Wednesday, 29 April 2020




मित्रांनो  विविध प्रकारच्या चवी बद्दल जाणून घेऊ या.  
Taste & Flavors from Around the World with Examples (In English and Marathi) . 
या माहिती लेखाच्या  खाली विविध खाद्यपदार्थांच्या चवीं सोप्या इंग्रजी वाक्य रचनेसह समजून घेण्यासाठी यासाठी लिंक दिली आहे त्यानुसार आपण वाचन लेखन तसेच संभाषण सराव करू शकता आणि  PDF डाऊनलोडही करू शकत 

1. Sweet (गोड)

   - *Meaning*: A taste sensation that is often associated with sugar.

   - *Examples*:

     - *English*: Chocolate, cakes, candy

     - *Marathi*: पेढा, जलेबी, बर्फी

 

2. *Sour (आंबट)*

   - *Meaning*: A sharp, tangy taste typically found in citrus fruits.

   - *Examples*:

     - *English*: Lemon, yogurt, vinegar

     - *Marathi*: लिंबू, ताक, चिंच

 

3. *Salty (खारट)*

   - *Meaning*: A taste that is associated with salt.

   - *Examples*:

     - *English*: Pretzels, salted nuts, chips

     - *Marathi*: चिवडा, शेंगदाणे, फरसाण

 

4. *Bitter (कडू)*

   - *Meaning*: A sharp, pungent taste that is often found in certain vegetables and herbs.

   - *Examples*:

     - *English*: Coffee, dark chocolate, bitter gourd

     - *Marathi*: कारले, मेथी, काळी कॉफी

 

5. *Umami (उमामी)*

   - *Meaning*: A savory taste often described as meaty or brothy.

   - *Examples*:

     - *English*: Soy sauce, mushrooms, parmesan cheese

     - *Marathi*: सोया सॉस, बटाटा भाजी, पनीर

 

6. *Spicy (तिखट)*

   - *Meaning*: A hot, burning taste typically associated with peppers.

   - *Examples*:

     - *English*: Chili peppers, hot sauce, curry

     - *Marathi*: मिरची, झणझणीत मिसळ, चिकन करी

 

7. *Astringent (तुरट)*

   - *Meaning*: A dry, puckering taste often found in certain fruits and vegetables.

   - *Examples*:

     - *English*: Unripe bananas, pomegranate, tea

     - *Marathi*: कच्चे केळे, डाळिंब, चहा

 

8. *Savory (खारट व मसालेदार)*

   - *Meaning*: A flavor that is salty and rich in taste, often associated with meat and broths.

   - *Examples*:

     - *English*: Beef stew, soy sauce, mushroom soup

     - *Marathi*: मटण रसा, सोया सॉस, मशरूम सूप

 

9. *Tangy (तिखट-आंबट)*

   - *Meaning*: A sharp taste that is both sour and slightly spicy.

   - *Examples*:

     - *English*: Barbecue sauce, tamarind, pickles

     - *Marathi*: बार्बेक्यू सॉस, चिंच, लोणचे

 

10. *Earthy (मातीचा/भूखंडाचा स्वाद)*

    - *Meaning*: A rich, deep flavor often associated with root vegetables and certain mushrooms.

    - *Examples*:

      - *English*: Beets, truffles, potatoes

      - *Marathi*: बीट, आलं, बटाटे

 

Combining Flavors

Many dishes combine multiple flavors to create a complex and delightful taste experience. For example:

- *English*: Sweet and sour chicken combines sweet and tangy flavors.

- *Marathi*: गोड-आंबट चिकन गोड आणि  आंबट स्वाद एकत्र आणते. Flavors from Around the World with Examples (In English and Marathi)

विविध खाद्यपदार्थांच्या चवीं सोप्या इंग्रजी वाक्य रचनेसह समजून घेण्यासाठी यासाठी लिंक दिली आहे त्यानुसार आपण वाचन लेखन तसेच संभाषण सराव करू शकता आणि  PDF डाऊनलोडही करू शकता.Get free PDF of our Types of tastes with sentences formations just visit_* Download PDF of Types of tastes 👇🏻
Pdf download 👆

विविध खाद्यपदार्थांच्या चवीं खालील व्हिडिओतून समजून घेऊ 

























Sunday, 8 September 2019

Learning Outcome Differentiate between small and capital letters in print.

 Learning Outcome

Differentiate between small and capital letters in print.

(लहान आणि मोठ्या अक्षरांमधील फरक ओळखणे.)

