याच प्रकारे जगाने सन्मानित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याच देशात काळाराम मंदिरत प्रवेश नाकारला होता या खेरीज महाड येथील तळ्याचे पाणी पिण्याचा अधिकार ढोरांना, पशुपक्ष्यांना किड्या मुंग्यांना होता परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि दलित,शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींना नव्हता तेव्हा चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळा राम मंदिराचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अशा प्रकारची बंदी होती, आंबेडकरांना देखील बंदी होती आणि आता छत्रपतींच्या वारसदार असणाऱ्या संयोगिताराजे भोसले यांना देखील बंदी घातली गेली... फरक एवढाच आहे की जो धर्म आम्हाला स्वीकारत नाही तो माणसाला माणूस म्हणून वागणूक न देणारा भेदाभेद करणारा धर्मच मी देखील स्वीकारत नाही असं म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करुणामयी,समतावादी न्यायवादी आणि माणसा माणसात भेद न करणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
सध्या संविधान जागर कार्यक्रम घेत आहोत कारण भारतीय संविधान जात,पंथ,धर्म,लिंग,वर्ण असा कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून एक माणूस म्हणून जगण्याचं संरक्षण देत. तुम्ही देखील संधी मिळाल्यावर भारतीय संविधानावर बोला कारण आयुष्य खूप छोट आहे आणि माणसाचा जगण्याचा अधिकार खूप मोठा आणि निरंतर आहे. आपल्या गेल्यानंतर देखील या सृष्टीवर अनेक वर्ष माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्नांचा भाग होऊया....✍️
- शैलेश
No comments:
Post a Comment