कोणत्या रावणाला मारणार...?
आपण ढोंगी आणि उत्सवखोर होत आहोत का?
दसरा साजरा करत असताना आपण रावणाच्या संहाराविषयी बोलणार...
रावणानंतर आपण मोगल,डज,पोर्तुगीज आणि इंग्रजांनी यासह अनेक जुलमी सत्तांविषयी बोलतो रोष व्यक्त करतो
पण इतर ठिकाणी किमान प्रश्नही विचारणार नाही जसे की सण आला की खाजगी ट्रॅव्हल्स विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि एकंदरीत सर्वांनाच वेठीस धरत दिवाळीत एवढे दर का आणि कोणत्या कारणामुळे वाढवतात?
देशात मुलांचा कुपोषणाचा विषय असताना आणि जागतिक क्रमवारी आपण शेजारच्या देशांसह अनेक देशाच्या मागे असताना नदीत प्रदूषण करत देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांना उपयोगात येऊ शकते असे पोषणयुक्त दूध नदीला अर्पण करतो. विशेष म्हणजे ते दूध वाया जातेच परंतु त्याचा देवी माता म्हणणाऱ्या नदीला प्रचंड त्रास होतो यावर कोणीच काही बोलत नाही निषेध करत नाही मोर्चा काढत नाही पण आपण दसऱ्याला रावण जरूर जाळतो.
No comments:
Post a Comment