Pedagogical Process (शैक्षणिक प्रक्रिया)

1. दृश्य दाखवणे (Visual Exposure):

A–Z ची मोठी (Capital) व लहान (Small) अक्षरे रंगीत चार्टवर दाखवा.

उदाहरण: A – a, B – b, C – c

2. जुळवा उपक्रम (Matching):

Capital letter कार्ड आणि Small letter कार्ड वेगळे द्या.

विद्यार्थ्यांनी जुळवावे: A → a, B → b.

3. वर्गातील वस्तूंशी जोडणी (Relating to Environment):

Blackboard वर मोठी व लहान अक्षरे लिहा.

पुस्तकातील मजकूर दाखवून विचारा: “हे capital A आहे का small a आहे?”

4. खेळाच्या स्वरूपात (Learning with Fun):

Letter Hunt, Bingo, Sorting अशा मजेदार पद्धती वापरा.

Classroom Activity (आनंदी व खेळकर पद्धतीने)

१. Letter Hunt (अक्षर शोधा खेळ)

शिक्षकाची भूमिका:

वर्गात capital व small अक्षरे असलेले कार्ड लपवा.

सांगा: “Find capital B” किंवा “Find small b.”

विद्यार्थ्यांची भूमिका:

शोधून योग्य कार्ड आणणे.

उदाहरण:विद्यार्थी Capital B व Small b ओळखून आणतात.

२. Pairing Game (जोड्या लावा)

शिक्षकाची भूमिका:

Capital letters एका बाजूला, Small letters दुसऱ्या बाजूला लिहा.

विद्यार्थ्यांना जोड्या लावायला सांगा.

विद्यार्थ्यांची भूमिका:

A ↔ a, B ↔ b अशा जोड्या लावणे.

उदाहरण:

एक विद्यार्थी बोर्डावर A → a जोडतो.

३. Alphabet Bingo (अक्षर बिंगो खेळ)

शिक्षकाची भूमिका:

Capital आणि Small letters च्या बिंगो शीट द्या.

एखादे अक्षर उच्चारा: “Capital C.”

विद्यार्थ्यांची भूमिका:

जर त्यांच्याकडे असेल तर मार्क करा.

उदाहरण:

शिक्षक म्हणतो “small d” → विद्यार्थी छोट्या “d” वर खूण करतो.

४. Action Game (हावभावातून ओळख)

शिक्षकाची भूमिका:

Capital letter दाखवून विद्यार्थ्यांना मोठा हावभाव करायला सांगा.

Small letter दाखवून छोटा हावभाव करायला सांगा.

विद्यार्थ्यांची भूमिका:

Capital letter → हात पसरून “BIG”.

Small letter → हात घट्ट करून “small”.

५. Story/Picture Book Fun

शिक्षकाची भूमिका:

गोष्टीच्या पुस्तकात capital व small letters दाखवा.

विचारा: “Here is ‘T’. Is it capital or small?”

विद्यार्थ्यांची भूमिका:

योग्य उत्तर द्या: “Capital T.”

Teacher’s Role (सारांश)

स्पष्ट व मोठ्या आवाजात अक्षरे सांगणे.

रंगीत कार्ड्स, खेळ व गोष्टी वापरणे.

चुका झाल्यास विद्यार्थ्यांना सौम्यपणे दुरुस्त करणे.

योग्य उत्तरांसाठी प्रोत्साहन देणे.

Students’ Role (सारांश)

capital व small letters लक्षपूर्वक पाहणे.

जुळवणे, शोधणे, मार्क करणे, बोलून दाखवणे.

खेळ व कृतींमध्ये उत्साहाने सहभाग घेणे.

क्रमाक्रमाने स्वतंत्रपणे capital व small letters ओळखणे.

Tip for Joyful Learning:

खेळ, गाणी, clap-clap activities वापरल्यास मुले आनंदाने शिकतात आणि पटकन लक्षात ठेवतात.


Monday, 1 July 2019

1st Standard English Learning outcomes.

First standard English Learning outcomes.

•Learning outcomes:

Learns and names English words for familiar object and pictures.01.17.01

•Suggested pedagogical process:

For this learning outcome the suggested pedalogical process is name common object such as man dog etc when pictures are shown. 

 वर्गातील उपक्रम (Classroom Activity )

१. चित्र ओळख (Picture Naming Game)

शिक्षकाची भूमिका:

फ्लॅशकार्ड, खऱ्या वस्तू किंवा PPT मधील चित्र दाखवता येतील (apple, ball, cat, bag इ.).

