एका एकत्र कुटुंबात आजीने खूप रुचकर स्वादिष्ट स्वयंपाक बनवला होता परिवारात 10 शाळकरी मुलं होती त्यापैकी फक्त तीन मुलांनीच व्यवस्थित जेवण केले.
आजीने सर्व मुलांना आग्रहाने वाढले परंतु उरलेल्या सात मुलांना भूक नव्हती ,खायची इच्छाच होत नव्हती.
आजी त्यांना प्रेमाने भरवायला देखील तयार होती आणि आजोबा मात्र आजी वर चिडले आणि आजीने बनवलेला स्वयंपाक आणि घेतलेली मेहनत याचा कुठलाही विचार न करता आजीलाच उलट दोष देऊ लागले.
आजी म्हणाली "तुम्ही स्वादिष्ट रुचकर आणि सकस आहार मेहनतीने आणि प्रेमाने बनवू शकतात, खाणाऱ्यांसाठी ताट तयार करून देऊ शकतो.खूप काळजी आणि प्रेम म्हणून तोंडात घासही भरून देऊ शकतो परंतु तो आनंदाने ग्रहण करून चावून पचवण्याचं काम मात्र मुलांना कराव लागेल अर्थात हे सगळं तेव्हा ज्या वेळेला मुलांमध्ये भूक असेल भूकच नसल्यास ते कसे खाणार..."
आजोबांचं जेवण झालं होतं तरीही आजीने बनवलेले एक दोन पदार्थ आजोबांनी मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्यांना शाळेत विद्यादानाचं काम केलेल्या आजीचं म्हणणं पटलं. मग आजी म्हणाली "कदाचित माझं काही चुकत असेल म्हणून उद्यापासून तुम्ही स्वयंपाक करा". आजोबा घाबरल्या आणि ओशाळलेल्या चेहऱ्याने खिडकीतून बाहेर आकाशात चंद्र शोधू लागले... हे माहीत असताना की आज अमावस्या आहे..
Wednesday, 29 April 2020
मित्रांनो विविध प्रकारच्या चवी बद्दल जाणून घेऊ या.
Taste & Flavors from Around the World with Examples (In English and
Marathi) .
या माहिती लेखाच्या खाली विविध खाद्यपदार्थांच्या चवीं सोप्या इंग्रजी वाक्य रचनेसह समजून घेण्यासाठी यासाठी लिंक दिली आहे त्यानुसार आपण वाचन लेखन तसेच संभाषण सराव करू शकता आणि PDF डाऊनलोडही करू शकत
1. Sweet (गोड)
- *Meaning*: A
taste sensation that is often associated with sugar.
- *Examples*:
- *English*:
Chocolate, cakes, candy
- *Marathi*: पेढा,
जलेबी,
बर्फी
2. *Sour (आंबट)*
- *Meaning*: A
sharp, tangy taste typically found in citrus fruits.
- *Examples*:
- *English*:
Lemon, yogurt, vinegar
- *Marathi*: लिंबू,
ताक,
चिंच
3. *Salty (खारट)*
- *Meaning*: A
taste that is associated with salt.
- *Examples*:
- *English*:
Pretzels, salted nuts, chips
- *Marathi*: चिवडा,
शेंगदाणे,
फरसाण
4. *Bitter (कडू)*
- *Meaning*: A
sharp, pungent taste that is often found in certain vegetables and herbs.
- *Examples*:
- *English*:
Coffee, dark chocolate, bitter gourd
- *Marathi*: कारले,
मेथी,
काळी
कॉफी
5. *Umami (उमामी)*
- *Meaning*: A
savory taste often described as meaty or brothy.
- *Meaning*: A hot,
burning taste typically associated with peppers.
- *Examples*:
- *English*:
Chili peppers, hot sauce, curry
- *Marathi*: मिरची,
झणझणीत
मिसळ, चिकन करी
7. *Astringent (तुरट)*
- *Meaning*: A dry,
puckering taste often found in certain fruits and vegetables.
- *Examples*:
- *English*:
Unripe bananas, pomegranate, tea
- *Marathi*: कच्चे
केळे, डाळिंब, चहा
8. *Savory (खारट व मसालेदार)*
- *Meaning*: A
flavor that is salty and rich in taste, often associated with meat and broths.
- *Examples*:
- *English*: Beef
stew, soy sauce, mushroom soup
- *Marathi*: मटण
रसा, सोया सॉस, मशरूम सूप
9. *Tangy (तिखट-आंबट)*
- *Meaning*: A
sharp taste that is both sour and slightly spicy.
- *Examples*:
- *English*:
Barbecue sauce, tamarind, pickles
- *Marathi*: बार्बेक्यू
सॉस, चिंच, लोणचे
10. *Earthy (मातीचा/भूखंडाचा स्वाद)*
- *Meaning*: A
rich, deep flavor often associated with root vegetables and certain mushrooms.
