Saturday, 12 August 2023

होय हिंदूच.. पण...

कष्टकरी,अतिशय प्रामाणिक असणारी, लढवय्यी जमात म्हणून आदिवासी कोळी जमात आहे. खानदेशाचाच विचार करायचा म्हटला तर आक्रमक हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालणारी तरुणाई देखील या जमातीतील आहे जे सातत्याने हिंदुत्ववादी संघटना आरएसएस, बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतर धर्म व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून जुळले आहे. एवढं असल्यावरही ज्यावेळेला आदिवासी कोळी जमातीला हिंदुत्ववादी सरकार असल्यावरही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं लागत आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की किती हिंदुत्ववादी संघटनांनी आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देऊन त्यांचे कार्य तडीस नेण्यासाठी प्रयत्न केला आहे? कारण तुम्हाला हिंदुत्ववादाच्या नावावर आक्रमकपणे लढण्यासाठी कोळी बांधवांची गरज भासते पण ज्या वेळेला या जमातीला न्याय हक्क मिळवण्याची गरज असते त्यावेळेला तुम्ही आम्हाला समर्थन देत नाहीत.जर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कोळी जमातीच्या पाठीशी राहून त्यांना पाठिंबा दिला तर बऱ्यापैकी सकारात्मक निर्णय जमातीच्या बाबतीत होऊ शकतो. आम्ही धर्माची पालखी उचलतच आहोत तुम्ही देखील न्यायाची पालखी उचलावी ही अपेक्षा कारण विवेकवादी विचाराने, न्यायाने,मानवतावादी वागणे हाच खरा धर्म आहे. सर्व संघटना जमातीच्या न्याय हक्कासाठी लढतील अशी आशा बाळगूया. इतर बहुजन बांधवांच्या बाबतीत देखील हीच बाब सुजान,विवेकवादी,विज्ञाननिष्ठ वाचकांच्या लक्षात येईल.... दोन दिवसांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या वाचक बांधवांना शुभेच्छा

No comments:

Post a Comment