येला रस्त्यांवर वाहनांना दृष्ट लागू नये आणि वाहनांचे रक्षण व्हावे म्हणून लावलेले मिरची लिंबू बऱ्याच ठिकाणी खाली पडले होते.मिरची लिंबू फार पूर्वी जंगलातून प्रवास करताना फर्स्ट एड बॉक्स सारखी वापरलं जायचं, परंतु आता त्याची गरज नाही आणि लिंबू मिरचीचा खरा उपयोग जाणून न घेता त्याचा विपर्यास आपण केला.बाप्पा विज्ञानानं आम्हाला हे शिकवलं लिंबू म्हणजे सायट्रिक ऍसिड.लिंबात *'क' जीवनसत्व* असतं क जीवनसत्व आपल्या पोषणास अत्यंत उपयोगी असं जीवनसत्व आहे,जगभरात कुठल्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात क जीवनसत्वयुक्त फळं देणारी मृदा नाही हे जसं सत्य आहे तस जगभरात कुपोषण असणाऱ्या देशांच्या यादीत आपला देश सुद्धा आहे, हेही नाकारून चालणार नाही. *बाप्पा केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे पोषणास उपयुक्त असे 'क' जीवनसत्व असलेले लाखो लिंबू आपण अक्षरशः वाया घालवतो.हे क जीवनसत्व अस वाया न जाता आपल्या देशातील कुपोषित  मुलांना मिळावं अशी सद्बुद्धी आम्हाला मिळो.🙏🙏
आपली भारतीय राज्यघटना आपल्याकडून खालील अपेक्षा व्यक्त करते त्या अशा 👇
'It is duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and unionism'. म्हणजे👉
*' वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.आपण सर्वांनीच
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे.✍
बाप्पा *आपला देश,आपली संस्कृती ही खूप मोठी आहे,महान आहे. या आपल्या मातृभूमीनेच जगाला शून्याचा शोध लावणाऱ्या आणि पृथ्वीच्या खगोलीय रचनेचा अभ्यास करणाऱ्या आर्यभटांसारखा महान गणिती आणि खगोल शास्त्रज्ञ दिले आहेत.दुर्दैवाने आपल्यालाच आपल्या महान शास्त्रज्ञांचा आणि संस्कृतीचाही विसर पडलाय..
जगाला आपल्या महान संस्कृतीत जन्माला आलेल्या महान सुपुत्रांची ओळख व्हावी आणि आपल्याच देशातील विद्यार्थ्यांच्या रूपाने येणाऱ्या पिढ्यांना  विज्ञान अभ्यासकांची माहिती असावी असे वाटते.प्रत्येक भारतीय नागरिकाने शोधकबुद्धी, वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद याचा विचार अंगीकारल्यास आर्यभट्ट
महर्षी कणाद,महर्षी सुश्रुत,भास्कराचार्य,बोधायन,डॉ. सी. व्ही. रमण,जगदीश चंद्र बोस,श्रीनिवास रामानुजन,डॉ. होमी भाभा,हरगोविंद खुराणा,सत्येंद्रनाथ बोस,विक्रम साराभाई,वेंकटरामन,रामकृष्णन,जानकी अम्मल,बी. विजयलक्ष्मी, डॉ.एपीजे अब्दुल कलाम,डॉ. जयंत नारळीकर,डॉ. विजय भटकर या सारखे महान भारतीय घडतील यात शंका नाहीच.. (क्रमशः)
तुझाच
शैलेश शिरसाठ.
विज्ञान उपक्रम ।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।।