- *Examples*:
- *English*:
Beets, truffles, potatoes
- *Marathi*: बीट,
आलं,
बटाटे
CombiningFlavors
Many dishes combine multiple flavors to create a complex and
delightful taste experience. For example:
- *English*: Sweet and sour chicken combines sweet and tangy
flavors.
- *Marathi*: गोड-आंबट चिकन गोड आणि आंबट स्वाद
एकत्र आणते.Flavors
from Around the World with Examples (In English and Marathi)
विविध खाद्यपदार्थांच्या चवीं सोप्या इंग्रजी वाक्य रचनेसह समजून घेण्यासाठी यासाठी लिंक दिली आहे त्यानुसार आपण वाचन लेखन तसेच संभाषण सराव करू शकता आणि PDF डाऊनलोडही करू शकता.Get free PDF of our Types of tastes with sentences formations just visit_* Download PDF of Types of tastes 👇🏻
विद्यार्थ्यांना इंग्रजीत उत्तर द्यायला प्रोत्साहित करूया.
विद्यार्थ्यांची भूमिका:
वस्तू नीट पाहा आणि इंग्रजीत उत्तर द्या: “This is a chair.”
कधी कधी त्या वस्तूपर्यंत जाऊन तिचे नाव सांगा.
उदाहरण:
शिक्षक दरवाज्याकडे बोट दाखवून विचारतील: “What is this?”
विद्यार्थी म्हणेल: “Door.”
३. चित्र आणि शब्द जुळवा (Match the Word with Picture)
शिक्षकाची भूमिका:
चित्रे व वेगळे शब्द असलेले फ्लॅशकार्ड/वर्कशीट द्या.
विद्यार्थ्यांना जुळविण्यास मार्गदर्शन करा.
विद्यार्थ्यांची भूमिका:
'dog'हा शब्द 🐕 चित्राशी,'cat'हा शब्द 🐈 चित्राशी जुळवा.
उदाहरण:
मांजराचे चित्र → विद्यार्थी “cat” हा शब्द त्याखाली चिकटवतो.
४. वर्तुळ खेळ – चित्र पुढे द्या (Circle Time ‘Pass the Picture’)
शिक्षकाची भूमिका:
एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकार्ड द्या.
पुढे देण्यापूर्वी त्या वस्तूचे नाव सांगायला सांगा.
विद्यार्थ्यांची भूमिका:
“Dog.” असे म्हणून कार्ड पुढे देतील.
पुढचा विद्यार्थी ते पुन्हा बोलेल.
उदाहरण:
पहिला विद्यार्थी: “Sun.”
पुढचा विद्यार्थी: “Sun.”
५. “मी बघतो आहे” खेळ (I Spy Game)
शिक्षकाची भूमिका:
म्हणा: “I spy with my little eye something that is red.” (apple, bag, इ.).
हिंट/क्ल्यू द्या.
विद्यार्थ्यांची भूमिका:
अंदाज लावा आणि शब्द बोला.
उदाहरण:
शिक्षक: “I spy something round and used for playing.”
विद्यार्थी: “Ball.”
शिक्षकाची भूमिका (Teacher’s Role – Summary)
शब्दांचा स्पष्ट उच्चार करून वारंवार पुनरावृत्ती करणे.
हावभाव, बोट दाखवणे, खऱ्या वस्तू वापरणे.
संपूर्ण वर्गाने एकत्र उच्चार करावा यासाठी प्रोत्साहित करणे.
योग्य उत्तर दिल्यास विद्यार्थ्यांना कौतुकाने प्रोत्साहित करणे.
कमी आत्मविश्वास असलेल्या विद्यार्थ्यांना हिंट देणे, तर चांगले उत्तर देणाऱ्यांना पुढे नेणे.
विद्यार्थ्यांची भूमिका (Students’ Role – Summary)
चित्रे आणि वस्तू लक्षपूर्वक पाहणे.
ऐकून शब्दांचा मोठ्याने उच्चार करणे.
शिक्षक विचारल्यास उत्तर देणे: “What is this?”
खेळात सक्रिय सहभाग घेणे (पासिंग, जुळविणे, अंदाज लावणे).
हळूहळू शिक्षक न विचारता स्वतः वस्तूंची नावे सांगणे.
अंमलबजावणीसाठी टिप:
सुरुवात खूपच परिचित शब्दांपासून करा (ball, bag, dog, sun, tree) → नंतर वर्गातील वस्तू (desk, chalk, window) → नंतर नवीन गट (फळे, प्राणी, शरीराचे अवयव).
आजोबांचे नातवांना पत्र.
माझ्या प्रिय नातवांनो तुम्हाला अनेक शुभाशीर्वाद.
तुमच्या विवाहप्रसंगापर्यंत मी तुमच्यासोबत असेलच परंतु नसलो तरी तुमच्यासाठी हे पत्र.
तुम्ही पत्र वाचा, मी सांगतोय तसंच तुम्ही करा असं नाही परंतु आजोबाच नातवांसाठी काही सांगणं आहे ते तुमच्यापुढे मांडतोय किमान त्याचा विचार करा...
