सन्माननीय प्रभारी मुख्याध्यापक
आपल्या शाळेची शैक्षणिक (?) सहल मंगळ ग्रह मंदिरावर जाऊन आली. शैक्षणिक सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेऊन काही नवीन गोष्टी शिकता याव्यात तसेच मौज मजा मस्ती करून आनंददायी अनुभव घेता यावा असा असावा किंबहुना तो तसाच आहे हे आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सांगावंस वाटतं.
आपल्या शाळेची सहल मंगळ ग्रह मंदिरावर गेल्यावर त्या स्थळाबद्दल काय बोध घेतला असणार ? तिथे होणाऱ्या कर्मकांडांबद्दल काय सांगणार? मंदिराच्या गेट वर लिहिले आहे की, 'ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा'याचा अर्थ आपल्या हाती काही नसून ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्या नशिबात जे लिहिल आहे तेच होईल.पण ग्रहांच्या स्थितीनुसार नेमकं काय लिहिल आहे हे परफेक्ट सांगणारी यंत्रणा कुठे आहे हेही कळायला मार्ग नाही. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह नेमक काय म्हणतो ? आणि आकाशातील ग्रहताऱ्यांनुसार आपले भविष्य शोधण्याचा प्रयत्न केला असता, विविध ग्रहांच्या शांती करत नशिबावर अवलंबून राहण्याचा अंधश्रद्धाळूपणा केला असता तर स्वराज्य निर्माण केले नसते .'ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा' असा अविवेकी,अंधश्रद्धाळू विचार जर जिजाऊंनी आणि शिवबांनी केला असता आणि सर्व कार्यभार आकाशातील ग्रह, ग्रह शांत करणाऱ्या कर्मकांडात आणि परमेश्वरावर सोडून दिल असतं तर दैदीप्यमान इतिहास घडला नसता म्हणून चिकित्सकपणे विचार करा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की खरंच ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा ? हेही आवर्जून लक्षात ठेवा की आपला महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीचा पुरोगामी महाराष्ट्र आहे.
विद्यार्थ्यांपुढे शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला गेला पाहिजे कारण आपली भारतीय राज्यघटना आपल्याकडून खालील अपेक्षा व्यक्त करते त्या अशा 👇
(There is one duty that is unique to India under Article 51A (h) 'It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and unionism'. म्हणजे👉
'शोधकबुद्धी,धर्मसुधारणा मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आपण सर्वांनीच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे.✍
विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो. कारण विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजाकडून खूप काही चांगल आणि वाईटही शिकत असतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जर शिकवला गेला नाही तर आपण खूप मोठी चूक करत आहोत असं मला व्यक्तीशः वाटतं. व्यक्तीला उपासना आणि कर्मकांड करण्याचा अधिकार जरी असला तरी शाळेसारख्या ठिकाणी जिथे वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी असतात तिथून कोणत्याही अंधश्रद्धांनी युक्त कर्मकांड होणार्या अवैज्ञानिक स्थळाला शैक्षणिक सहलीच्या नावाने भेट देणे कितपत योग्य आहे ? याचा जबाबदार सुशिक्षित नागरिक म्हणून विचार होणं देखील महत्त्वाच आहे.
राज्यघटनेने सांगितलेल्या आपल्या कर्तव्यांना मुठ माती देऊन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्यासारख्या सुलभक आणि मार्गदर्शकाच्या भूमिकात असणाऱ्यांनी भान ठेवणे अत्यावश्यक आहे.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या 'मंगल'मय🙂 शुभेच्छा.✍️शैलेश
No comments:
Post a Comment