आज २५ डिसेंबर...!
१९२७ साली याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता, अन्याय आणि शोषणावर आधारित मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावर आधारित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले.
यावेळी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, “ सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत, ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील, हे हक्क कायम राहावेत हाच राज्यव्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा अंतिम हेतू असला पाहिजे.”*
या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी दिनानिमित्त बाबासाहेबांना क्रांतिकारी सलाम ...!
No comments:
Post a Comment