Friday, 30 April 2021
Friday, 23 April 2021
Thursday, 22 April 2021
संविधानाचे 'फक्त वाचन' करून चालणार नाही त्यातील 'तत्त्व अंगिकारली पाहिजे'
Tuesday, 20 April 2021
हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना समर्पित ' श्वासातल अंतर
*“ जानते हो दुनिया का सबसे बडा बोझ क्या होता है...बाप के कंधोपर बेटे का जनाजा ....”*
रमेश सिप्पी यांच्या गाजलेला शोले या चित्रपटातील हा संवाद. हा फक्त एक संवाद नव्हे तर एका बापाची खंत आहे. हीच खंत,हाताशा काल दिवसभर अस्वस्थ करत होती...
*साधारण अकरा वर्षापूर्वी मी लिहिलेली 'श्वासातल अंतर ' ही कविता पुन्हा डोळ्यासमोर आली आणि मग ती एवढ्या वर्षात पहिल्यांदा आपल्या सर्वांसोबत शेअर केली...*
सध्या येणारा प्रत्येक दिवस काही अप्रिय घटना घेऊन येणारा झालाय. तसाच कालचा दिवस होता, *सध्या मी ज्या तालुक्यात आहे त्या धरणगाव तालुक्यासाठी अत्यंत दुःखद होता.*
'आपली माणसं *न सांगता सवरता आपल्यातून निघून जातात अशी खंत ' आपल्या अप्रतिम काव्यातून शिक्षिका भगिनी जयश्रीताई काळवीट यांनी काल व्यक्त केली...*✍️
आपण सारेच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या परिवारांस सोबत आहोत.
काल संपुर्ण दिवसभर आणि आजही आपण सर्वांनी माझ्या कवितेला साद आणि दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.🙏
*परमेश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारं कुण्या एका शायराने खूप मार्मिक लिहिलंय तो म्हणतो,... ए खुदा अगर यह सच है दिलों के दिलों की मोहब्बत में तू बसता है, तो क्यों टूट जाते हैं दिल और तेरा वजूद बिखर जाता है.....*
*हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना समर्पित ' श्वासातल अंतर'*
माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून '...श्वासातला अंतर.... मृत्यूशय्येवर असलेल्या चिमुकल्याची जन्मदात्याला आर्त हाक..... श्वासातला अंतर. रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा लढा माझा वाढतोय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... आईचं शहाणा बाळ म्हणताना पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय.. उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन् इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं डोळे भरून पाहायचय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... कळी उमलून कसा होतं फुल रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय.... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातल अंतर वाढवायचंय .... एवढे सारं बोलून दम लागतोय अन् मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचे... तुमचाच छकुला तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा मलाही जगवतेयम्हणून तर तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय. तुझाच बाबा शैलेश शिरसाठ. ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू)
शैलेश शिरसाठ.(७३०४०८०१००)
Monday, 19 April 2021
श्वासातला अंतर... मृत्यूशय्येवर असलेल्या लेकराची जन्मदात्याला आर्त हाक
श्वासातलं अंतर....
मृत्यूशय्येवर असलेल्या लेकराची जन्मदात्याला आर्त हाक.
ll श्वासातलं अंतर. ll
रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा, लळा माझा वाढतोय..
पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय..
आईचं शहाणा बाळ म्हणताना पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय.. उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय.. पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय..
श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन् इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं डोळे भरून पाहायचयं... पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
कळी उमलून कस होतं फुल, रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय
पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट, आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय,आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय.. पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय....
एवढं सारं बोलून दम लागतोय अन् मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय.. पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
तुमचाच छकुला
तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा मलाही जगवतेय होते म्हणून तर तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय.... तुझेच पप्पा शैलेश शिरसाठ. ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू) ©
Saturday, 17 April 2021
We Smart- Speak Smart* 'Presents. *LFH* अर्थात *Learning From Home*
*We Smart- Speak Smart* 'Presents.
*LFH* अर्थात *Learning From Home*
सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना *Homonym (हाॅमनिम)* म्हणतात. चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.
*Except-एक्स्पेक्ट- शिवाय, व्यतिरिक्त, वगळता, अपवाद,* उदाहरणार्थ. No one is ready except Tope Sir. टोपेसरांखेरीज कोणीही तयार नाही.
*Expect-एक्सेप्ट- अपेक्षा करणे* उदाहरणार्थ we expect the decision.आम्ही निर्णयाची अपेक्षा करतो.
*Accept-अॅक्सेप्ट- स्वीकार करणे, मान्य करणे* Group head please accept the decision.गट प्रमुख कृपया निर्णय स्वीकारा.
______________________________________________ संवादाच्या माध्यमातून हे आणखी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात..
विजय सर: शैलेश सर शेवटी काल संध्याकाळी एकदाचा निर्णय झाला.
