भारत मातेचे सुपुत्र, महान युद्धवीर महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट येथे आज दिनांक 19 जानेवारी 2026, सोमवार रोजी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शाळेतील उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्यप्रेम व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तसेच इतर शिक्षकांनीही त्यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
विद्यार्थ्यांनी शांत व शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धैर्य व आत्मसन्मानाच्या मूल्यांची जाणीव निर्माण झाली.

No comments:
Post a Comment