Thalassemia major free society.
Let's work together for Thalassemia free society. Donate blood, save lives! To prevent thalassemia, let's do a thalassemia blood test before marriage and pregnancy.
'हुनर की इज्जत तब होती है, जब वह किसी के भलाई के लिए इस्तेमाल किया जाय !’ या चित्रपटातील हा सर्वात मोठा संदेश आहे. आपल्याकडे जी कला आहे, जे ज्ञान आहे ते इतरांच्या भल्यासाठी वापरणे ! बाबासाहेब डॉ. बी.आर.आंबडेकरांनी आपल्या विद्वत्तेचा वापर देशवासियांच्याच नव्हे तर मानवतेच्या भल्यासाठी केला ! चित्रपटाचा नायक ॲड. चंद्रूने आपल्या शिक्षणाचा वापर दबलेल्यांच्या भल्यासाठीच केला... शेवटी जय-भीम म्हणेल आणि एकच सांगेन
'जयभीम’ हे केवळ अभिवादन नसून 'जयभीम’ देशातील विषमतावादी व्यवस्थेविरोधात मानवतावादी सामाजिक न्यायाचा आवाज आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचे मानवतावादी राष्ट्र निर्माण करण्याचा एक समृद्ध विचारांचा मार्ग आहे....✍️
''Jai Bhim'..the success password for Humanity and Social Justice in modern world.- 'शैलेश शिरसाठ,जळगाव.
shaileshshirsath.blogspot.com
प्रिय नातवंडांनो.
सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
तुमची पत्नी ज्या पद्धतीने तुमच्या आई-वडिलांची म्हणजेच तिच्या सासू-सासर्यांची काळजी घेते आणि त्यांची सेवा करते त्याच पद्धतीने तुम्ही देखील जावई म्हणून तुमच्या सासू-सासर्यांची सेवा करता का ? आणि तुमचं लग्न अजून व्हायचं असेल तर भविष्यात फक्त जावई म्हणून नाही तर मुलगा समजूनच सेवा करणार का ? कारण समाजात अशी उदाहरणे देखील आहेतच.
कोरोनाच्या सावटाखाली असताना मी हे पत्र तुमच्यासाठी मुद्दामहून लिहीत आहे या महामारीत प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असताना कुटुंबीयांच्या काळजीने देखील व्यथित झाला आहे विशेषतः लहान बालके आणि कुटुंबातील वयोवृद्धाबाबत.
उतार वयात आई-वडिलांची सेवा करावी अशा संस्कृतीत आपण वाढलो परंतु एखाद्या दांपत्याला फक्त मुलगीच असेल तर अशा मुलीचं लग्न झाल्यानंतर एकट्या पडलेल्या आपल्या आई-बाबांची सेवा किंवा त्यांची काळजी ती मुलगी घेऊ शकत नाही जसे मुलासोबत आई-बाबा जसे राहतात तसे मुली सोबत तिचं लग्न झाल्यावर ते राहत नाहीत अशा वेळेला मुलगा नसल्याची खंत त्या आई-वडिलांना वाटू शकते अशा वेळेला मुलगी आणि जावई यांचे नैतिक, सामाजिक कर्तव्य (आणि एक आनंद) म्हणून त्यांनी आई-वडिलांचे काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं यासाठी तुम्ही देखील तुमच्या आई बाबांसह सासू-सासर्यांची देखील आई-वडिलांसारखेच काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच.मुलांच्या तुलनेत मुलींची कमी असणारी संख्या ही एक सामाजिक समस्या बनली आहे.
लग्नात परंपरांच्या नावाखाली हुंडा तसेच लग्नानंतर देखील असणारा एकतर्फी मानपान हे मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे हे देखील आंतरराष्ट्रीय बालिका दिना निमित्ताने ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे.आपण स्वतःहून वधू माता पिता आणि वधूकडे अर्थात नवरी मुलीकडे सर्व मंडळींना तोच मान आणि सन्मान द्यायला हवा किंबहुना वर पक्षापेक्षाही अधिक मानसन्मान वधू पक्षाला द्यायला हवा हा सामाजिक बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल् लेकरू वाढवलेली मुलगी ज्यावेळेला आई वडील दुसऱ्या घरात डोळ्यात अश्रू घेऊन पाठवतात त्यावेळेला समाजाकडून त्यातही वर पक्षाकडून त्यांना अधिक धीर आणि आधार देण्याची गरज असते अशा वेळेला लग्नाच्या मानपानात वेळोवेळी वधू पक्षाला हीन आणि कमी दर्जाची वागणूक देणं ही गंभीर चूक आहे. आपल्याला आपल्या देशाच्या परंपरांचा अभिमान आहे परंतु त्याचा प्रत्यक्षात परंपरांच्या नावाखाली कोणाचा तरी दमन तर करत नाही ना याचाही समतेच्या दृष्टीने विचार होणं आवश्यक आहे.
