Tuesday, 19 December 2023
मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात
मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात. कारण मैदानी खेळ हे आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
नैसर्गिक संकटात,आपत्कालीन परिस्थितीत ओपन स्पेस मोकळ्या असल्यास उपयोगी ठरतात. याखेरीज ओपन स्पेस आणि मोफत खेळाच्या मैदानांचा उपयोग मुलांच्या शारीरिक,बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे, अन्यथा ही मुलं चौका चौकातील कट्ट्यांवर टवाळक्या करताना दिसू शकतात किंवा मोबाईल मध्ये आर्थिक आमिष दाखवणारे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यास बाधक खेळ खेळू शकतात.
ओपन स्पेस चा उपयोग समाजातील प्रत्येक घटकासाठी एक बाग म्हणून आणि मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण म्हणून असले पाहिजे कारण खाजगी जागेत क्वचितच कोणी मुलांना मोफत खेळू देईल,काही ठिकाणी तासांवर पैसे देऊन खेळण्याची सोय आहे असे असले तरी मुलांच्या खेळण्याच्या हक्काच्या जागेवर जर इतर कुठलाही प्रकारच काही उभारल जात असेल तर मग मुलांनी कुठे खेळायला जावे? कारण खिशात पैसे नसताना देखील मैदानावर घाम गाळता आला पाहिजे म्हणजे शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि मैदानावरील सांघिक खेळामुळे संघभावनाही वाढीस लागेल.तुमच्या परिसरातील ओपन स्पेस फक्त मुलांना खेळण्यासाठी आणि गरज़ वाटल्यास शांतपणे अभ्यासासाठी पूर्णवेळ उपलब्ध आहेत का ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment