https://drive.google.com/file/d/1xtUFmXCu77vyGrogT3_I5iKwqQkB9ake/view?usp=sharing
Wednesday, 2 March 2022
Tuesday, 1 March 2022
Self Introduction (स्वतःचा परिचय)
🙏Hello Everybody🙏
Self introduction is our topic today. स्वतःचा थोडक्यात परिचय कसा करून द्यावा हे आपण आज बघणार आहोत.. याचं प्रात्यक्षिक आपण लवकरच आपल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाईन सत्रात करून घेणार आहे. पण तोपर्यंत आपल्यासाठी स्वतःचा परिचय करून देण्याच्या काही नमुन्यांपैकी एक नमुना.👉
*Hello everybody* (good morning/ afternoon / evening Sir/Mam/Everybody)
I am____XYz__________________.
I am from *Jalgaon* itself. सदर परिचय करून देत असताना आपण जळगाव शहरातच परिचय करून देत असाल तेव्हा I am from Jalgaon itself असा उल्लेख करावा I live in Vrindavan society Nehru Nagar किंवा I put up in Vrindavan society Nehru Nagar. असही म्हणता येईल. I am enjoying my work as a teacher/ doctor/ clerk/ sales manager/yoga teacher* etc.
कुठे नोकरी करत नसाल तर (महिलांनी) 👉 *I am a housewife.*
I am graduate of *Arts/commerce/Science* etc.
I have completed *HSC./XYZ.* जर आता तुमचे शिक्षण सुरू असेल आणि तुम्ही एखादी कोर्स करत असाल तर असं म्हणू शकता👉 *I am pursuing graduation/ I am pursuing diploma in yoga. इत्यादी*
I am studying in *MJ Colleg,Jalgaon /Etc.*
*I have a nuclear*/ extended *family.*
*In my family we are* 2/3/4/5/ 6 *members,myself,my husband, my son, daughter, mother in law and father in law.*
*My husband is a businessman*/ engineer doctor teacher etc.
पत्नी विषयी आई-वडील भाऊ-बहीण विषयी परिचय करून देताना आपण म्हणू शकता my wife is businesswoman*/ engineer doctor teacher etc. पत्नी क कुठे नोकरी करत नसेल तर 👉 * My wife is a housewife. She take care of of all the family members. Her contribution is so much vital for for our family
*I like to do yoga, read books and listen music.* किंवा *Doing yoga, Listening music and reading books are my hobbies* असंही म्हणू शकतात.
I want to become yoga teacher/ I want to become the best yoga teacher.
*I want to be the best in life.*
*Dance*/ Singing /Cooking *is my passion.* आयुष्यात एकाच गोष्टीच passion ( पॅशन ) असेल तर is वापरा. एकापेक्षा जास्त गोष्टींच पॅशन असेल तर are वापरा. For example 👉 *Dance, singing ,cooking are my passion.*
*Wishing You All..,Very HAPPY and PROSPEROUS life*
💐💐💐💐💐💐💐
*TEAM ' We Smart '*
*Shailesh Shirsath.*
Radio Announcer
Spoken English Ambassador.
Key Resource Person.
Founder : We Smart - Speak Smart.
आम्ही नापास उपक्रम.
Founder Director : Swayamdeep Pratishthan.
Vedant Thalassemia Society, Jalgaon.
shaileshshirsath.blogspot.com
Monday, 28 February 2022
इंग्रजी संभाषण सराव- श्रवण कौशल्य
इंग्रजी विषय नवे भाषा म्हणून रुजवतांंना...✍️इंग्रजी संभाषणाच्या तयारीचा एक भाग म्हणून प्रश्नावली आपण सोडवू शकता,त्यासाठी दिलेला व्हिडीओ लक्षपूर्वक पहा, ऐका आणि प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा सदर ऍक्टिव्हिटी आपल्या श्रवण कौशल्याशी संबंधित आहे.👇🏻https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScyhzQRmR4PyBR-JNt8x3tVtdcTqAd0DwOpszcCz1_10vlj5w/viewform?usp=sf_linkhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScyhzQRmR4PyBR-JNt8x3tVtdcTqAd0DwOpszcCz1_10vlj5w/viewform?usp=sf_link
Friday, 18 February 2022
Wednesday, 5 January 2022
अति लघुकथा
अति लघुकथा
एक्सप्रेस हायवे ने आपल्या स्पोर्ट्स बाईक ने प्रवास करणाऱ्या रोहनला त्याच्या आईने हेल्मेट घालण्यास सांगितल्यावर रोहन म्हणाला "मम्मी किती ग तू निगेटिव मला काही अपघात होणार नाही आणि गाडी वरुन पडून नेमका माझ्या डोक्याला कसा काय मार लागू शकतो ? ही तुझी निगेटिव्हिटी आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि मला हेल्मेट घालण्याची सक्ती करू नकोस"
वरील संवादात मुलगा पॉझिटिव्ह आणि आई निगेटिव आहे की आई प्रॅक्टिकली विचार करते हे प्रत्येक वाचकांनी ठरवावं वरील संवादात आईची काळजी जास्त महत्त्वाची नाही का ?
अति लघुकथा
- शैलेशकमल
shaileshshirsath.blogspot.com
नेहमीप्रमाणेच आटपाट नगर होते त्या नगरात अर्थात एक राजा होता.राजा असल्यामुळे सैन्य, सेनापती, स्तुतीपाठक असा सगळा लवाजमा होता.
गावातीलच आणखी एका किल्ल्यातून खाली उतरण्यासाठी सैनिकांनी दोराने उतरावे किंवा पायऱ्यांची व्यवस्था करावी यावर चर्चा सुरू होती. याबाबतीत सैनिकांचा मत सैनिकांचा कार्यालयीन प्रमुख असणारा सेनापतीला विचारले असता तो सेनापती म्हणाला की, किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली जाण्यासाठी उड्या मारा, उगाच दोराने उतरू नका कारण तुम्ही शूर सरदार आहात त्यावर एका अभ्यासू चिकित्सक सैनिकाने सेनापती या कार्यालयीन प्रमुखाला सांगितले की, त्यामुळे हाता पायाला दुखापत होऊ शकते किंवा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो. त्यावर हुशार सेनापती स्मित हास्य करीत म्हणाला की,"सैनिकांनो नकारात्मकता सोडा सकारात्मक विचार करा. आपल्याला वरिष्ठा कडूनही सकारात्मक वृत्ती चे दाखले दिले जात आहेत आणि आपल्याला सूचना देखील आहेत की सकारात्मकृती ठेवा म्हणून सैनिकांनो असा नकारात्मक विचार का करतात की वरून उडी मारल्यानंतर काही दुखापत होऊ शकते किंवा जीव देखील जाऊ शकतो त्याऐवजी असा विचार करा की वरून उडी मारल्यावर मला काहीही होणार नाही,मी सही सलामत उडी मारून सुखरूप राहू शकतो.
त्यावर आपल्या कार्यालयीन प्रमुख असणाऱ्या सेनापतीची स्तुती करत दुसरा सैनिक म्हणाला,"बरोबर आहे सेनापती साहेब, आपण खूपच बुद्धिमान आहात, शूर आहात आपणच हे प्रात्यक्षिक या कमी समज असणाऱ्या सैनिकांना करून दाखवावे". असे ऐकताच ५६ इंची छाती झालेल्या सेनापतीने अत्यंत सकारात्मक वृत्तीने खाली उडी मारली आणि....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्याची स्वर्गातील उर्वशीचे नृत्य पाहण्याच्या सकारात्मक इच्छेसाठीचे एक पाऊल नव्हे तर अख्खी उडीच सार्थक झाली.
- शैलेशकमल.
