Monday, 29 May 2023
माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून...
If a wrestler lost,
so his/ her team camp becames sad.
In the defeat of a wrestler it's
camp's defeat included
As
In the defeat of a girl fighting for her own country
the defeat of the country involves
But
In male dominating society
girl fighting against the world
never loses
either girl wins
Or the country loses.
इंग्रजी अनुवाद.
शैलेश शिरसाठ.
विहाग वैभव यांची मूळ हिंदी कविता
अगर एक पहलवान चित्त होता है
अगर एक पहलवान चित्त होता है
तो उसका अखाड़ा दुःखी होता है
एक पहलवान की हार में
अखाड़े की हार शामिल है
जैसे
अपने ही देश से लड़ती हुई लड़की की हार में
देश की हार शामिल होती है
मगर
मर्दों की बनायी
इस दुनिया के ख़िलाफ़ लड़ती हुई लड़की
कभी हारती नहीं
या तो लड़की जीतती है
या देश हारता है।
©विहाग वैभव
Vihag Vaibhav
महिला कुस्तीगीरांवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात खरंतर भारतातील सर्व महिला संघटनांसह सर्व संघटनांनी स्वतः अभ्यास करून महिला खेळाडूंना न्याय देण्याची गरज आहे, देशभरातून निष्पक्ष चौकशीची तसेच जर कोणी दोषी असेल तर कारवाई करण्याची मागणी घराघरातून व्हायला हवी होती पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही.
निसर्ग आणि प्रेमावर लिहिणाऱ्या लेखक कवींचा अभिमान नक्कीच आहे मी ही त्यावर लिहिलय परंतु आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर लिहिणं देखील या देशातील लेखक, कवी,विचारवंतांचे कर्तव्य नाही का ? रीडिंग अँड राइटिंग फॉर प्लेझर आवश्यक आहेच पण रायटिंग अँड रीडिंग फॉर अवेअरनेस जास्त महत्त्वाच आहे हल्ली.
मित्रांनो आपण चुकीच्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे.लिहिल पाहिजे.विनेश फोगाट सारख्या प्रतिभावंत खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांचा समर्थन करण्याची गरज आहे..यासंदर्भाने आज मार्टिन ल्युथर किंग यांची सहजच आठवण झाली,ते म्हणतात...
Injustice anywhere is threat.to justice everywhere.
विनेश फोगाट सारख्या प्रतिभावंत खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांचा समर्थन करण्याची गरज आहे.
म्हणे माणसानं प्रगती केली.
जुळणारी मनं नेहमीच दूर केली.
म्हणे माणसानं प्रगती केली.
त्यांनी रावणाची टोळी तर,
रामाची झोळी केली,
समानतेची नुसतीच भाषा तर
गावाबाहेर वाडी केली.
म्हणे माणसानं प्रगती केली...
सुविधांच्या पातळीवर म्हणे आमचा विकास झालाय,
पण माणुसकीच्या स्तरावर खालची पातळी गाठली.
देवळातही त्यांनी भ्रष्ट्राचाराची स्पर्धा केली,
आपल्याच घरात चोरी करून विषमतेची दरी केली,
म्हणे माणसानं प्रगती केली.
द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या एकलव्यांच्या देशात,
खेळात राजकारण आणि राजकारणात द्वेषाची खेळी केली,
म्हणे माणसानं प्रगती केली...
महात्म्याच्या विचाराची पायमल्ली अन् महात्म्यांची केवळ स्मारकं केली,
लिंग समभावाचे धडे शिकूनही फक्त सितेचीच अग्निपरीक्षा घेतली,
म्हणे माणसानं प्रगती केली. - शैलेश शिरसाठ.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment