आपल्या कुटुंबीयांचे मतदार यादीतील नाव टिकून राहावे आणि या कामात सरांना मदत व्हावी म्हणून धडपडणाऱ्या विद्यार्थिनीच्या आणि ग्रामस्थांच्या निमित्ताने *आज सहजच (?) आठवलं म्हणून....*✍️गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची छान कविता आहे त्याचा अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी केलाय.. आता तर मला कविता शब्दशः पूर्ण आठवणार नाही पण सार थोडक्यात सांगतो...
अस्ताला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाशदाणाचं काम कोण करेल ?अशा वेळेला एक इवलीशी पणती पुढे आली आणि ती म्हणाली की, " हे सूर्या तुझ्या एवढा प्रकाश देणे मला शक्य नाही, पण एवढ आश्वासन देते की, मी जिथे असेल तिथे अंधार फिरणार सुद्धा नाही", असं म्हटल्यानंतर ती पणती पुढे जे म्हणते ते खूप महत्त्वाचं आहे....
ती सूर्याला म्हणते, "मी जिथे असेल तिथे अंधार असणार नाही कारण तुझ्या जीन्समध्ये (डीएनए मध्ये) प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्समध्ये (डीएनए मध्ये) प्रकाश आहे." *माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून....*✍️शैलेशकमल.

No comments:
Post a Comment