हे परमेश्वरा,
काही वेळा तुझ्या अस्तित्व संदर्भात खूप चर्चा होतात पण खरं सांगू का देवा तुझ अस्तित्व जाणवतं ते निसर्गतः,परिश्रमाने आपली कौशल्य विकसित केलेल्या कलाकाराच्या कलाकृती पाहिल्या ऐकल्यावर.
देवा तुझ्या अस्तित्वाचा भास होतो गायकांच्या सुरेल गायनातून आणि प्रत्यक्ष निर्जीव असणाऱ्या वाद्यांना दैवी जीवत्व देणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतीतून...किंबहुना आपल्याकडे असलेल्या कलागुण आपण गेल्यानंतर या जगाला देऊन जातो ही कृती, ही भावना,विचार तुझं अस्तित्व शाश्वत असल्याचं सांगत असतात...
आपल्या गायनाने जगाला बेधुंद होऊन जगणं शिकवणाऱ्या गायिका आशा भोसले यांनी या ईहलोकात अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांची गायकी, श्वास आणि स्पंदन होऊन अजरामर झाली आहे.
पुनर्जन्म असतो नसतो मला माहीत नाही पण "एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..." असं गाणाऱ्या आशा पुन्हा पुन्हा पल्लवीत व्हाव्यात पुन्हा पुन्हा जन्माव्यात या आशावादात.... - शैलेशकमल

No comments:
Post a Comment