Sunday, 9 February 2025

आम्ही सेफ टेकऑफ केले आहे आता आम्हाला सेफ लँडिंग करू द्या..

आम्ही सेफ टेकऑफ केले आहे आता आम्हाला सेफ लँडिंग करू द्या.. 
Supervision OR Support vision.

 सर्व प्रवाशांना घेऊन वैमानिकाने (पायलटने) अडथळ्यांवर मात करत अतिशय सेफ आणि स्मूथ टेकऑफ केलेले होते... 
परंतु इच्छित स्थळी सेफ लँडिंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे त्याने जमिनीवरील अधिकाऱ्यांना त्याच्या लँडिंगसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून संपर्क साधला. "सर माझ्याकडे पुढील वीस मिनिट पुरू शकेल एवढाच इंधन साठा आहे कृपया मला लँडिंगसाठी जागा उपलब्ध करून द्या आणि कृपया मार्गदर्शन करा." त्याला मार्गदर्शन करणारा अधिकारी मात्र त्याला तो उडवत असलेल्या विमानाबद्दल तसेच प्रवाशांबद्दल माहिती विचारू लागला जसे की तू टेकऑफ केलेल्या विमानाच्या इंजिनाची क्षमता किती आहे ?, विमानाचे नेमके टेक्निकल स्पेसिफिकेशन काय ? त्याचप्रमाणे प्रवाशांमध्ये वर्गवारी कशा प्रकारची आहे ? त्या प्रवाशांच्या नावाची यादी वगैरे वगैरे. 

पायलट अधिकाऱ्याकडून सेफ लँडिंगसाठी मार्गदर्शनाची विनंती करत होता.पण अधिकारी मात्र त्याला ओरडून म्हणाला,"तू मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस मी सांगतो तेवढी माहिती मला आत्ताच्या आत्ता सांग." पायलट चे पाय लटलट करू लागले त्याला भीती वाटू लागली की बहुदा आता विमान क्रॅश होणार आणि आपल्या सकट प्रवासी देखील क्रॅश होणार.. आणि विमान जमिनीवर क्रॅश होऊ लागले.. मोठा आवाज झाला आणि मी मोठ्याने ओरडलो "वाचवा.." मी देखील सोफ्यावरून खाली फेकले गेलो कारण मी सोफ्यावर झोपलो होतो आणि मला हे स्वप्न पडलं होतं.

 मी आईला स्वप्न सांगितलं आई म्हणाली, "अरे तू शिक्षक आहेस पायलट नाही, पण काल तुझ्या बाबांसोबत गप्पा मारत असताना तुझ्या बाबांनी तुला सांगितलं की शिक्षकाचे काम देखील पायलटासारखाच असतं. तू त्याचा विचार केला असशील म्हणून कदाचित तुला असं स्वप्न पडलं असेल. तू प्रथम असा विचार करणं सोड नाहीतर असाच असर होईल असं म्हणून आई-बाबा हसू लागले पण मी सुन्न झालो होतो.✍️




No comments:

Post a Comment