GOD can not go everywhere that is why he created MOTHER
Sunday, 14 May 2023
आईच्या प्रेमाच उत्कृष्ट उदाहरण असणाऱ्या माझ्या पत्नीस सलाम.
Happy Mothers Day to all the mothers in the universe.
My wife is great mother in fact every mother is a great for every child. Here one story I want to share with your please read it.
One day Thomas Edison came home and gave a paper to his mother. He told her, “My teacher gave this paper to me and told me to only give it to my mother.”
His mother’s eyes were tearful as she read the letter out loud to her child: Your son is a genius. This school is too small for him and doesn’t have enough good teachers for training him. Please teach him yourself.
After many years, after Edison’s mother died and he was now one of the greatest inventors of the century, one day he was looking through old family things. Suddenly he saw a folded paper in the corner of a drawer in a desk. He took it and opened it up. On the paper was written: Your son is addled [mentally ill]. We won’t let him come to school any more.
Edison cried for hours and then he wrote in his diary: “Thomas Alva Edison was an addled child that, by a hero mother, became the genius of the century.”
Monday, 1 May 2023
Monday, 27 March 2023
संवाद छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती नरवीर तानाजी मालुसरे यांचा.
गल्ली ते दिल्ली वेगवेगळ्या गटातटातील क्रिकेट लीगचे सामने सुरू होते. अशाच एका क्रिकेट लीगचा सामना सुरू होता
आणि काय आश्चर्य रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जिवलग मित्र सेनापती तानाजी मालुसरे यांच्यासह डिजिटल टेक्नॉलॉजीच्या या युगात महाराष्ट्रात आणि देशात नेमकं काय चाललं आहे हे पाहण्यासाठी आले.
ग्रामीण भागात आणि शेतीसाठी वीज कपात करून विज वाचवणाऱ्या महाराष्ट्रात प्रचंड खर्च करून विद्युत दिवांच्या आणि ज्या विजेवर शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी चालतात त्याच विजेवर चालणाऱ्या डीजेच्या कर्णकर्षण आवाजात क्रिकेटचे सामने सुरू होते.
महाराजांनी तानाजींना विचारले,"तानाजी हे कसले सामने आहेत. तानाजींनी उत्तर दिले महाराज हे मराठा प्रीमियर लीग सुरू आहे. हे क्रिकेटचे सामने आहेत."
तुझा नातू पण असंच काहीतरी खेळतो ना? चल आज त्याचा खेळ बघुया" छत्रपती शिवराय तानाजींना म्हणाले.तानाजी शिवरायांचे बोलणे ऐकून थोडेसे व्यथीत होऊन म्हणाले, "पण महाराज हा खेळ फक्त मराठा खेळाडूंसाठीच आहे."
त्यावर शिवराय म्हणाले,अरे हो ते मला माहित आहे म्हणूनच तर मी म्हटलं की आज माझ्या सर्व जाती-धर्माचे मावळे खेळ भावनेने कसे खेळतात हे मला बघायचे आहे."
अहो पण महाराज या क्रिकेट लीग मध्ये माझ्या वंशजांना, आपल्या हिरोजी इंदलकर , मदारी मेहतर, रुस्तम मे जमान, बाजीप्रभू देशपांडे, सिद्धी इब्राहिम,जीवा महाला, सरनौबत नुरखान बेग या आणि यासारख्या स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या कुठल्याही वंशजाला खेळण्याची परवानगी नाही यात फक्त जन्माने मराठा जातीत जन्मलेल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे."
यावर प्रचंड आश्चर्य व्यक्त करत शिवराय म्हणाले " हे काय बोलत आहात तुम्ही तानाजी.अहो हे तर क्रिकेटचे मराठा प्रीमियर लीग ना? मग यात मराठा नाहीत असे का?
"माफ करा महाराज पण या मूलखावर प्रेम करणारे, आपल्या मराठीसह सर्वच बोलीभाषांवर प्रेम करणारे,सर्व जाती-धर्म यातील लोक म्हणजे मराठा ही आपली व्याख्याच या लोकांनी बदलली आहे "तानाजी म्हणाले. त्यावर शिवराय म्हणाले,
तानाजी खेळात शारीरिक, मानसिक, तार्किक विकासासोबतच खेळ भावना महत्वाची की जात?
असं असेल तर मग आपण काय मिळवलं ? आमची समाधी शोधून समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा या समतावादी विचारसरणीतून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक विचारचं आणि समाजाचं काय झालं ?
