Monday, 19 January 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे महान योद्धे महाराणा प्रतापजी यांची पुण्यतिथी साजरी

 भारत मातेचे सुपुत्र, महान युद्धवीर महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट येथे आज दिनांक 19 जानेवारी 2026, सोमवार रोजी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी शाळेतील उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्यप्रेम व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तसेच इतर शिक्षकांनीही त्यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

विद्यार्थ्यांनी शांत व शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धैर्य व आत्मसन्मानाच्या मूल्यांची जाणीव निर्माण झाली.



Sunday, 11 January 2026

स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ मासाहेब तसेच युगप्रवर्तक संत स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा.

 दिनांक : १२ जानेवारी २०२६

स्थळ : जि.प. प्राथमिक शाळा, फुलपाट

तालुका : धरणगाव

जिल्हा : जळगाव

जि.प. प्राथमिक शाळा फुलपाट येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने डिजिटल (ध्वनी–चित्रफितीच्या माध्यमातून) शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या महान कार्याविषयी तसेच युगप्रवर्तक संत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून प्रेरणादायी ध्वनीचित्रफिती दाखविण्यात आल्या. या चित्रफितींमधून राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, स्वराज्यनिर्मितीमागील त्यांचे योगदान तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आले.

सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संस्कार, शिस्त व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार, प्रेरणा व चारित्र्यनिर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.









Friday, 2 January 2026

जि.प.प्राथमिक शाळा फुलपाट येथे सावित्रीआई फुले जयंती (बालिका दिवस) उत्साहात साजरा.

 आज दिनांक 3 जानेवारी 2026  रोजी शाळेत क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती बालिका दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बालिका दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी  वाचन उपक्रम राबविण्यात आला. बालिका दिवसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची विशेष संगीतमय कवायत घेण्यात आली. या कवायतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढीस लागला. 

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य, स्त्री शिक्षणाचे महत्त्व व बालिकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच माता-पालकांसाठी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेतून माता-पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य, संस्कार व पालकांची जबाबदारी याविषयी सखोल माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष सौ. सोनी ज्ञानेश्वर भोई तसेच माता-पालक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी प्रभावीपणे केले. सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या व माता-पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीपणे पार पडले.




Thursday, 25 December 2025

वीर बाल दिवस कार्यक्रम संपन्न.

 वीर बाल दिवस कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट,

ता. धरणगाव, जि. जळगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना साहिबजादे जोरावर सिंह व साहिबजादे फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य, त्याग व बलिदानाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना वीर बाल दिवस या विषयावरील ध्वनी-चित्रफित (व्हिडिओ) दाखवण्यात आली. या चित्रफितीतून साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानंतर शिक्षकांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व तसेच या वीर बालकांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या व समजण्याजोग्या भाषेत मार्गदर्शन केले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगवा स्पर्धा तसेच इतर सर्जनशील व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमास शाळेतील उपशिक्षक शैलेश शिरसाठ, मुख्याध्यापक श्री. भटू पाटील तसेच केंद्रप्रमुख श्री. प्रभात तडवी हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, धैर्य, त्याग व देशभक्तीची भावना रुजण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.




Sunday, 7 December 2025

किनगावच्या लौकिकाची 'विजयी दिशा'

 किनगावच्या लौकिकाची 'विजयी दिशा'

किनगाव ता.यावल चे मुळ रहीवाशी आणि संभाजी ब्रिगेडचे यावल तालुका अध्यक्ष श्री.विजय पाटील यांची दिशा ही सुकन्या  होय .

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमान! खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये दिशा पाटील च्या उत्कृष्ट खेळाने मिळवून दिले विद्यापीठाला सुवर्णपदक

       भरतपूर राजस्थान येथे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर आयोजित खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये अंतिम सामन्यातील

63 किलोग्रॅम वजनी गटात 'बॉक्सिंग' या क्रीडा प्रकारात दिशा विजय पाटील हिने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदकाची शानदार कमाई केली आहे.अंतिम सामन्यात हरियाणाच्या बॉक्सरवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत दिशाने तिचे कौशल्य, जिद्द, आणि उत्कृष्ट खेळाची चमक दाखवली.दिशाच्या या भव्य विजयामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह खानदेश (जळगांव जिल्हाचे ) यावल तालुक्यातील किनगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळून निघाले असून विद्यापीठाचा मान-अभिमान अधिक उंचावला आहे.




Tuesday, 25 November 2025

जि.प.प्राथमिक शाळा फुलपाट येथे संविधान सप्ताह उत्साहात सुरू

 आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 मंगळवार  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट येथे संविधान जागर सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाबद्दल, विशेषतः संविधानाच्या उद्देशिकेतील (Preamble) महत्वाच्या मूल्यांविषयी माहिती देणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री.भटू पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची वैशिष्ट्ये, त्यातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांविषयी सोप्या आणि समजण्यासारख्या शब्दांत मार्गदर्शन केले. संविधान हे देशाचे मार्गदर्शक तत्त्व असून प्रत्येक नागरिकाने त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.यानंतर उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांना वाचन करून दाखवली आणि प्रत्येक ओळीचा अर्थ उलगडत विद्यार्थ्यांना समजावून दिला. विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाही मूल्यांची बीजे रोवण्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे, छोटे प्रश्न आणि संवाद यांचा वापर केला. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता, देशभावना आणि लोकशाही मूल्यांची जाण निर्माण झाली. 




Friday, 14 November 2025

जनजाती गौरव पंधरवाडा — भगवान बिरसा मुंडा जयंती.

जनजाती गौरव पंधरवाडा — भगवान बिरसा मुंडा जयंती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट — ता. धरणगाव, जि. जळगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे 'जनजाती गौरव पंधरवाडा' अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रम राबवून जनजाती गौरव पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला.

 आज १५ नोव्हेंबर २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याची, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यानंतर शाळेत उपस्थित असलेल्या आदिवासी महिला व आदिवासी बांधवांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री भटू नामदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी पेहरावात उपस्थित राहून आपली संस्कृती अभिमानाने सादर केली. मुलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा व उत्साह लाभला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ यांनी केले.

अशा प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जनजाती गौरव' दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.