"धर्म अफूची गोळी आहे."- कार्ल मार्क्स.
काल मार्क्स यांच्या वक्तव्यात कुठलाही एक ठराविक धर्म अभिप्रेत नव्हता त्याचे हे मत एकूणच धर्म या विषयाबद्दल होते.आता धर्म ही अफूची गोळी आहे हे वाक्य कुठल्याही धर्माचा अपमान करण्यासाठी नसून धर्माचा उपयोग माणसांच्या मेंदूमध्ये एक प्रकारची झिंग चढवून त्यांना इतर धर्मीयांच्या विरोधामध्ये भयंकर आणि क्रूर असे कृत्य करण्यासाठी किती सहजपणे केला जाऊ शकतो हे नमूद करण्यासाठी म्हटले आहे,
धर्माच्या माध्यमातून भावनिक गरज ही बौद्धिक आणि वैचारिक गुलाम बनवत तर नाही ना याचाही विचार केला पाहिजे,कारण सगळ्या प्रकरणात चूक धर्माची नसून चूक त्या धर्माला चुकीच्या प्रकारे अनुसरण करणाऱ्या आणि तशी मांडणी करणाऱ्या लोकांची आहे.
हजारो वर्षापासून भोळ्या भाबड्या लोकांना खऱ्या ज्ञानाची, साक्षरतेची कवाडं बंद करणाऱ्या व्यवस्थेने धर्माची मांडणी अफूच्या गोळी सारखी केलेली दिसून येते त्यामुळे माणसांना गुलाम बनवून ठेवण्यासाठी, त्यांच्या मेंदूत धर्माची झिंग चढवून,धर्माची भूल देऊन वापर होत आल्याचे लक्षात येते.
खर पाहता धर्माची मुळात मांडणी माणसांच्या नैतिक आचरणाशी,नैतिक व्यवहाराशी संबंधित आहे आणि ती तशीच मांडण्याचा प्रयत्न करणारे खरे लोक आहेतच पण त्यांचा देखील सामना हा धर्माच्या चुकीच्या मांडणी करणाऱ्या लोकांशी आहे हे विसरता कामा नये. धर्माची मांडणीच माणसाच्या नैतिक आणि विधायक आचरणाशी संबंधित आहे आणि ती मांडणी तशीच ठेवण्याचं भान समाजातील सर्वच घटकांचे होते,आहे आणि राहील...✍️ - शैलेश शिरसाठ.
No comments:
Post a Comment