आज 'मन मौन' झाले आहे,
पण तरीही काही लिहिणार आहे.... ✍️ ते असे की, या देशाचा लौकिक वाढवण्यासाठी सर्व जाती धर्मियांचे योगदान आहे फक्त कोण्या एका धर्मीयांचे नाही...
आजपासून ३३ वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात अर्थक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.१९९१ साली देशाच्या आर्थिक धोरणांबद्दल क्रांती घडवण्यात तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आणि जागतिक दर्जाचे अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचा खूप मोठा वाटा आहे.
आज काही लोकांचा विश्वास बसणार नाही परंतु १९९१ पर्यंत आपल्या देशात केवळ एक टीव्ही वाहिनी होती देशांतर देशांतर्गत विमान सेवा देणारी एकच मुख्य कंपनी होती.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू,तसेच इंदिरा गांधी राजीव गांधी यासारख्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे पायाभरणी मुळातच झाली होती परंतु १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूका आपल्या देशात झाल्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीची कवाडं खऱ्या अर्थाने खुली झाली.
इ.स.२०००या वर्षानंतर जन्माला जन्माला आलेल्या मुलांना मिलेनियर्स असेही संबोधलं जातं परंतु आज सर्वच तरुण मिलेनियरसह सर्व भारतीयांनी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीमुळे गेल्या ३० वर्षात देशाने झपाट्याने प्रगती केली.आज आपण पाहत असलेल्या शाश्वत विकासात अत्यंत साधी राहणी असणाऱ्या, कुठलाही बडेजावपणा किंवा दिखाऊपणा न करणाऱ्या,मितभाषी, खऱ्या अर्थानं जंटलमन अशी ओळख असणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राबवलेल्या ध्येयधोरणाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.
तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरण, खासगीकरण, आणि जागतिकीकरण (LPG - Liberalization, Privatization, Globalization) धोरण लागू करण्यात आले.
महत्त्वाचे बदल आणि प्रगती.
• आर्थिक उदारीकरण (Liberalization):
परकीय गुंतवणुकीवर असलेले निर्बंध कमी केले.
नियमन हटवले: उद्योगांवरील परवाना राज (License Raj) समाप्त केला.
कररचना सुधारली: आयात-निर्यात कर कमी केले.
भांडवली बाजार खुले केले: परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीस परवानगी दिली.
• खासगीकरण (Privatization):
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करण्यात आले.
खासगी कंपन्यांना अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली.
• जागतिकीकरण (Globalization):
भारताचे जागतिक बाजारपेठेशी जुळवून घेणे सुरू झाले.
परकीय कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली.
परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले.
प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे
• औद्योगिक विकास:
उत्पादनक्षमता वाढली.
नवीन तंत्रज्ञानाचा भारतात प्रवेश झाला.
• आयटी क्षेत्राचा उदय:
माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर अग्रगण्य बनला.
बेंगळुरूसारखी शहरे आयटी हब बनली.
• परकीय गुंतवणूक (FDI):
परदेशातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली.
नवीन रोजगार निर्माण झाले.
• ग्रामीण विकास:
कृषी क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले.
ग्रामीण भागातील लोकसंख्येला रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या.
• आर्थिक स्थिरता:
भारताचा GDP वेगाने वाढला.
१९९१ नंतर भारताने जागतिक स्तरावर आर्थिक स्थैर्य मिळवले.
डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका
• आर्थिक संकटाचा सामना:
१९९१ च्या आर्थिक संकटात डॉ. सिंग यांनी भारताचा परकीय चलनसाठा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मदत घेतली.
• धोरणात्मक बदल:
त्यांनी औद्योगिक धोरण, परकीय व्यापार धोरण, आणि कररचना सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.
'License Raj' हटवून व्यवसाय करण्यास सुलभता आणली.
• जागतिकीकरणाचे शिल्पकार:
जागतिक अर्थव्यवस्थेशी भारताला जोडण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला.
परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी नियम सुलभ केले.
• दूरदृष्टी आणि धाडस:
त्यांनी आर्थिक सुधारणा लागू करताना राजकीय दबाव झुगारला आणि देशहिताला प्राधान्य दिले.
केंब्रिज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित अशा सेंट जोन्स महाविद्यालयात डॉ.मनमोहन सिंग यांची प्रतिमा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आशिया खंडातील डॉक्टर मनमोहन सिंग हे एकमेव आहेत ज्यांची प्रतिमा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे.

No comments:
Post a Comment