Tuesday, 4 February 2025

जगाला प्रांतीयवादाचे,कट्टरवादाचे आणि साम्राज्यवादाचे डोहाळे लागले आहेत का ?

 जगाला प्रांतीयवादाचे,कट्टरवादाचे आणि साम्राज्यवादाचे डोहाळे लागले आहेत का ? असा प्रश्न हल्ली निर्माण होतो,अशा प्रकारचे डोहाळे हे विध्वंसाला जन्म देणारे होऊ शकतात.

जगात वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या आगी आणि वनवे हे केवळ भौतिकच नाही तर द्वेष, इर्षेचेदेखील आहेत. साम्राज्यवादाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक राष्ट्राला क्रमांक एक ची महासत्ता व्हायचे आहे..

जगाला भगवान गौतम बुद्धांच्या विश्वशांतीच्या मानवतावादी‌ करुणामयी विचारांची नितांत आवश्यकता आहे. बुद्धांचा विचार जगाला विध्वंसापासून  वाचवू शकेल.कारण जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.

प्रिय नातवांनो मी हे पत्र लिहायची सुरुवात २०२४ वर्षाच्या शेवटी केलेली असली  तरी हे पत्र २०२५ च्या सुरुवाती लिहून पूर्ण झाले आहे.

आपल्या देशातील बांधव जेव्हा इतर देशात जातात आणि आपले सण उत्सव तेथे साजरे केल्याचे फोटो, व्हिडिओ पाठवतात त्यावेळेला आपल्याला खूप अभिमान वाटतो. परंतु असंच जर इतर देशातील लोकांनी आपल्या देशात येऊन त्यांचे सण उत्सव साजरे केले तर आपल्याला ते आपल्यावरील आक्रमण वाटतं एवढंच काय पण परकीय लोकांनी आपल्या देशात येऊन जरी त्यांचे सण साजरे केले नाही आणि आपल्याच देशातील लोकांनी इतर देशातील सण साजरे केले तरीदेखील आपल्याला ते आक्रमणाच वाटते. अर्थात हे सर्वांना वाटते असं नाही परंतु असं वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या लोकांची संख्या आपल्या देशाबरोबरच जगातील प्रत्येक देशात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांश देशातील आक्रमक सांस्कृतिकवाद, प्रांतीयवाद आणि अस्मितेच्या नावाखाली स्वतःच्या संस्कृतीला सर्वोच्च संस्कृती म्हणून इतरांबद्दल द्वेषाची भावना जगातील बहुसंख्य लोकांना वाटू लागली आहे आणि म्हणूनच त्या त्या देशांमध्ये तशा आक्रमक राष्ट्रवादाची पेरणी देखील होत आहे. जे देश अशी भूमिका घेत नाही त्यांच्यावर देखील आता आक्रमकतेचा प्रभाव पडण्याची भीती वाटत आहे.

जगाने आपली संस्कृती स्वीकारावी किंबहुना त्याचा आदर बाळगावा असं वाटत असताना आपणही इतरांच्या संस्कृतीचा आदर बाळगलाच पाहिजे.

आपण आजही जगात कुठल्याही विचारमंचावर गेल्यावर अभिमानाने हे सांगतो की आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो आहे. आपण आपली ओळख अशी देत असल्यामुळे आपल्याबद्दल अधिक आश्वासकता जगाला वाटते कारण बुद्धांचा विचार म्हणजे विवेकी विचार जो मानवतावादाच्या करुणामय नजरेतून जगाला विश्वबंधुत्व सांगतो.

परिस्थिती पाहता कधीकधी खालील ओळी सहजच आठवतात..बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफ़ी था, हर शाख़ पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा....

तुम्ही हे पत्र वाचत असताना संपूर्ण जगभरात काय परिस्थिती आहे हे आत्ताच नक्की सांगता येणार नाही परंतु विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे हे मात्र तेवढेच खर.

Let's hope for a world without borders and wars.



3 comments:

  1. एकदम अचूक विश्लेषण सर👍👍. बुद्धांचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे म्हणून हमे युद्ध नही बुद्ध चाहिये...😊

    ReplyDelete
  2. अतिशय मार्मिक विचार आणि कल्पना आहे बंधू ! -सर्व वयोगटाच्या दृष्टिने शांततेचा मार्ग अवलंब केला तर जग आणी आपण व आपणासह सर्व सजीव युद्धाच्या संकटातून सुटकेचा श्वास घेतील .

    ReplyDelete
  3. माझे गुरुवर्य प्रमोद आठवले सरांची प्रतिक्रिया 👇इतर देशांच्या संस्कृती आणि सणांचा आदर करण्याविषयी लिहिलेल्या या विचारपूर्ण आणि प्रेरणादायी लेखाचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची वेगळी परंपरा, मूल्ये आणि इतिहास असतो, हे लेखकाने अत्यंत सुंदरपणे स्पष्ट केले आहे. आजच्या जागतिक युगात विविधतेला समजून घेणे आणि तिचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा लेख आपल्याला शिकवतो की वेगवेगळ्या सण-परंपरांकडे खुले मनाने पाहिल्यास एकता आणि शांतता अधिक बळकट होते. तो वाचकांना भेदभाव बाजूला ठेवून परस्पर आदर आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो. हा संदेश प्रभावी, अर्थपूर्ण आणि आधुनिक समाजासाठी अत्यंत समर्पक आहे. उत्तम लेखन!
    माझ्या मते आता सर्वत्र शॅडो कल्चरचे अनुकरण करणारे अनुयायी निर्माण केले जात आहेत. फरक एवढाच आहे की आताच्या शॅडो किंवा सावल्या ह्या वास्तव किंवा खऱ्या नसून त्या स्क्रीन निर्मित आहेत. परिणाम भ्रमित आणि भ्रांत, मनामध्येच कुरुक्षेत्र निर्मित होऊन प्रत्यक्ष प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ही त्याची फलनिष्पत्ती आहे.
    Okay. Once again hearty congratulations for the mind-blowing article.
    I truly appreciate this insightful article. The message about respecting different cultures and celebrating diversity is very relevant in today’s world. It encourages mutual respect and peaceful coexistence.

    ReplyDelete