Tuesday, 1 June 2021

Learn With SHAILESH Sir

 विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वभावासाठी इंग्रजीतील काही शब्द बघणार आहोत त्याचा मराठी आणि इंग्रजी अर्थासह वाक्यातील उपयोगातून आपल्याला सहज लक्षात येऊ शकेल.

 👇

1. **Ambitious** (अॅम्बिशस) - महत्त्वाकांक्षी

   - Explanation:👉 Someone who has a strong desire to achieve success or power.

   - Example: 👉She is very ambitious and works hard to achieve her goals.

   - उदाहरण: ती खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि तिच्या ध्येयांसाठी खूप मेहनत करते.


2. **Adventurous** (अॅडव्हेंचरस) - साहसी

   - Explanation:👉 Someone who is willing to take risks or try out new methods, ideas, or experiences.

   - Example👉 He is an adventurous traveler who loves exploring new places.

   - उदाहरण: तो एक साहसी प्रवासी आहे ज्याला नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडतात.


3. **Affectionate** (अफेक्शनेट) - प्रेमळ

   - Explanation:👉 Someone who shows fondness or tenderness.

   - Example:👉 She is very affectionate towards her family.

   - उदाहरण: ती तिच्या कुटुंबाविषयी खूप प्रेमळ आहे.


4. **Assertive** (असर्टिव्ह) - ठाम

   - Explanation: 👉Someone who is confident and forceful in expressing their opinions or desires.

   - Example:👉 He is assertive in meetings and always makes his points clear.

   - उदाहरण: तो मीटिंगमध्ये ठाम असतो आणि नेहमी त्याचे मुद्दे स्पष्टपणे मांडतो.


5. **Altruistic** (अल्ट्रुइस्टिक) - परोपकारी

   - Explanation: 👉Someone who shows a selfless concern for the well-being of others.

   - Example:👉 Her altruistic nature leads her to volunteer at the local shelter.

   - उदाहरण: तिच्या परोपकारी स्वभावामुळे ती स्थानिक आश्रयस्थानात स्वयंसेवक म्हणून काम करते.


6. **Amiable** (अमीएबल) - सौम्य

   - Explanation: 👉Someone who is friendly and pleasant.

   - Example👉: He has an amiable personality and gets along with everyone.

   - उदाहरण: त्याचा स्वभाव सौम्य आहे आणि तो प्रत्येकाशी चांगला वागतो.


7. **Adaptable** (अडॅप्टेबल) - अनुकूलनीय

   - Explanation: Someone who can adjust to new conditions or environments.

   - Example: She is highly adaptable and can thrive in any situation.

   - उदाहरण: ती अत्यंत अनुकूलनीय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत उभरून येऊ शकते.


8. **Analytical** (अनॅलिटिकल) - विश्लेषक

   - Explanation:👉 Someone who is skilled in breaking down complex information and examining it.

   - Example:👉 His analytical skills are essential for solving problems at work.

   - उदाहरण: त्याचे विश्लेषक कौशल्य कामावर समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.


9. **Articulate** (आर्टिक्युलेट) - स्पष्टवक्ता

   - Explanation👉: Someone who can express their ideas clearly and effectively.

   - Example: 👉She is an articulate speaker who captivates her audience.

   - उदाहरण: ती एक स्पष्टवक्ता आहे जी तिच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.


10. **Attentive** (अटेंटिव्ह) - लक्ष देणारा

    - Explanation: 👉Someone who is mindful and considerate of others' needs.

    - Example: 👉He is very attentive to the details of his work.

    - उदाहरण: तो आपल्या कामाच्या तपशीलांकडे खूप लक्ष देतो.


11. **Authentic** (ऑथेंटिक) - अस्सल

    - Explanation:👉 Someone who is genuine and true to their own personality or character.

    - Example: 👉She is known for being authentic in her interactions with others.

    - उदाहरण: ती इतरांशी संवाद साधताना अस्सल असल्याचे ओळखले जाते.


12. **Adaptable** (अडॅप्टेबल) - परिस्थितीला अनुसरून वागणारा

    - Explanation: 👉Someone who can easily adjust to new situations.

    - Example👉: His adaptable nature helps him succeed in diverse environments.

