गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री...
आज सकाळी घराबाहेर पडताना मी घड्याळाकडे पाहिलं अजून दहाला दहा मिनिटं शिल्लक होती म्हणून वृत्तपत्र चाळत होतो तेव्हा सुप्रसिद्ध कवी, गझलसम्राट सुरेश भट यांच्या गजलीतला शेर सहजच आठवला त्यात ते म्हणतात.
"गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही.."
या निमित्ताने गझलीतील आनंद /अस्वस्थता जाणून घेऊ या..
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री.
अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही
येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता उठाव नाही
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही
उच्चारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
- गझल सम्राट सुरेश भट.
No comments:
Post a Comment