शैलेश सर: विजय दादा आपण हे expect ( एक्स्पेक्ट) करत होतो पण Except (एक्सेप्ट) Some people काहींना ते Accept अॅक्सेप्टच नव्हतं.
To be continued Learning from home
क्रमशः लर्निंग फ्रॉम होम.✍️
shaileshshirsath.blogspot.com
LFH अर्थात Learning From HomeHomonym & Homophones
Z.P.Upper Primary School Sheri 'Presents. 😇👇🏻
LFH अर्थात Learning From Home
सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना Homonym (हाॅमनिम) म्हणतात.तर स्पेलिंग वेगवेगळे पण उच्चारण सारखे असणाऱ्या शब्दांना '
Homophones होमोफोंन्स' म्हणतात.
चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.
✍️ शैलेश सर.
1) Right - राइट- योग्य,बरोबर
2) Right - राइट - उजवी बाजू
3) Right - राइट - हक्क ,अधिकार
4) Write - राइट - लिही, लिहिणे
👉 The man sitting in the *right* is *right* because he *writes* about his *rights.*
*उजवीकडे* बसलेला माणूस *बरोबर/योग्य* आहे कारण तो आपल्या *हक्कांबद्दल* *लिहितो.*
_______________________________________
1)Add - ऍड *जोडणे मिळविणे भर घालणे*
2) Ad - ऍड- *जाहिरात*
3) Aid - ऍड ऐड- *सहायता मदत साधन.*
4) Ad -ऍड- *इसवी सन* (इतिहासातील कलखंडांचा उल्लेख करतांना ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या तारखांपूर्वी वापरले जाते ) उदा. *AD 1857 म्हणजेच इसवी सन १८५७*
या ठिकाणी AD म्हणजे Anno Domini अँनो डोमिनाय Uk अँनो डॉमिनी US
👉 *In Ad 1970 Ad helped them to add better selling results it was best aid by Ad.Shirsath*
*इसवी सन १९७० मध्ये जाहिरातीने त्यांना चांगले विक्री परिणाम जोडण्यास मदत केली ती अॅड.शिरसाठ यांनी केलेली सर्वोत्तम मदत होती.*
_______________________________________
1) Ail - इल/ ऐल - *आजारी*
2) Ale - इल/ ऐल - *एक बिअरचा प्रकार ₹* (फळाची गुळचट चव असणारा बियर या पेयाचा एक प्रकार)
👉 He was ill so he avoided to drink ale.
तो आजारी होता म्हणून त्याने बिअर पिणे टाळले.
*Stay Home Stay Safe.*🏡 *घरी रहा सुरक्षित रहा.*
..To be continued.. Learning from home
क्रमशः लर्निंग फ्रॉम होम.✍️
shaileshshirsath.blogspot.com
Friday, 16 April 2021
Let's Enjoy Idioms and Proverbs- Learn From Home
Let's Enjoy Idioms and Proverbs.👇🏻
*To be under a person's thumb =* to be unduly under a person's control- *एखाद्याच्या वर्चस्वाखाली असणे.*
All the team members are under the thumb of .संघातील सर्व सदस्य सावधगिरी आहेत.
______________________________________________To spread like wild fire -* to circulate with astonishing speed. *बातमी वा-यासारखे पसरणे.वनव्यासारखी पसरणे.*
The news of pendamic was spread like wild fire.👉साथीच्या आजाराची बातमी वनव्या सारखी पसरली होती./साथीच्या आजाराची बातमी जंगलातील आगीसारखी पसरली होती.
*Astonishing -* *आश्चर्यकारक,धक्कादायक.*
The fact is *astonishing.*
वस्तुस्थिती *धक्कादायक* आहे.
shaileshshirsath.blogspot.com
Homonyms- Learning From Home
![]() |
*We Smart- Speak Smart* 'Presents.
*LFH* अर्थात *Learning From Home*
सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना *Homonym (हाॅमनिम)* म्हणतात. चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.
*Except-एक्स्पेक्ट- शिवाय, व्यतिरिक्त, वगळता, अपवाद,* उदाहरणार्थ. No one is ready except Tope Sir. टोपेसरांखेरीज कोणीही तयार नाही.
*Expect-एक्सेप्ट- अपेक्षा करणे* उदाहरणार्थ we expect the decision.आम्ही निर्णयाची अपेक्षा करतो.
*Accept-अॅक्सेप्ट- स्वीकार करणे, मान्य करणे* Group head please accept the decision.गट प्रमुख कृपया निर्णय स्वीकारा. ___________________________________________________ संवादाच्या माध्यमातून हे आणखी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात..
विजय सर: शैलेश सर शेवटी काल संध्याकाळी एकदाचा निर्णय झाला.
शैलेश सर: विजय दादा आपण हे expect ( एक्स्पेक्ट) करत होतो पण Except (एक्सेप्ट) Some people काहींना ते Accept अॅक्सेप्टच नव्हतं.