    - उदाहरण: त्याचा परिस्थितीला अनुसरून वागण्याचा स्वभाव त्याला विविध परिस्थितींमध्ये यशस्वी होण्यास मदत करतो.


13. **Alert** (अलर्ट) - सतर्क

    - Explanation:👉 Someone who is quick to notice and respond to potential dangers or problems.

    - Example: 👉She is always alert and aware of her surroundings.

    - उदाहरण: ती नेहमी सतर्क आणि तिच्या सभोवतालच्या गोष्टींची जाणीव ठेवते.


14. **Aesthetic** (एस्थेटिक) - सौंदर्यात्मक

    - Explanation:👉 Someone who appreciates beauty or has a refined taste.

    - Example: 👉He has an aesthetic sense that is evident in his art.

    - उदाहरण: त्याच्या कलेत त्याची सौंदर्यात्मक जाण स्पष्ट दिसून येते.


15. **Affable** (अॅफेबल) - हसतमुख

    - Explanation: 👉Someone who is easy to talk to and friendly.

    - Example: 👉He is an affable host who makes everyone feel welcome.

    - उदाहरण: तो एक हसतमुख यजमान आहे जो सर्वांना स्वागतार्ह वाटेल असे करतो.


16. **Aspiring** (अस्पायरिंग) - महत्त्वाकांक्षी

    - Explanation: 👉Someone who has strong ambitions to achieve something.

    - Example: 👉She is an aspiring writer working on her first novel.

    - उदाहरण: ती एक महत्त्वाकांक्षी लेखिका आहे जी तिच्या पहिल्या कादंबरीवर काम करत आहे.


17. **Astute** (अस्ट्युट) - तीक्ष्णबुद्धीचा

    - Explanation: 👉Someone who is shrewd and has an ability to accurately assess situations.

    - Example:👉 His astute observations helped solve the case.

    - उदाहरण: त्याच्या तीक्ष्णबुद्धीच्या निरीक्षणांनी केस सोडवण्यास मदत झाली.


18. **Attentive** (अटेंटिव्ह) - काळजी घेणारा

    - Explanation: 👉Someone who is careful to pay attention.

    - Example: 👉She is very attentive to her children’s needs.

    - उदाहरण: ती तिच्या मुलांच्या गरजांकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देते.


19. **Auspicious** (ऑस्पिशस) - शुभ

    - Explanation: 👉Someone who is likely to bring good luck or fortune.

    - Example:👉 It was an auspicious occasion for the business deal.

    - उदाहरण: तो व्यवसाय करारासाठी शुभ प्रसंग होता.


20. **Astounding** (अस्टाउंडिंग) - आश्चर्यकारक

    - Explanation: 👉Someone who is remarkably impressive or shocking.

    - Example: 👉Her performance was simply astounding.

    - उदाहरण: तिचे प्रदर्शन फक्त आश्चर्यकारक होते.


21. **Accommodating** (अकॉमोडेटिंग) - मदतीस तत्पर

    - Explanation:👉 Someone who is willing to fit in with someone else's wishes or needs.

    - Example👉: He is very accommodating and always ready to help.

    - उदाहरण: तो खूप मदतीस तत्पर आहे आणि नेहमी मदत करण्यास तयार असतो.


22. **Affirmative** (अफर्मेटिव्ह) - सकारात्मक

    - Explanation: 👉Someone who expresses agreement or consent.

    - Example: 👉She gave an affirmative response to the proposal.

    - उदाहरण: तिने प्रस्तावाला सकारात्मक उत्तर दिले.


23. **Animated** (अॅनिमेटेड) - उत्साही

    - Explanation: 👉Someone who is lively and full of energy.

    - Example:👉 His animated storytelling kept everyone entertained.

    - उदाहरण: त्याची उत्साही गोष्ट सांगणे सर्वांचे मनोरंजन करत होते.


24. **Amicable** (अॅमिकेबल) - मैत्रीपूर्ण

    - Explanation:👉 Someone who is friendly and agreeable.

    - Example👉: They reached an amicable agreement without any disputes.

    - उदाहरण: त्यांनी कोणत्याही वादाविना मैत्रीपूर्ण करार केला.