Saturday, 25 December 2021
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असायला हवे आणि इंग्रजीचे ज्ञान चांगले अवगत असावे
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असायला हवे असे असले तरी प्राथमिक शिक्षणात विद्यार्थी अनेक भाषा शिकू शकतात आणि इंग्रजी शिकणे विद्यार्थ्याला अधिक फलदायी होऊ शकतं
मराठी माध्यमातील शाळात इयत्ता पहिलीपासून इंग्रजी ची सुरुवात जून 2000 पासून झालेली आहे, तथापि आपण मराठी माध्यम शाळा इंग्रजी फक्त विषय म्हणून न शिकवता भाषा म्हणून अभ्यासने आणि सुलभाकाच्या भूमिकेतून भाषेची मांडणी करणे आवश्यक झाले आहे. इंग्रजीत फक्त चांगले मार्क्स मिळवणारी पिढी ही आपणास घडवायची नसून इंग्रजी संवाद करता येणंही आवश्यक आहे चांगले इंग्रजी लिहिणारे,वाचणारे आणि परीक्षेत चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेतून सातत्याने आपणा घडवीत होतच असे असले तरी इंग्रजी संभाषणात (English Speaking) आपले विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या आणि सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा मागे आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही त्याची विविध कारणे असू शकतील असे पालकांचे अज्ञान,घराचे,परिसराचे वातावरण इत्यादी..
जगातली कुठलीही भाषा शिकतांना, शिकवतांना त्या भाषेतून संवाद करण्यासाठी ती भाषा समजण्यासाठी सर्वप्रथम ती भाषा ऐकणे आवश्यक आहे भाषा अवगत करण्यातील टप्पे पुढील प्रमाणे असतात श्रवण (Listening) भाषण (Speaking) वाचन (Reading) लेखन (Writing) त्यानुसारच इयत्ता पहिलीपासून इंग्रजी पाठ्यपुस्तकाची रचना आहे म्हणून सर्वप्रथम अर्थात पहिल्या दिवसापासून A B C D लिहिणे अपेक्षित नसून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा जास्तीत जास्त ऐकण्यास मिळाली पाहिजे म्हणजे विद्यार्थी इंग्रजी संभाषण कला शालेय शिक्षणापासूनच अवगत करतील आणि त्यांना भविष्यात जगात कोठेही इंग्रजी भाषेतून संवाद साधत त्यांना भीती वाटणार नाही. ज्या भाषेत तुम्ही बोलायला सुरुवात करतात त्या भाषेत तुम्ही विचार करायला लागतात किंवा विचार करत असलेले भाषा तुम्ही सहजपणे बोलू लिहू शकता माहिती. इंग्रजी आपली मातृभाषा नसली तरी सरावानं विचार करणं आणि विचार मांडणे होऊ शकत.तंत्रज्ञानाच्या युगात आज भारतासारख्या बहुभाषिक देशात सर्व प्रकारचे उच्च शिक्षण इंग्रजीतून आहे त्या अनुषंगाने इंग्रजी विषयाचे,इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत आहे लहानपणापासूनच मुले जी भाषा ऐकतात त्या भाषेत संवादही करायला लागतात ती भाषा त्या दोन तीन वर्षाच्या बालकाला लिहिता-वाचता येत नाही, त्या भाषेतील अक्षरे ही कळत नाहीत परंतु ती भाषा बोलण्याचा तो प्रयत्न करतो या नैसर्गिक नियमानुसार आणि भाषा ऐकून बोलते करणे आवश्यक झाले आहे परंतु घरी पालक इंग्रजी बोलण्यास असमर्थ असतात मुलांना इंग्रजी संभाषणाचे उपयुक्त वातावरण नसल्यामुळे ती जबाबदारी मोठ्या प्रमाणावर शाळांवर अर्थातच शिक्षकांवर येते त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची दिवसभरातील काही वेळ तरी इंग्रजीत संवाद करण्याचा प्रयत्न करता येईल इंग्रजीच्या तासिकेला जास्तीत जास्त इंग्रजीतून सूचना करून असा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो तथापि असा प्रयत्न शिक्षक करतही असतात म्हणूनच शिक्षक,पालक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात इंग्रजी संभाषण प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेता 'स्पीक स्मार्ट' या इंग्रजी संभाषण उपक्रमाची मांडणी केलेली आहे.
Shailesh Shirsath.
English Language Ambassador Jalgaon.

