Monday, 13 January 2025

 संस्कृतीच्या नावावर जीवघेण्या मांजाचा आणि गांजाचा कसा करावा स्वीकार....?

आपल्याकडे पतंग उडवण्याचा खेळ अनेक वर्षापासून खेळला जातो विशेषतः मकर संक्रांति या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. यात आपल्यासह इतर बांधवांचा आनंद देखील महत्त्वाचा आहे परंतु सध्या मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा होत असताना. अधिक तीक्ष्ण मांजा देखील वापरण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

मुळात आपली पतंग हवेत उंच उडवण्याचा आनंद घेत असताना दुसऱ्याची उडणारी पतंग कापून त्याचा आनंद हिरावून घेण्याची कसली ही स्पर्धा ?

आता यात फक्त चायनीज मांजा नाही तर इतर मांजा देखील तेवढाच घातक आहे कारण आपण बऱ्याचदा आपण करत असलेल्या चुकांचं खापर शेजारील राष्ट्रांवर टाकत असतो. मांजाचा धागा किंवा त्यावर काच किंवा एखादी धातूचा पदार्थ लावला जातो त्यामुळे तो अत्यंत घातक आहे.

पतंग महोत्सवाला आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग समजत असलो तरी गेल्या काही वर्षात पक्षी, प्राण्यांचा जीव गेला आहे. माणसांना गंभीर जखमा देखील झाल्या आहे आणि काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.


 गांजा सेवनामुळे स्मरणशक्ती एकाग्रता कमी होणे सारख्या समस्या निर्माण होऊन मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतात.

जगभरात व्यसनाधीनता वाढत असताना भारतात देखील व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशातच एखाद्या व्यसनाचे समाज घटकांचा माध्यमांनी कसल्याही प्रकारचे उदात्तीकरण करणे हे चुकीचेच आहे.

मकर संक्रांति पासून तीळ तीळ म्हणजे थोडा थोडा दिवस वाढत जातो,आणि रात्र कमी होत जाते.अपेक्षा करूयात की अज्ञानाचा अंधकार हळूहळू कमी होऊन ज्ञानाचा प्रकाश असाच तीळ तीळ तरी वाढत राहील. 

सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा.

- शैलेश शिरसाठ,जळगाव.



No comments:

Post a Comment