25. **Audacious** (ऑडेशस) - धाडसी

    - Explanation:👉 Someone who is bold and willing to take risks.

    - Example:👉 His audacious plans surprised everyone.

    - उदाहरण: त्याच्या धाडसी योजना सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले.


26. **Analytical** (अनॅलिटिकल) - विश्लेषक

    - Explanation: Someone who is good at analyzing information and solving problems.

    - Example: She has an analytical mind that helps in research.

    - उदाहरण: तिच्या विश्लेषक बुद्धीमुळे संशोधनात मदत होते.


27. **Affluent** (अफ्लुएंट) - श्रीमंत

    - Explanation👉: Someone who is wealthy and has a lot of resources.

    - Example: 👉He comes from an affluent family.

    - उदाहरण: तो एका श्रीमंत कुटुंबातून येतो.


28. **Astrological** (अॅस्ट्रोलॉजिकल) - ज्योतिषशास्त्रीय

    - Explanation👉: Someone interested in astrology or the influence of stars on human affairs.

    - Example👉: She believes in astrological predictions.

    - उदाहरण: ती ज्योतिषशास्त्राच्या भविष्यवाण्यांमध्ये विश्वास करते.





Saturday, 22 May 2021

edu.vopa.in

 *अति महत्त्वाचे* 

 सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या  व सर्व पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये हि लिंक सेव्ह असावी. सर्व विद्यार्थ्यांना घरबसल्या कोणताही विषय मोफत शिकता येईल त्यासाठी खालील लिंक आहे


edu.vopa.in 👈या अक्षरावर क्लिक करा

 *वर्ग ,विषय ,व धडा* निवडा

 डायरेक्ट त्या धड्याचा व्हिडिओ  सुरू होईल .

E learning 👍👍

सर्वांनी शिका. केव्हाही शिका .कोणताही वर्ग 👍👍👍    *खूप महत्वाची व छान* *लिंक आहे,  जरूर  उपयोग करा*

Wednesday, 5 May 2021

शालेय शिक्षणात घोकंपट्टी आणि स्पर्धा परीक्षा असाव्यात?

शालेय शिक्षणात घोकंपट्टी आणि स्पर्धा परीक्षा असाव्यात? भाग १

शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणातही स्पर्धापरीक्षा असतात शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे.

मुळातच शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ भाषिक आणि गणितीय बुद्धिमत्तेचा विचार करून बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच.आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो.

मूल्यमापनातील गुण हा तसे पाहिले तर व्याकरणातील गुणवाचक विशेषण या अर्थाने आहे परंतु तो आपण संख्यावाचक विशेषण म्हणून वापरत आहोत, जसे की परीक्षेत किती गुण मिळाले सर्वाधिक गुण मिळालेल्यांची मेरिट लिस्ट वगैरे,वगैरे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे आहे की कोणते गुण कौशल्य विकसित झाले, विकसित करणे आवश्यक आहे.हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकात वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असतात. त्यांच्या विकासावर आणि खऱ्या अर्थाने जगणं अधिक समृद्ध करणाऱ्या आणि मूल्यवर्धन करणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांवर  भर देण्याची गरज आहे.

 विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन  शिक्षका पेक्षाही सुलभकाचे काम करायचे आहेे. शिक्षण घेतांंना विद्यार्थ्यांनी ते सहज आणि आनंददायी पद्धतीने घेणे अपेक्षित आहे स्पर्धा म्हटली की ताण तणाव येणारच किमान स्पर्धेचा ताण तणाव घेणे तरी ऐच्छिक असाव. शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन अर्थात स्पर्धा नाही, म्हणून शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात की नसाव्यात, की त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्रित विचारांनी ऐच्छिक  असाव्यात याचा विचार करणेही आवश्यक आहे.

व्यवसायिक शिक्षण असावे शिक्षणाच्या स्पर्धेतून निर्माण होणारं शिक्षणाचे व्यवसायीकरण असू नये.

