प्रिय नातवंडांना सप्रेम नमस्कार.
अध्ययन अध्यापनाचे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून काम करण्याचा आनंद मी घेत होतो राजकारणासारख्या विषयावर बोलणं आणि लिहिणं शक्यतोवर मी टाळत होतो आपलं काम हे अध्ययन अध्यापनाचे आहे तेच आपण करावा असं वाटत होतं परंतु देशात अशा काही सामाजिक आणि राजकीय गोष्टी घडत होत्या ज्यामुळे मी अस्वस्थ झालो आणि मग ठरवलं की या देशातील एक सुशिक्षित भारतीय नागरिक आणि त्याहीपेक्षा शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीने पाखंडवादाच्या विरोधात,अविवेकाच्या विरोधात, अज्ञानाच्या विरोधात आणि देशाचे जाती-धर्मात क्लेश पसरवून तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात मी बोललो आणि लिहिला पाहिजे मी तेच केलं जे एका प्रामाणिक भारतीयाने करायला पाहिजे...
सोशल मीडियावर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य वाचायला मिळालं, ते म्हणजे 'गुलामाला गुलाम असण्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.'हे वाक्य अत्यंत प्रेरणादायी आहे. याखेरीज चिकित्सा करून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या, अभ्यास,वाचन असणाऱ्या विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने सुशिक्षित असणाऱ्या लोकांसाठी एक आवाहनही वाटत. अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची प्रेरणा देणारा संदेश आहे की 'गुलामाला गुलाम असण्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.'
एका गुरुच हे काम आहे की समाजातील अज्ञान, अंधकार,अविवेकीपण,पाखंडवाद याच्यावर अभ्यासपूर्ण विवेचन करून मार्गदर्शकापेक्षाही सुलभाकाच्या भूमिकेत असण्याची.
सर्वच गुलाम न समजून घेण्याच्या भूमिकेत असतात असे नाही. आपल्याला गुलाम केलं जातंय याची जाणीव देखील काही अंधभक्तीत अडकलेल्या गुलामांना नाही, किंबहुना आपण जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला असता तेच आपल्यावर बंड करून उठताय अशी भयंकर परिस्थिती आहे.
जेव्हा लोक भितीमुळे,लालसेमुळे किंवा प्रचंड अज्ञानामुळे तुम्हाला साथ न देता अविवेकीपणाला,पाखंडवादाला आणि अंधश्रद्धेला साथ देतात त्यावेळेला खूप वाईट वाटते.
No comments:
Post a Comment