Saturday, 28 February 2026

 Use Resources of the city.✍️

आमची मुलं मुंबई-पुण्यात शकतात किंवा आम्ही शहरात राहतो याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील किंवा त्या त्या शहरातील  रिसोर्सेस किती उपयोगात आणतो. या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.पुण्यात राहणं,शिकणं म्हणजे पुण्यात किंवा कुठल्याही शहरात  उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे.✍

आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं  पसंत का करतो ?  याची अनेक कारणं असली तरी आपल्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो.

परंतु असे असले तरी  शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपण घेतो अस मला वाटतं...विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम दाखवा.... दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की पहा.✍

आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं...

अजिंठा फिल्म सोसायटी - कान्ह ललित कला केंद्र द्वारा दि.२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित  ५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०२६ - जळगाव  हा फिल्म फेस्टिव्हल "चित्रपट सृष्टी आणि भारतीय दृष्टी "या संकल्पनेला समर्पित असून यात विविध विभागांत ८० हून अधिक गुणवत्तापूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट प्रदर्शित होणार आहे तसेच मास्टर क्लास,चर्चा सत्र,चित्रपट प्रदर्शनी,फिल्म पार्क, टुरींग टाँकीज,ओपन फोरम व चित्रपट विषयक बरेच काही जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे. त्या संधीच आपण सोन करूया ५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.


 

This video is created for Thalassemia awareness on 13th November 2021 a day before Children's Day.



No comments:

Post a Comment