जातीपाती आणि भेदभाव हवेतच कशाला?
तानाजी आहो आपल्याला जाती अंताचा लढा आता लढावा लागणार आहे?
यावर तानाजी म्हणाले,
"महाराज तुमच सर्व खरं आहे पण,
आपल्या देशात असे होणार नाही असे चित्र वेळोवेळी दिसले आहे आपल्या देशात लोकांना त्यांची जातच त्यांची एक महत्त्वाची ओळख वाटत आहे.विशेषतः स्वतःच्या जातीला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जाती,सर्व जाती एकत्र करण्याला कधिच प्राधान्य आणि मान्यता देणार नाही, कारण त्यामुळे त्यांचे जन्माने मिळालेले जातीचे श्रेष्ठत्व नाहीसं होईल.
आज देशात जवळपास प्रत्येकजन आपापली जात कुरवाळत बसला आहे.आज देशात जवळपास सर्वच जातींचे गट-तट ,मंडळ,संघटना,सेल, आणि आता हे क्रिकेटचे लीग आहेत. सर्व जाती धर्मियांना एकत्र करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली होती परंतु बहुजन म्हणवणाऱ्या सर्वच जातींनी सुद्धा सत्यशोधक समाजामध्ये स्वतःला समाविष्ट करून घेतलं नाही महाराज"
तानाजींच्या या बोलण्यावर शिवराय म्हणाले,
"यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, आपल्याला या सर्वच आयोजकांशी बोलावं लागेल तानाजी."
एवढ्यात जोरात मोबाईलचा अलार्म वाजला आणि मी झोपेतून उठलो. मी आजूबाजूला पाहिलं. महाराजही दिसेनात आणि सेनापती तानाजीही.
सकाळचे पाच वाजले होते. सकाळची स्वप्न खरं होतात असं ऐकलं होतं. मी खिडकीतून बाहेर आकाशात पाहिलं, अंधार होता पण थोड्या वेळात सूर्योदयही होईल याची खात्री होतीच....✍️
- शैलेशकमल
Monday, 27 February 2023
'म'मराठीचा...
मराठी चित्रपटात कधीही नायक हा अहिराणी बोलीतील दाखवला नाही. भाषादेखील प्रमाण मराठी भाषाच वापरली किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बोली,
वऱ्हाडी भाषेतील नायक किंवा नायिका आपल्याला पाहायला मिळाले नाही. मराठीच्याच बहिणी असणाऱ्या बोलीभाषांना मात्र चित्रपट,नाटकांमधून पाहिजे तो न्याय मिळाला नाहीच. ग्रामीण बोलीभाषांना Vernacular Accent असे न हिणवता खऱ्या अर्थान Vernacular Accent चा योग्य सन्मान केला गेला पाहिजे कारण प्रमाण भाषेला आदर्श ठेवून बोली भाषेच्या उच्चारांना आपण अशुद्ध कसं म्हणू शकतो ? मग बोली भाषेच्या दृष्टीने देखील शहरीकरण झालेल्या बोली भाषेतील शब्दही अशुद्ध असू शकतील. त्यामुळे प्रमाण भाषेने बोलीभाषेवर न्यूनगंड लादता कामा नये. असं श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व लादणं हे जात आणि वर्ण व्यवस्था लाागण्यासारखं तर नाही ना..? याचाही विचार व्हावा.
मराठी भाषेला अभिजात भाषेसाठी प्रयत्न होत असताना मराठी भाषेच्याच बहिणी असणाऱ्या बोलीभाषांना आपुलकी भावनेने पाहणे महत्त्वाचे आहे. आपला प्रयत्न हा मराठी मुलाखातील डोंगर,दर्या,खोरे,वने आणि समुद्रांच्याही पलीकडे जगभरात पसरलेल्या अशा मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न आहे की, एक-दोन शहरांच्या मर्यादित प्रमाण मराठी भाषेसाठी असाही प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो.
सैराट चित्रपटाच्या यशामागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे चित्रपटातील भाषा.सैराट चित्रपट हा बोली भाषेचाही एक प्रकारचा बॅकलॉक होता तसा बॅकलॉग एका चित्रपटाने भरून निघणार नाहीच.
