मला भेटलेला क्लार्क (कारकून) आणि शासन निर्णय.
आजच (१६ एप्रिल २०२५) निर्गमित झालेला शाळा स्तरावर विविध समित्यांचा एकत्रित करण्याबाबतचा शासन निर्णय वाचण्यात आला आणि पूर्वी प्रवासादरम्यानचा एक किस्सा आठवला...
शाळा स्तरावर एवढ्या समित्या ठेवण्याऐवजी समित्यांचे एकत्रीकरण व्हायला पाहिजे असं मी प्रवासातील चर्चेदरम्यान मी एका व्यक्तीशी बोलत होतो त्यावेळेला त्या व्यक्ती शेजारी बसलेली व्यक्ती म्हणाली की, "नाही सर शिक्षकांना कामच काय असतं आणि या समित्या बरोबरच आहे आता ज्यांना काम करायच नाही ते असं काहीतरी बहाना शोधणार की एवढ्या समित्या नको म्हणून...
मी म्हटलं,"अहो खरंच एवढ्या समित्यांच्या एकत्रीकरणावर विचार व्हायला हवा."
ती विरोध करणारी व्यक्ती म्हणाली "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला वरिष्ठांपेक्षा जास्त कळतं.माझ्या हातात असतं तर यापेक्षाही अधिक स्ट्रिक्ट केलं असता मी तुम्हाला" मी म्हटलं," अहो तसं नाही, तुम्हाला जर माझा मुद्दाच समजून घ्यायचा नाही तर मग मी काही करू शकत नाही, मी त्या व्यक्तीला विचारलं आपण काय करतात तो विरोध करणारा माणूस म्हणाला ,मी एका कंपनीत कारकून आहे."
माझ्या मताशी समोर बसलेला इतर दोन्ही व्यक्ती व्यक्ती सहमत होते योगायोगाने त्यापैकी एक व्यक्ती देखील माझ्यासारखीच शिक्षक होती आणि दुसरी क्लार्क.
मी सहजच मी माझ्या डायरीत लिहिलेल वाक्य पाहिलं ....'Education is nothing but a common sense.''
मी असं म्हटल्याबरोबर तिथे बसलेले एक उच्चशिक्षित ट्रस्टी व्यक्ती माझ्याशी बोलू लागले आणि मग संपूर्ण प्रवास मी त्या खऱ्या अर्थाने सुशिक्षित असणाऱ्या माणसाशी गप्पा करत प्रवास करू लागलं आणि मग मी त्या कारकून असणाऱ्या गृहस्थाकडे पाहिले देखील नाही...
तो विरोध करणारा कारकून माणूस पुन्हा भेटला तर त्याला आजचा शासन निर्णय नक्की दाखवायला आवडेल आणि तो पुन्हा नाही भेटला तर अधिक आवडेल.
No comments:
Post a Comment