Song Courtesy - Marathi Melodies
Friday, 2 February 2024
ज्ञानोबा,तुकोबांच्या मानवतावादी संत परंपरेचे वाहक आणि विद्रोहाचे पाईक पूज्य साने गुरुजींच्या अमळनेरात १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे.यानिमित्ताने'श्यामची आई'पुस्तकापलीकडील समतेसाठी लढा देणाऱ्या विद्रोही पांडुरंगाला अर्थातच साने गुरुजींना समजून घेऊयात.
मातृहृदयी साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील लढवय्ये क्रांती सेनानी होते याखेरीज शेतकरी,कामगार आणि दलितांसाठीही त्यांनी प्रेरणादायी लढे दिले.त्यातील महत्त्वाचा लढा म्हणजे पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा.कष्टकऱ्यांचा देव विठोबा. मात्र अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना कित्येक वर्षापासून पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नाकारला जात होता.जातीपातीत भेद करणाऱ्या कर्मठ व्यवस्थेने, विठोबाच्या बडव्यांनी खुद्द संत चोखोबांना देखील मंदिरात प्रवेश नाकारला होता.भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू असतांना पांडुरंग दर्शनाला जातीपातीतून स्वातंत्र केलं पाहिजे या समतेच्या मानवतावादी विचाराने साने गुरुजींनी सर्व जातीपातींसाठी पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा सुरू केला.
सर्व भाविकांना मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला विठोबाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी साने गुरुजींनी उपोषण सुरू केले. स्वतः ब्राह्मण जातीतून आलेला एक पांडुरंग गांधीवादी मार्गाने अस्पृश्यांच्या मानवी हक्कासाठी लढत असतांना देशाने पाहिले.त्यावेळी प्रतिगामी विचारांच्या कर्मठ सनातन्यांनी "जाओ साने भीमापार नहीं खुलेगा विठ्ठलद्वार" आशा घोषणा देऊन साने गुरुजींना विरोध केला.
शेवटी साने गुरुजींच्या लढ्यास यश आले,मंदिर प्रवेशाच्या मार्गातील बडव्यांची अडचण दूर झाल्याने १० मे १९४७ रोजी रात्री आठ वाजता साने गुरुजींच्या उपोषणाची सांगता झाली.
सानेगुरुजींच्या कर्मभूमी असणाऱ्या अमळनेरात १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ३ व ४ फेब्रुवारी रोजी होत आहे आपणास आग्रहाचे बोलावणे.🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment