धरणगाव तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा फुलपाट येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत संकल्पना “Yoga for Healthy Ageing – ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’” अशी असून, निरोगी आणि सक्रिय आयुष्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही संकल्पना आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधना सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा रोझोतकर तसेच शिक्षक शैलेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेत योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि एकाग्रता कशी वाढते याचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास केल्यास शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते तसेच वाढत्या वयातही उत्साही जीवन जगता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या प्रस्तावानंतर झाली. संयुक्त राष्ट्र संघाने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केला आणि पहिला योग दिन २१ जून २०१५ रोजी जगभरात साजरा करण्यात आला.
गेल्या बारा वर्षांतील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संकल्पना
वर्ष -थीम / संकल्पना
२०१५- Yoga for Harmony & Peace
२०१६- Connect the Youth
२०१७- Yoga for Health
२०१८- Yoga for Peace
२०१९- Climate Action
२०२०- Yoga for Health – Yoga at Home
२०२१- Yoga for Wellness
२०२२- Yoga for Humanity
२०२३- Yoga for Vasudhaiva Kutumbakam
२०२४- Yoga for Self and Society
२०२५- Yoga for One Earth, One Health
२०२६- Yoga for Healthy Ageing.

No comments:
Post a Comment