To be continued Learning from home
क्रमशः लर्निंग फ्रॉम होम.✍️
shaileshshirsath.blogspot.com
Thursday, 15 April 2021
शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) आणि काही प्रश्न.
शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) आणि काही प्रश्न.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संगीत,क्रीडा,सृजनशीलता, नेतृत्व,वक्तृत्व,चित्रकला यासह इतर क्षेत्रातील सर्वांगिन गुण आणि कौशल्यावर शिष्यवृत्ती परीक्षा आहे काय? तर याच उत्तर नाही असं आहे.(२१ व्या शतकात तरी स्कॉलर शब्दाची व्याप्ती खुप मोठी असलीच पाहिजे..)
या प्रक्रियेतून जो केवळ अभ्यासात हुशार त्यालाच स्कॉलरशिप मिळणार.
स्कॉलरशिप परीक्षेत आपण सर्व विद्यार्थ्यांना पास करणार आहोत का? याचंही उत्तर नाही असआहे. परीक्षेचा निकाल पात्र किंवा अपात्र असा येणार.. याचा दुसरा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आपण पास करत आहोत ( इयत्ता पहिली ते आठवी) त्या विद्यार्थ्यांना मात्र स्कॉलरशिप परीक्षा अपात्र ठरवणार. विद्यार्थ्यांच्या बालमनाचा विचार करूनच विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीच्या वर्गात पास करण्याचा निर्णय घेतला आहे कारण विद्यार्थी नापास झाल्यावर त्याच्यात न्यूनगंड वाढीस लागून विद्यार्थी एकंदरीतच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार करता आपण मूल्यमापनात विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमांकही काढत नाही कारण विद्यार्थ्यांमध्ये मी पहिला दुसरा तिसरा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. मग स्कॉलरशिप परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही. म्हणजेच कॉलरशिप परीक्षा ही मूल्यमापनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या तत्वाशी पूर्णतः विसंगत आहे.हे सारं मुल्यमापनातील विसंगती स्पष्ट करण्यास पुरेस आहे.
शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात ?
शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धापरीक्षा असू शकतात परंतु शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात किंबहुना सक्तीच्या तरी नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे.
मुळातच शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच.आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो.
विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन शिक्षका पेक्षाही सुलभकाचे काम करायचे आहेे. शिक्षण घेतांंना विद्यार्थ्यांनी ते सहज आणि आनंददायी पद्धतीने घेणे अपेक्षित आहे स्पर्धा म्हटली की ताण तणाव येणारच किमान स्पर्धेचा ताण तणाव घेणे तरी ऐच्छिक असाव. शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन अर्थात स्पर्धा नाही, म्हणून शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात की नसाव्यात, की त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्रित विचारांनी ऐच्छिक असाव्यात याचा विचार करणेही आवश्यक आहे.
व्यवसायिक शिक्षण असावे शिक्षणाच्या स्पर्धेतून निर्माण होणारं शिक्षणाचे व्यवसायीकरण असू नये.
खरे म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मोफत किंवा अत्यंत माफक असल्या पाहिजे, शिक्षणातील स्पर्धांमुळे शिक्षणात व्यवसायीकरण झाले आहे. एवढ्या शिक्षणातील स्पर्धा असल्यावरही आज देशात आरोग्य सुविधांमध्ये काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये देशात असल्यावरही गणपती आणि दिवाळीला आपण लाइटिंग चायनाचीच घेतोय, बाजारातील साध्या वीस ते पंचवीस रुपयाच्या पायतानापासून महागड्या वस्तू मोठ्या प्रमाणात आपण परदेशातून आयात करतोय आपल्या देशाच्या एकूण आर्थिक बाबतीत अनेक घटकांचा समावेश असला तरी शिक्षण हा महत्वाचा घटक त्याच्या मुळाशी आहे.
कारण विकसित देशांमधील आर्थिक वृद्धी शैक्षणिक ध्येयधोरणांवर आधारित आहे आणि शैक्षणिक धोरणात कौशल्यास महत्त्व आहे, शिक्षणातील स्पर्धेस नाही, म्हणून आपण ज्या देशातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात करतोय त्या देशातील शालेय विद्यार्थी सुद्धा घरातील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कामे स्वतः करु शकतात. आपल्याकडे मात्र आपण दैनंदिन उपयोगात येणारे व्यवहारिक काम न करता किंवा करू देता केवळ परीक्षेसाठी उपयोगी असणारे मार्क्स वाढवून देणार या घटकांचा अभ्यास करतो.शिक्षणातील स्पर्धेतून वैद्यकीय प्रवेश - त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा - आणि मग आता औषध उपचार मिळण्यासाठी रांगेत उभा राहून उपचार घेण्याची स्पर्धा... अशा दृष्टचक्रात आपण कसे अडकलो आहोत याचाही विचार करावा लागेल...✍️
- शैलेश शिरसाठ,जळगाव.(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून)