Monday, 4 April 2022


*सुरुवात इंग्रजी बोलण्याची...Greetings-अभिवादन*👇🏻

https://drive.google.com/file/d/18VwGXXP70KbE4eQm-u3_wcmhob3noQJZ/view?usp=sharing 







इयत्ता पहिली सेमी इंग्रजी शिक्षक प्रशिक्षणासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तक युनिट 5 ची  पीडीएफ मॉड्यूल लिंकला  स्पर्श करून डाऊनलोड करू शकता👇🏻

https://drive.google.com/file/d/1h6m1lGc6caARuJwblyOMdZuBGH7RGfjR/view?usp=sharing 



Friday, 1 April 2022

इयत्ता पहिली सेमी इंग्रजी शिक्षक प्रशिक्षणासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तक युनिट 3 ची  पीडीएफ लिंकला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता👇🏻

 https://drive.google.com/file/d/1oE-jCCXfbWKL7jPBnosdhe2hqTgilkuA/view?usp=sharing



Unit Two


Thursday, 31 March 2022

इयत्ता पहिली सेमी इंग्रजी शिक्षक प्रशिक्षणासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तक युनिट 2 ची  पीडीएफ लिंकला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता👇🏻

https://drive.google.co


m/file/d/1DWgO8SOzzGgnkjFiJE7gabov0zwW5tMk/view?usp=sharing 

Saturday, 5 March 2022

एकमेका सहाय्य करू शाळा करू समृद्ध..आव्हान पेलण्यासाठी आवाहन.🙏

आव्हान पेलण्यासाठी आवाहन.🙏
हल्ली एका वर्गात साधारणता दोन ते तीन प्रकारे अध्ययन स्तर असणारे विद्यार्थी असतात त्यामुळे एका वर्गात तीन वेगवेगळे प्रकारचे अध्ययन अध्यापन करावे लागत आहे. एका वर्गातील सर्वच विद्यार्थी एकच प्रकारच्या अध्ययन स्तरावर नसतात म्हणजे सारखेच अध्ययन कौशल्य अवगत झालेले नसतात. अशा वेळेला एका शिक्षकाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावे लागतात,ते वेळ आणि श्रम खाणारे तर आहेच पण काही वेळेला तुलनेनं अधिक चांगल्या प्रकारे अध्ययन कौशल्य अवगत असणारे हुशार मुलांवर अन्याय करणारेही होऊ शकते. त्यात विद्यार्थ्यांचे वर्गीकरण Basic, intermediate and advance असे असते. शाळेत इयत्ता पहिली ते चौथी-पाचवी किंवा संपूर्ण शाळेसाठी. विशेष अध्ययन अध्यापन वर्ग चालवताना सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांचे वर्गीकरण Basic, intermediate and advance अशा विशेष अध्ययन कक्षात (वर्गात) केल्यास अधिक परिणामकारकरीत्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना अध्ययनाचा तसेच त्यांच्या अध्ययन स्तरावरील योग्य अनुभव घेता येईल.अध्ययन अध्यापनाची परिणामकारकता आणि गुणवत्ता सुधारेल शिवाय सर्वांचाच वेळ वाचेल आणि श्रमही वाचतील . म्हणजे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गात अक्षर आणि शब्द ओळख सराव करून देत असताना तुलनेनं अधिक चांगलं समज पूर्वक आणि अस्खलित वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असणार तेच ते पुन्हा पुन्हा न शिकता त्यांच्याप्रमाणे क्षमता प्राप्त असणाऱ्या इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांसह सहभागी होता येईल. आणि त्या advance गटासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात पुढील advance भाग शिकता येईल. शाळेतील सर्व घटकांच्या एकमेकांना सहकार्य करण्याच्या कार्यपद्धतीमुळे हे सहज शक्य होईल.

टीप 
सराव सुलेखन वही पहाण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठी वरील फोटोला स्पर्श करा ( क्लिक करा )

 


Friday, 4 March 2022

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२१-२२


 

Use Resources of the city.

आमची मुलं मुंबई-पुण्यात शकतात याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील रिसोर्सेस किती उपयोगात आणतात या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.पुण्यात शिकणं म्हणजे पुण्यात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे...✍

आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं  पसंत का करतो ? याची अनेक कारणं असली तरी आपल्याला आणि आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो..परंतु असे असले तरी  शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपल्या कडून घेतला जात नाही ना? याचााही विचार व्हावा...विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम दाखवा.... दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की दाखवा... ✍

आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं...  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फेेेे आयोजित साठावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे  आयोजन जळगाव येथे छत्रपती संभाजी नाट्यगृह  करण्यात आले आहे.आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे.या नाट्य स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.✍ दिनांक ४ मार्च २०२२. शैलेश शिरसाठ. २०२४ च्या सरत्या वर्षातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लेखाचा पुढचा भाग २०२५ च्या महाराष्ट्र दिनानिमित्त लिहित आहे. सर्वसाधारणपणे असं पाहायला मिळतं की नवीन पिढीवर सातत्याने टीका होत असते परंतु नवीन पिढीत प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहेत जुन्या पिढीने मात्र स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे आणणारा दैदिप्यमान इतिहास फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रबोधनातून हस्तांतरित करत राहावा,यातील सर्वांना जोडणारा आपल्या हृदयातील महत्त्वाचा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं स्पंदन आणि रुबाब. पुणे पुस्तक महोत्सवात The Folk Akhyan या विशेष कार्यक्रमात शाहीर चंद्रकांत माने यांच्या सुमधुर आवाजात गायलेले प्रेरणादायी गीत "शिवबा राजं छत्रपती झालं ग" तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतं. या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि त्यागाच उत्तम वर्णन आहे. ऐका आणि गर्वाने शिवरायांचा जयजयकार करा!

आपलाही

शैलेश शिरसाठ,जळगाव.



Video Uploaded on the blog on 31 August 2025