स्त्री भ्रूणहत्येचा विरोध करत असताना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ असं म्हणत महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असताना विविध योजनांचा फायदा हा त्या महिलेशी संबंधित तिच्या आई-वडिलांना देखील मिळाला पाहिजे आणि तिच्यावर जर सासू-सासरे अवलंबून असतील तर त्यांना देखील मिळालाच पाहिजे.
परंपरेने कुटुंब पद्धती मातृसत्ताक असो, पितृसत्ताक असो किंवा मातृ-पितृ सत्ताक असो ती भविष्यात मानवतासत्ताक देखील कायम असली पाहिजे तरच पृथ्वीवरील मानवी संस्कृतीची पायमुळं घट्ट राहतील अन्यथा आपली आठवण मानव न राहता केवळ प्राणी (जनावर) अशी राहील असे वाटते.आणखी काय लिहिणार तुम्ही साक्षर आहात आणि सुशिक्षितही...✍️
I was waiting for to capture the best picture for more than 48 hours.Viewers can imagine or can't imagine the hard work behind the pictures.People say me that I am always seeking for better work and every time it reflects to me as the complement for to be 'THE PERFECTIONIST'.....
shaileshshirsath.blogspot.com
If you are willingly want to take participation in our 'Table Talk'spoken English activity .These are some sample questions for English Speaking conversational activity. 👇🏻
1)What is your name ?
2) Where are you from ?
3) What do you do? (about your profession)
4) What languages do you speak?
5) What are your hobbies?
6) Are you vegetarian or nonvegetarian ?
7) What is your favourite dish?
8) What is your favourite festival ?
9) What is your favourite movie and TV serial or TV program ?
10) Who is your favourite actress ?
11) Who is your favourite actor?
12) How much time do you spend on internet?
13) What was your favourite subject in your school days ?
14) Where did you travel ( Your last trip) before Covid 19 Pendamic ?
15) Where you would like to travel ( Your trip) after Covid 19 Pendamic ? If you want to be a part of We Smart or Pelta contact 7304080100
✍️
- Shailesh Shirsath.(Teacher and Teacher Trainer.) English Language Ambassador,Jalgaon District.(India.) President PELTA.
shaileshshirsath.blogspot.com
सेतूचा स्वाध्याय होऊ नये म्हणून....
सेतू अभ्यासक्रमाची यशस्वीता ही फक्त शिक्षकावर अवलंबून नसून पालकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे असले तरी सेतू अभ्याक्रमात शिक्षक केंद्र स्थानी आहे (एकमेव जबाबदार घटक). पालकांच्या आणि विविध समाज घटकाच्या (अभ्यास मित्र,गल्ली मित्र,विविध मंडळ) सहकार्याशिवाय कोविड परिस्थिती हे कठीण आहे आणि फक्त एका आकडेवारीच्या अघोषित स्पर्धेसाठी कागदावर काम करून भागणार नाही.स्वाध्यायाच्या वेळी केले तसेच यशस्वी (?)कार्य करायचे असल्यास सेतू अभ्यासही एका विशिष्ठ घटकलाच पूर्ण करावा लागेल अर्थात तो घटक विद्यार्थी किंवा पालकच असेल असे नाही...
सेतु अभ्यासक्रमात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची किंबहुना निर्णायक आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही असे असतानाही सेतु अभ्यासक्रमाच्या पाठ टाचण नमुन्यात समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुलभाकांचा किंवा पालकांचा उल्लेख नाही हे गंभीर आणि तितकेच हास्यास्पद देखील आहे...