मला तुमचा आणि तुम्हालाही माझा अभिमान वाटावा यासाठी हा पत्र प्रपंच ...
आयुष्य हे क्षणभंगुर असतं त्यामुळे आनंदाने जगण्यासाठी नक्कीच पैसा खर्च करा कारण पैसा तुमच्यासाठी आहे तुम्ही पैशासाठी नाही.
तुम्ही फक्त साक्षर नाही सुशिक्षितही राहाल म्हणून लग्न सोहळ्यासाठी पैसा कसा खर्च करावा याच नियोजन आणि निर्णय तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यावे.
लग्न सोहोळ्या बाबतीत विशेष मत मांडायचा मुद्दा म्हणजे 'प्री-वेडिंग शूट.'
प्री-वेडिंग लहानपणापासूनच्या आठवणीतील फोटोंची, जिव्हाळ्याच्या नात्यांची गुंफण की न घडलेल्या प्रणय प्रसंगांची सिनेमॅटिक प्रदर्शन याचा तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने विचार करा.
स्वतः पैसे खर्च करून प्री-वेडिंग शूटिंग मध्ये घडलेल्या न घडलेल्या रोमँटिक प्रसंगांचे जगासमोर मांडण्याची सिनेमॅटिक लिबर्टी आपण फोटोशूट देतांना जरा सांभाळा..फोटोशूट कसा होईल याचा निर्णय विवाह संस्कारातून जाताना मुला-मुलींनी नक्कीच घ्यावा पण त्यासोबत आपल्याला घडवणारे आई-वडिल, लाड पुरवणारे आजी आजोबा, सख्खे चुलत असा हिशोब न मांडता सतत काळजी घेणारी उत्सवप्रिय भावंडे परिवारातील सदस्य,आयुष्याच्या सुखदुःखात साथ देणारी जिवलग मित्रमंडळी यांच्या सोबतच्या आठवणींसाठी किमान एक क्लिक तरी ठेवा. लग्नाच्या तयारीसाठी आरशासमोर उभे रहा पण जुनी दुर्मिळ फोटो यांचा संग्रह ठेवा कारण आरसा गेलेला काळ दाखवत नाही जो जुने फोटो आणि आठवणी सांगतात...
तुमच कोणावर प्रेम असेल आणि त्यांच्याशी तुम्ही विवाह करताना तुम्ही विवाहपूर्वी पासून एकमेकांमध्ये किती इन्व्हॉल आहात हा अत्यंत खाजगी असणारा भाग सार्वजनिक करावसं वाटलं तर करा पण जरा भान ठेवा. तुमचं लव्ह समाजासमोर अरेंज मॅरेज द्वारे करताना तुम्ही विवाहापूर्वीच एकमेकांना ओळखता आणि प्रेमात आहात यासाठी प्री-वेडिंग मध्ये आवश्यक वाटल्यास त्याचा केवळ उल्लेख करा फालतू खाजगी फोटो आणि व्हिडिओचे बीभत्स प्रदर्शन नकोच.परंतु तुम्ही म्हणजे नवरदेव नवरी एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असाल तर प्री-वेडिंग मध्ये तुमचे अनेक वर्षापासून संबंध असल्याच खोट प्रदर्शन मांडू नका कारण ते जेवढे हास्यास्पद आहे तेवढच संतापजनक आणि तुमची बौद्धिक दिवाळखोरी काढणारेही आहे.पुन्हा सांगतो गेल्या अनेक वर्षापासून विवाहाने संस्कारित होण्यापूर्वीच तुमचे संबंध असल्याचा बनाव आणून भाकडकथा रचू नका आणि लग्न समारंभात अक्षदा टाकण्यासाठी आणि जेवणासाठी तात्काळत असलेल्या लोकांना दाखवू नका. उगाच फिल्मीपना करू नका चित्रपटांचा तुमच्यावर प्रभाव आहे हे दाखवण्यासाठी पैशाची उधळण सांभाळून करा. तुमच्या मानसिक आणि सोशल मीडियावरील विश्वाच्या समाधानासाठी तुमच्याकडे असणाऱ्या वैभवाच शक्ती प्रदर्शन समारंभातील खर्चातून जरूर करा पण त्यासोबत प्रेमाची जिव्हाळ्याची नाती आणि माणसं जपायलाही शिका.. तुमच्यासाठी लिहिलेलं हे पत्र कागदावर आहेच पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधुनिक युगात आपण आहोत तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे मीही टेक्नोसॅव्ही आहेच म्हणून तुमच्यासाठी हे पत्र डिजिटल स्वरूपात माझ्या ब्लॉगवरही अवेलेबल आहेच.
तुम्ही वापरत असलेल्या विविध गॅझेटसह तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहणारच आहात कारण आपल्याला हे जग जसं मिळालंय त्यापेक्षाही अधिक सुंदर करून जगण्याच्या रिले रेस मधून एक्झिट व्हायच आहे.
तुमचा आजोबा
शैलेश शिरसाठ.