मुंबई-पुण्यातील प्रमाण मराठी भाषेच्या जवळच्या असणार्या भाषाखेरीज इतर प्रमुख बोलीभाषांना कधीही मराठी चित्रपट सृष्टीत स्थान देण्यात आले नाही. आपल्या देशात एक सर्वात जुनी असणारी एक भाषा जेव्हा फक्त एका विशिष्ट वर्गाला (जातीला) शिकण्याचा अधिकार असतो त्या वेळेला ती भाषा आणि त्याच्याशी संबंधित सांस्कृतिक घटकांचं संक्रमण थांबण्याचा धोका देखील असतो. स्वतःची भाषा संकुचित ठेवणाऱ्या संस्कृतीचा इतिहास कितीही दैदिप्यमान सांगितला गेला तरी त्याचं वर्तमान आणि भविष्य समाजातील सर्व घटकांना सोबत घेतल्याशिवाय वैभवशाली होऊ शकत नाही हे आपण समजून घेणे महत्वाचे आहे.
इंग्रजांनी कधीही इंग्रजी आपल्या पुरता मर्यादित न ठेवता त्या भाषेतून व्यवहार करणे, ज्ञान देणे जगभरात सुरू ठेवलं इतर भाषेतील शब्दांना देखील आपलंसं केलं त्यातून आपल्या इंग्रजी भाषेतील शब्द भरणा वाढवला म्हणून आज आंतरराष्ट्रीय भाषा असणारी इंग्रजी जगातील एक महत्वाची भाषा बनली आहे.-✍️ shaileshshirsath.blogspot
मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या मिलन चित्रपटातील या गाण्याचा आनंद घ्या
Thanks to Supergane YouTube Channel
Friday, 17 February 2023
श्रेष्ठत्वाच्या जाती अभिमानात जातीअंत केवळ दिवास्वप्न तर नाही ना ?
या देशात जसे जोडणारे जाणते राजे झाले तसे फोडा व राज्य करा या तत्वाने काही राज्यकर्तेही झाले..
अनेक जुलमी राजवटींनी लोकांना गटातटात फोडून राज्य केले, म्हणजेच फोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबले. फोडा आणि राज्य करा या तत्त्वासाठी सध्या फोडण्याचीही गरज नाही आपण जाती धर्मात (सध्या लीगमध्ये) आधीच फुटलो आहोत शेवटी या देशातून जात जात नाही हेच खरं आणि म्हणूनच प्रत्येक राजवट आपल्याला गृहीत धरते अन हवं तसं राज्य करते.
लोक म्हणतात राजकारणाने खेळ मांडलाय असे असले तरी द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या एकलव्यांच्या देशात खेळाने राजकारण मांडल नाही ना ? हे देखिल पाहिले पाहिजे.
जातीअंताचा लढा हा जातींचा नाही तर जातींपलीकडे मानवी मूल्यांचा लढा आहे.
श्रेष्ठत्वाच्या, जाती-अभिमानाच्या विळख्यात
जाणत्या राजाच्या देशातील जनतेने अजाणतेपणे वागू नये म्हणून जाणीवपूर्वक...(जातीअंताच्या लढ्याबाबत मनातलं. माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️ शैलेश शिरसाठ.) shaileshshirsath.blogspot.com
Monday, 13 February 2023
विद्यार्थ्यांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचं काय ?
शेगावीचे गजानन महाराज यांच्या बाबतीत मनात अपार निष्ठा आणि श्रद्धा असणारे विद्यार्थी आणि इतर भक्त लोकही शाळा महाविद्यालयात आहेत परंतु शाळेत जेव्हा तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घ्यावा लागला त्यावेळेला त्यांचा गोंधळ उडाला.
शेगावीचे गजानन महाराज हे चिलीम ओढतांनाची मनमोहक प्रतिमा त्यांनी लहानपणापासून पाहिली आहे शाळेत आल्यावर तंबाखूमुक्त शाळा अभियानात मात्र तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना शिकायला, समजून घ्यायला मिळाले.
शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनासह धुम्रपानाचे दुष्परिणाम समजून घ्यावे की,आपल्या समाजाची, पालकांची आई-वडिलांची अपार श्रद्धा असणाऱ्या चिलीम ओढणाऱ्या गजानन महाराजांचा आदर्श घ्यावा या संदर्भात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला कारण शाळेतील सुविचारांचा फळा गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छाही देतो आणि धूम्रपानमुक्त जीवनाचा संकल्पही...
माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून..✍️
shaileshshirsath.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)