खरे म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मोफत किंवा अत्यंत माफक असल्या पाहिजे, शिक्षणातील स्पर्धांमुळे शिक्षणात व्यवसायीकरण झाले आहे. एवढ्या शिक्षणातील स्पर्धा असल्यावरही आज देशात आरोग्य सुविधांमध्ये काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये  देशात असल्यावरही गणपती आणि दिवाळीला आपण लाइटिंग चायनाचीच घेतोय, बाजारातील साध्या वीस ते पंचवीस रुपयाच्या पायतानापासून महागड्या वस्तू मोठ्या प्रमाणात आपण परदेशातून आयात करतोय आपल्या देशाच्या एकूण आर्थिक बाबतीत अनेक घटकांचा समावेश असला तरी शिक्षण हा महत्वाचा घटक त्याच्या मुळाशी आहे. परदेशातील शिक्षण आपल्या  तुलनेत स्वस्त आहे शिवाय जीवघेणी स्पर्धा नाही म्हणून अनेक विद्यार्थी परदेशातील महागड्या नसणाऱ्या शिक्षणाची संधी घेतात.

कारण विकसित देशांमधील आर्थिक वृद्धी शैक्षणिक ध्येयधोरणांवर आधारित आहे आणि शैक्षणिक धोरणात कौशल्यास महत्त्व आहे, शिक्षणातील स्पर्धेस नाही, म्हणून आपण ज्या देशातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात करतोय त्या देशातील शालेय विद्यार्थी सुद्धा घरातील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कामे स्वतः करु शकतात. आपल्याकडे मात्र आपण दैनंदिन उपयोगात येणारे व्यवहारिक काम न करता किंवा करू देता केवळ परीक्षेसाठी उपयोगी असणारे मार्क्स वाढवून देणार या घटकांचा अभ्यास करतो.शिक्षणातील स्पर्धेतून वैद्यकीय प्रवेश - त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा - आणि मग आता औषध उपचार मिळण्यासाठी रांगेत उभा राहून उपचार घेण्याची स्पर्धा... अशा दृष्टचक्रात आपण कसे अडकलो आहोत याचाही विचार करावा लागेल.

C for Collaboration OR C for competition.

✍️

- शैलेश शिरसाठ,जळगाव.(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून)






Thursday, 22 April 2021

संविधानाचे 'फक्त वाचन' करून चालणार नाही त्यातील 'तत्त्व अंगिकारली पाहिजे'

I said I OBJECT

✍️....

पंख्याच्या हवेत, एसी मध्ये काम करणाऱ्याला आपण त्याचा कामाचा मोबदला म्हणून पगार देतो. एखाद्या ठिकाणी भाषण देणाऱ्या व्यक्तीला आपण मानधन देतो. आपला श्रमाने,आपल्या कष्टाने आपल्या बुद्धी कौशल्याने आपल्या हस्त कौशल्याने शेतात काम करून घाम गाळून काम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि शेतमजुराला आपण मात्र मजुरी देतो हात मजुरी देतो. आपण स्वतः कचरा करत असलो तरी कचरा गोळा करणाऱ्या आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या कष्टकरी हात मजुराला आपण स्वच्छता दूध किंवा स्वच्छता रक्षक असं न म्हणता कचरावाला म्हणतो. 

ज्यांचे पालक अस्वच्छ व्यवसायत काम करतात अश्या पालकांच्या मुलांची शिष्यवृत्ती संदर्भातील कार्यालयीन कामकाजासाठी माहिती मागवली जाते.आपण प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मान राखला पाहिजे आणि अस्वच्छ व्यवसाय असा उल्लेख नको करायला,याउलट पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वच्छतेचं महान सेवाकार्य करणाऱ्या बांधवांचा उल्लेख  ' स्वच्छतारक्षक किंवा स्वच्छतादूत ' असा होणे गरजेचे आहे.निसर्गाची व मानवतेचे हानी करणाऱ्या व्यवसायाशिवाय इतर कुठलाही व्यवसायाला आपण अस्वच्छ व्यवसाय असा उल्लेख कसा करू शकतो ?🤔 ✍️

आपल्या संस्कृतीत व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत  विविध संस्कार त्याच्यावर होत असतात अंतिम संस्कार हा त्यापैकीच एक. अंत्यविधीतील अग्निसंस्कार आज करायला मिळणं हे भाग्याचं, पुण्याचं काम समजलं जातं. कोरोणाच्या महामारीत मृत्यू झालेल्या रुग्णांचे अग्नी संस्कार  स्वच्छता सेवेतील आरोग्यदूत आणि आरोग्य कर्मचारी करित आहे. मृत झालेल्या व्यक्तीशी रक्ताचं नातं नसतांनाही  माणुसकीच नातं जपत हे महान राष्ट्रीय सेवा कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छता आणि आरोग्य कर्मचारी करीत आहे.त्यांचा कार्याला सलाम.

