माझ्या Free Spoken English प्रशिक्षण कार्यक्रमात DNA अर्थात Daily News Analysis च्या माध्यमातून इंग्रजी संभाषण सराव होतो मात्र आजच्या वृत्तपत्रातील कात्रण हे केवळ Paper cutting न वाटता
“It feels like cutting through the heart while reading. असा अनुभव होता, म्हणून नवरात्र उत्सवात देवी मातेपुढे चौथ्या माळेचं चौथं गाऱ्हाण असे की,.....
आधी ती इंग्रजीतील बातमी माझ्या स्पोकन इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हा ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांना संदर्भासाठी. 👇
संदर्भ लोकमत टाइम्स.
वरील बातमीतील थोडक्यात सार आधी इंग्रजीत, मग मराठी स्पष्टीकरण थोडक्यात.
While Navratri celebrations and worship of The goddess's motherhood where underway, a couple in Sambhaji Nagar city refuse even to touch their one day old baby who had died. We won't touch Citing Navratri, the parents refused to touch the body. In our community the newborn and its mother are not touch so we cannot perform any last rites."the father said and call Central Naka crematorium to send staff to take the body.
वृत्तपत्रातील बातमीनुसार सध्या नवरात्र उत्सव सुरू असण्याच्या कारणावरून पालकांनी स्वतःच्या एक दिवसाच्या मृत बालकाला स्पर्श करू शकत नाही आणि कोणतेही विधी करू शकत नाही असे सांग त आपणास स्वतःच्या मृत बाळाला हात लावण्यास नकार दिला वडिलांनी सेंट्रल नाका स्मशानभूमीशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना बाळांना नेण्यासाठी बोलावले...
व्याकरणाच्या नियमाच्या दृष्टीने वरील लेखनास मी पूर्णविराम द्यायला पाहिजे होता परंतु तो मी मुद्दाम दिला नाही.
पगार लवकर होणार अशी बातमी कानावर आल्यावरही अस्वस्थता कमी होत नाही.लिहावं असंही वाटत आहे परंतु आज लेखणीही चालत नाही. माझा एखाद्या प्रथेला विरोध नाहीच परंतुएखादी प्रथा, परंपरा,कदाचित पूर्वी कालानुरूप, भौगोलिक,सामाजिक किंवा तत्कालीन एखाद्या प्रसंगामुळे योग्य असेलही कदाचित परंतु काळ बदलल्यावर आपण जर पूर्वीसारखा पेहराव, खानपान, राहणं आणि प्रवासाची साधने वापरत नाहीत आधुनिक भौतिक सुख सुविधांचा उपयोग करतो तर मग काही प्रथांबद्दलही आपण किमान विचार तरी करावा शेवटी देवी मातेला चौथ्या मायेचा गाऱ्हाण मांडताना हेच सांगेन की देवी माता, धर्माची मांडणी खोट्या आणि दांभिक कर्मकांडांचा देखावा करणारी अमानवीय बाब नसून माणसाच्या नैतिक आचरणाशी आणि सार्वजनिक मानव कल्याणाची मांडणी असावी किंबहुना ती तशीच आहे हे आम्हाला केव्हा कळणार......? आम्हाला ते लवकर कळू द्या ग माते. 🙏 🚩 सर्व विद्यार्थ्यांना आणि वाचकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जगदंब... जगदंब.✍️
Watch 👇
https://www.facebook.com/share/r/1Ez2CuTFFY/

1 comment:
आपला लेख वाचला, मी आपल्या लेखाचा नियमित वाचक आहे, तुमची शब्दशैली जबरदस्त आहे.
मात्र जी विदारक परिस्थितीचे वर्णन केलेले आहे खरंच समाज कुठल्यातरी वेगळ्या मार्गाकडे वळताना दिसत आहे. आहे त्याची किंमत नाही ,नाही त्याच्यासाठी नको तितकी किंमत देण्यासाठी तयार आहे.
धार्मिक विधी मध्ये लोकांचा हा मानसिक अडथळा विचार करण्याजोग आहे.
Post a Comment