जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथे आज दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना नेताजींच्या देशभक्ती, त्याग, शौर्य, आजाद हिंद सेनेचे योगदान तसेच “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” या प्रेरणादायी घोषवाक्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्भीड नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, मराठी अस्मितेचे रक्षण व त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

No comments:
Post a Comment