Friday, 27 January 2023

मतदानासाठी पैसे देण्याचा आणि घेण्याचा विकास कामांशी काहीएक संबंध नाही पैसे दिलेत म्हणून विकास कामे होणार नाही जेवढे हास्यास्पद आहेत तेवढेच संतापजनक देखील

मतदानाच्या दिवशी काही लोक मतदान करण्यासाठी पैसे घेतात आहे पण शंभर टक्के लोक पैसे घेत नाहीत ज्या लोकांनी पैसे घेतले नाही त्यांना सोयी सुविधा द्याव्याच लागतील. असं क्षणभर गृहीत धरूया की 100% लोकांनी पैसे घेतले, असे असले तरी याचा अर्थ असा मुळीच होत नाही की लोकप्रतिनिधींनी सुविधा आणि आपले कर्तव्य बजवायचे नाही कारण तुम्ही पैसे दिलेत काय किंवा नाही दिले काय तुम्ही विकास कामांसाठी कटिबद्ध आहातच. मतदारांना पैसे देऊनही तुम्हाला रस्ते आणि सोयी सुविधा द्याव्या लागत आहेत तर मग पैसे देणे बंद करा.. लोक पैसे घेतात हे जरी खरं असलं तरी तुम्ही पैसे देऊ नका फक्त विकास काम करा.. आणि ज्या ज्या कॉलनीत ज्या लोकांनी पैसे घेतले आहेत त्यांना त्या रस्त्यांवरून फिरू देऊ नका त्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.पैसे घेतलेल्यांची यादी देखील प्रसिद्ध करा म्हणजे त्या त्या कॉलनीतल्या,गल्लीतल्या लोकांना हे कळेल की नेमकं कोणाच्या पैसे घेण्यामुळे आपले रस्ते होत नाही ते...म्हणजे दोष लोकप्रतिनिधींवर नाही तर पैसे घेणाऱ्यांवर येईल.. आणि काही मतदारांना पैसे देऊन देखील विकास काम करावेच लागणार असतील तर लोकप्रतिनिधी देखील पैसे देणार नाहीत.. मतदानासाठी पैसे देण्याचा आणि घेण्याचा विकास कामांशी काहीएक संबंध नाही पैसे दिलेत म्हणून विकास कामे होणार नाही जेवढे हास्यास्पद आहेत तेवढेच संतापजनक देखील.... माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून'... शैलेश शिरसाठ,जळगाव

No comments:

Post a Comment