शब्द स्पष्ट उच्चारा: “This is an apple.”

विद्यार्थ्यांना शब्द पुनः उच्चारायला सांगा.

विद्यार्थ्यांची भूमिका:

चित्र नीट बघा.

शब्द मोठ्याने म्हणा: “Apple.”

शिक्षकांनी विचारल्यास चित्राकडे बोट दाखवा.

उदाहरण:

शिक्षक बॉलचे चेंडूचे) चित्र दाखवतील आणि विचारतील : “What is this?”

विद्यार्थी प्रतिसाद देतील: “Ball.”

२. वर्गातील वस्तू शोधा (Classroom Object Hunt)

शिक्षकाची भूमिका:

वर्गातील वस्तूंवर बोट दाखवा (chair, book, blackboard, fan).

विचारा: “What is this?”

विद्यार्थ्यांना इंग्रजीत उत्तर द्यायला प्रोत्साहित करूया.

विद्यार्थ्यांची भूमिका:

वस्तू नीट पाहा आणि इंग्रजीत उत्तर द्या: “This is a chair.”

कधी कधी त्या वस्तूपर्यंत जाऊन तिचे नाव सांगा.

उदाहरण:

शिक्षक दरवाज्याकडे बोट दाखवून विचारतील: “What is this?”

विद्यार्थी म्हणेल: “Door.”

३. चित्र आणि शब्द जुळवा (Match the Word with Picture)

शिक्षकाची भूमिका:

चित्रे व वेगळे शब्द असलेले फ्लॅशकार्ड/वर्कशीट द्या.

विद्यार्थ्यांना जुळविण्यास मार्गदर्शन करा.

विद्यार्थ्यांची भूमिका:

'dog'हा शब्द 🐕 चित्राशी,'cat'हा शब्द 🐈 चित्राशी जुळवा.

उदाहरण:

मांजराचे चित्र → विद्यार्थी “cat” हा शब्द त्याखाली चिकटवतो.

४. वर्तुळ खेळ – चित्र पुढे द्या (Circle Time ‘Pass the Picture’)

शिक्षकाची भूमिका:

एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकार्ड द्या.

पुढे देण्यापूर्वी त्या वस्तूचे नाव सांगायला सांगा.

विद्यार्थ्यांची भूमिका:

“Dog.” असे म्हणून कार्ड पुढे देतील.

पुढचा विद्यार्थी ते पुन्हा बोलेल.

उदाहरण:

पहिला विद्यार्थी: “Sun.”

पुढचा विद्यार्थी: “Sun.”

५. “मी बघतो आहे” खेळ (I Spy Game)

शिक्षकाची भूमिका:

म्हणा: “I spy with my little eye something that is red.” (apple, bag, इ.).

हिंट/क्ल्यू द्या.

विद्यार्थ्यांची भूमिका:

अंदाज लावा आणि शब्द बोला.

उदाहरण:

शिक्षक: “I spy something round and used for playing.”

विद्यार्थी: “Ball.”

शिक्षकाची भूमिका (Teacher’s Role – Summary)

शब्दांचा स्पष्ट उच्चार करून वारंवार पुनरावृत्ती करणे.

हावभाव, बोट दाखवणे, खऱ्या वस्तू वापरणे.

संपूर्ण वर्गाने एकत्र उच्चार करावा यासाठी प्रोत्साहित करणे.

योग्य उत्तर दिल्यास विद्यार्थ्यांना कौतुकाने प्रोत्साहित करणे.

कमी आत्मविश्वास असलेल्या विद्यार्थ्यांना हिंट देणे, तर चांगले उत्तर देणाऱ्यांना पुढे नेणे.

विद्यार्थ्यांची भूमिका (Students’ Role – Summary)

चित्रे आणि वस्तू लक्षपूर्वक पाहणे.

ऐकून शब्दांचा मोठ्याने उच्चार करणे.

शिक्षक विचारल्यास उत्तर देणे: “What is this?”

खेळात सक्रिय सहभाग घेणे (पासिंग, जुळविणे, अंदाज लावणे).

हळूहळू शिक्षक न विचारता स्वतः वस्तूंची नावे सांगणे.

अंमलबजावणीसाठी टिप:

सुरुवात खूपच परिचित शब्दांपासून करा (ball, bag, dog, sun, tree) → नंतर वर्गातील वस्तू (desk, chalk, window) → नंतर नवीन गट (फळे, प्राणी, शरीराचे अवयव).

























Video uploaded on 11 September 2025.




Friday, 1 June 2018

प्री-वेडिंग लहानपणापासूनच्या आठवणीतील फोटोंची, जिव्हाळ्याच्या नात्यांची गुंफण की, न घडलेल्या प्रणय प्रसंगांच सिनेमॅटिक प्रदर्शन

आजोबांचे नातवांना पत्र.
माझ्या प्रिय नातवांनो तुम्हाला अनेक शुभाशीर्वाद. तुमच्या विवाहप्रसंगापर्यंत मी तुमच्यासोबत असेलच परंतु नसलो तरी तुमच्यासाठी हे पत्र. तुम्ही पत्र वाचा, मी सांगतोय तसंच तुम्ही करा असं नाही परंतु आजोबाच नातवांसाठी काही सांगणं आहे ते तुमच्यापुढे मांडतोय किमान त्याचा विचार करा...
मला तुमचा आणि तुम्हालाही माझा अभिमान वाटावा यासाठी हा पत्र प्रपंच ...
आयुष्य हे क्षणभंगुर असतं त्यामुळे आनंदाने जगण्यासाठी नक्कीच पैसा खर्च करा कारण पैसा तुमच्यासाठी आहे तुम्ही पैशासाठी नाही. तुम्ही फक्त साक्षर नाही सुशिक्षितही राहाल म्हणून लग्न सोहळ्यासाठी पैसा कसा खर्च करावा याच नियोजन आणि निर्णय तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यावे.
लग्न सोहोळ्या बाबतीत विशेष मत मांडायचा मुद्दा म्हणजे 'प्री-वेडिंग शूट.' प्री-वेडिंग लहानपणापासूनच्या आठवणीतील फोटोंची, जिव्हाळ्याच्या नात्यांची गुंफण की न घडलेल्या प्रणय प्रसंगांची सिनेमॅटिक प्रदर्शन याचा तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने विचार करा.
स्वतः पैसे खर्च करून प्री-वेडिंग शूटिंग मध्ये घडलेल्या न घडलेल्या रोमँटिक प्रसंगांचे जगासमोर मांडण्याची सिनेमॅटिक लिबर्टी आपण फोटोशूट देतांना जरा सांभाळा..फोटोशूट कसा होईल याचा निर्णय विवाह संस्कारातून जाताना मुला-मुलींनी नक्कीच घ्यावा पण त्यासोबत आपल्याला घडवणारे आई-वडिल, लाड पुरवणारे आजी आजोबा, सख्खे चुलत असा हिशोब न मांडता सतत काळजी घेणारी उत्सवप्रिय भावंडे परिवारातील सदस्य,आयुष्याच्या सुखदुःखात साथ देणारी जिवलग मित्रमंडळी यांच्या सोबतच्या आठवणींसाठी किमान एक क्लिक तरी ठेवा.
लग्नाच्या तयारीसाठी आरशासमोर उभे रहा पण जुनी दुर्मिळ फोटो यांचा संग्रह ठेवा कारण आरसा गेलेला काळ दाखवत नाही जो जुने फोटो आणि आठवणी सांगतात...
तुमच कोणावर प्रेम असेल आणि त्यांच्याशी तुम्ही विवाह करताना तुम्ही विवाहपूर्वी पासून एकमेकांमध्ये किती इन्व्हॉल आहात हा अत्यंत खाजगी असणारा भाग सार्वजनिक करावसं वाटलं तर करा पण जरा भान ठेवा. तुमचं लव्ह समाजासमोर अरेंज मॅरेज द्वारे करताना तुम्ही विवाहापूर्वीच एकमेकांना ओळखता आणि प्रेमात आहात यासाठी प्री-वेडिंग मध्ये आवश्यक वाटल्यास त्याचा केवळ उल्लेख करा फालतू खाजगी फोटो आणि व्हिडिओचे बीभत्स प्रदर्शन नकोच.परंतु तुम्ही म्हणजे नवरदेव नवरी एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असाल तर प्री-वेडिंग मध्ये तुमचे अनेक वर्षापासून संबंध असल्याच खोट प्रदर्शन मांडू नका कारण ते जेवढे हास्यास्पद आहे तेवढच संतापजनक आणि तुमची बौद्धिक दिवाळखोरी काढणारेही आहे.
पुन्हा सांगतो गेल्या अनेक वर्षापासून विवाहाने संस्कारित होण्यापूर्वीच तुमचे संबंध असल्याचा बनाव आणून भाकडकथा रचू नका आणि लग्न समारंभात अक्षदा टाकण्यासाठी आणि जेवणासाठी तात्काळत असलेल्या लोकांना दाखवू नका. उगाच फिल्मीपना करू नका चित्रपटांचा तुमच्यावर प्रभाव आहे हे दाखवण्यासाठी पैशाची उधळण सांभाळून करा.
तुमच्या मानसिक आणि सोशल मीडियावरील विश्वाच्या समाधानासाठी तुमच्याकडे असणाऱ्या वैभवाच शक्ती प्रदर्शन समारंभातील खर्चातून जरूर करा पण त्यासोबत प्रेमाची जिव्हाळ्याची नाती आणि माणसं जपायलाही शिका..
तुमच्यासाठी लिहिलेलं हे पत्र कागदावर आहेच पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधुनिक युगात आपण आहोत तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे मीही टेक्नोसॅव्ही आहेच म्हणून तुमच्यासाठी हे पत्र डिजिटल स्वरूपात माझ्या ब्लॉगवरही अवेलेबल आहेच.
तुम्ही वापरत असलेल्या विविध गॅझेटसह तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहणारच आहात कारण आपल्याला हे जग जसं मिळालंय त्यापेक्षाही अधिक सुंदर करून जगण्याच्या रिले रेस मधून एक्झिट व्हायच आहे.
तुमचा आजोबा
शैलेश शिरसाठ.

Saturday, 12 August 2017

शाळेत आपण परीक्षा घेणारे परीक्षक की मुक्त अनुभव देणारे सुलभक ?

माझ्या 'We Smart' शिक्षक,पालक प्रशिक्षणातील एक महत्त्वाचा भाग..👇 जगातील सगळ्यात सोपं काम परीक्षा घेणं तेही दुसऱ्याची आणि मग मोठ्या दिमाखात यश ठरवणे...काय चांगलं, उत्कृष्ट,एक नंबर आणि शेवटचा नंबर..हा पहिला तो दुसरा तो शेवटचा असा गुणानुक्रमांक आपण काढत नसलो तरी समाजातील काही घटक अघोषित गुणानुक्रमांक ठेवतात परंतु खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना आपण निश्चित केलेली परीक्षा आणि तिचे निकष योग्य न्याय देऊ शकतात का?..याचाही विचार व्हावा. 

मी व्यक्तीशी असं मानतो की शिकवण हे कृत्रिम तर शिकण हे नैसर्गिक आहे.म्हणूनच आपण शिक्षकापेक्षाही सुलभकाच्याच भूमिकेत असले पाहिजे. कुणी शिकल तरच आपल शिकवण खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत,नाही तर व्यर्थच. तुम्ही कोणाला शिकवू शकत नाही जोपर्यंत की कोणी शिकत नाही,शिकण्याची नैसर्गिक इच्छा आणि कृती होत नाही. यासाठी नेहमी मी एक उदाहरण देतो, ते म्हणजे एका इमारतीतील एका घरच्या खिडकीतून ज्या वेळेला एक १० वर्षाच मुल खाली रस्ता ओलांडनाऱ्या आजोबांकडून रस्ता कसा ओलांडून नये हे शिकतो.ज्या वेळेला रस्ता ओलांडणारे आजोबा रस्त्याच्या एका बाजूनेच बघून रस्ता ओलांडतात आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका सायकल स्वाराला धडकतात.आपल्या घराच्या खिडक्यांतून बघणारा तो दहा वर्षाचा मुलगा रस्ता ओलांडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे हे आजोबांच्या उदाहरणावरून शिकतो. या प्रसंगात आजोबांनी त्या मुलाला काहीही शिकवले नाही किंबहुना आजोबांना हे ही माहितीच नाही की कुणीतरी त्यांना बघत आहे आणि त्यांच्या चुकीमधून शिकत आहे. इथे शिकवण्याची क्रिया झाली नाही पण शिकण्याची क्रिया झाली. मला असं वाटतं शिकणं हे असंच नैसर्गिक आहे त्यामुळे आपण कोणाला शिकवू शकत नाही कुणाला शिकायचं असेल तर मात्र ती व्यक्ती स्वयंप्रेरणेने शिकू शकते. आपण शिकण्याची परिस्थिती निर्माण करून देऊ शकतो अर्थात शिकण्याच वातावरण  निर्माण करून सुविधा पुरवणाऱ्या सुलभकाच काम अधिक महत्त्वााचंं आहे.✍️ शैलेश.
shaileshshirsath.blogspot.com Special Thanks (photo Image Courtesy) Swastik Arora--Pixabay Image Added on December7th 2023