हिंद की चादर – राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाठ येथे “हिंद की चादर” या अत्यंत हृदयस्पर्शी व प्रेरणादायी राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांतर्गत आज दिनांक २२ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शीख धर्माचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर सिंहजी यांच्या त्यागमय व प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित गीत ऐकवण्यात आले. सदर गीतातून सत्य, अन्यायाविरुद्ध लढा व बलिदानाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गीत ऐकताना विद्यार्थी अत्यंत शांतपणे व भावनिकरित्या कार्यक्रमाचा अनुभव घेत होते.
कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू नामदेव पाटील तसेच उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ उपस्थित होते. गुरु तेग बहादूर सिंहजी यांच्या महान त्यागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व अशा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाचे भावना अधिक दृढ झाली.
सदर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.


No comments:
Post a Comment