प्रत्येक व्यवसायाची, कामाची आपली एक प्रतिष्ठा असते त्याचा उचित सन्मान होणे आवश्यक आहे.म्हणून अस्वच्छ व्यवसाय किंवा अस्वच्छ शिष्यवृत्ती असा उल्लेख नसावा.

 कारण संविधानाचे फक्त वाचन करून चालणार नाही संविधानाच्या शब्दांची जगण्याची मानवतावादी व्याप्ती समजवून घेऊन आचरण करणे गरज आहे. दर्जाची समानता-संविधानाच्या उद्देशिकेमधील दर्जाची समानता याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच आहे ते अंगीकारणे. प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था. कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही. या बरोबरच व्यक्तीची प्रतिष्ठा याचाही नेमका अर्थ काय हे जाणून घेणे ते अंगीकारणे अत्यंत महत्वाचं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा याचा अर्थ नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ असा मानवतावादी आहे. (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून) 

✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव. 

Tuesday, 20 April 2021

हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना समर्पित ' श्वासातल अंतर

 *“ जानते हो दुनिया का सबसे बडा बोझ क्या होता है...बाप के कंधोपर बेटे का जनाजा ....”*

 रमेश सिप्पी यांच्या गाजलेला शोले या चित्रपटातील हा संवाद. हा फक्त एक संवाद नव्हे तर एका बापाची खंत आहे. हीच खंत,हाताशा काल दिवसभर अस्वस्थ करत होती...

*साधारण अकरा वर्षापूर्वी मी लिहिलेली 'श्वासातल अंतर ' ही कविता पुन्हा डोळ्यासमोर आली आणि मग ती एवढ्या वर्षात पहिल्यांदा आपल्या सर्वांसोबत शेअर केली...*

सध्या येणारा प्रत्येक दिवस काही अप्रिय घटना घेऊन येणारा झालाय. तसाच कालचा दिवस होता, *सध्या मी ज्या तालुक्यात आहे  त्या धरणगाव तालुक्यासाठी अत्यंत दुःखद होता.*

'आपली माणसं *न सांगता सवरता आपल्यातून निघून जातात अशी खंत ' आपल्या अप्रतिम काव्यातून  शिक्षिका भगिनी जयश्रीताई काळवीट यांनी काल व्यक्त केली...*✍️

आपण सारेच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या परिवारांस सोबत आहोत.

काल संपुर्ण दिवसभर आणि आजही आपण सर्वांनी माझ्या कवितेला साद आणि दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.🙏

*परमेश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारं कुण्या एका शायराने खूप मार्मिक लिहिलंय तो म्हणतो,... ए खुदा अगर यह सच है दिलों के दिलों की मोहब्बत में तू बसता है,  तो क्यों टूट जाते हैं दिल और तेरा वजूद बिखर जाता है.....*

*हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना  समर्पित ' श्वासातल अंतर'*

             माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून '...श्वासातला अंतर.... मृत्यूशय्येवर असलेल्या चिमुकल्याची जन्मदात्याला आर्त हाक..... श्वासातला अंतर. रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा लढा माझा वाढतोय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... आईचं शहाणा बाळ म्हणताना पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय.. उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन् इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं डोळे भरून पाहायचय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... कळी उमलून कसा होतं फुल रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय.... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातल अंतर वाढवायचंय .... एवढे सारं बोलून दम लागतोय अन् मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचे... तुमचाच छकुला तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा मलाही जगवतेयम्हणून तर तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय. तुझाच बाबा शैलेश शिरसाठ. ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू)

              शैलेश शिरसाठ.(७३०४०८०१००)