Thursday, 22 April 2021

संविधानाचे 'फक्त वाचन' करून चालणार नाही त्यातील 'तत्त्व अंगिकारली पाहिजे'

I said I OBJECT

✍️....

पंख्याच्या हवेत, एसी मध्ये काम करणाऱ्याला आपण त्याचा कामाचा मोबदला म्हणून पगार देतो. एखाद्या ठिकाणी भाषण देणाऱ्या व्यक्तीला आपण मानधन देतो. आपला श्रमाने,आपल्या कष्टाने आपल्या बुद्धी कौशल्याने आपल्या हस्त कौशल्याने शेतात काम करून घाम गाळून काम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि शेतमजुराला आपण मात्र मजुरी देतो हात मजुरी देतो. आपण स्वतः कचरा करत असलो तरी कचरा गोळा करणाऱ्या आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या कष्टकरी हात मजुराला आपण स्वच्छता दूध किंवा स्वच्छता रक्षक असं न म्हणता कचरावाला म्हणतो. 

ज्यांचे पालक अस्वच्छ व्यवसायत काम करतात अश्या पालकांच्या मुलांची शिष्यवृत्ती संदर्भातील कार्यालयीन कामकाजासाठी माहिती मागवली जाते.आपण प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मान राखला पाहिजे आणि अस्वच्छ व्यवसाय असा उल्लेख नको करायला,याउलट पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वच्छतेचं महान सेवाकार्य करणाऱ्या बांधवांचा उल्लेख  ' स्वच्छतारक्षक किंवा स्वच्छतादूत ' असा होणे गरजेचे आहे.निसर्गाची व मानवतेचे हानी करणाऱ्या व्यवसायाशिवाय इतर कुठलाही व्यवसायाला आपण अस्वच्छ व्यवसाय असा उल्लेख कसा करू शकतो ?🤔 ✍️

आपल्या संस्कृतीत व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत  विविध संस्कार त्याच्यावर होत असतात अंतिम संस्कार हा त्यापैकीच एक. अंत्यविधीतील अग्निसंस्कार आज करायला मिळणं हे भाग्याचं, पुण्याचं काम समजलं जातं. कोरोणाच्या महामारीत मृत्यू झालेल्या रुग्णांचे अग्नी संस्कार  स्वच्छता सेवेतील आरोग्यदूत आणि आरोग्य कर्मचारी करित आहे. मृत झालेल्या व्यक्तीशी रक्ताचं नातं नसतांनाही  माणुसकीच नातं जपत हे महान राष्ट्रीय सेवा कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छता आणि आरोग्य कर्मचारी करीत आहे.त्यांचा कार्याला सलाम.

प्रत्येक व्यवसायाची, कामाची आपली एक प्रतिष्ठा असते त्याचा उचित सन्मान होणे आवश्यक आहे.म्हणून अस्वच्छ व्यवसाय किंवा अस्वच्छ शिष्यवृत्ती असा उल्लेख नसावा.

 कारण संविधानाचे फक्त वाचन करून चालणार नाही संविधानाच्या शब्दांची जगण्याची मानवतावादी व्याप्ती समजवून घेऊन आचरण करणे गरज आहे. दर्जाची समानता-संविधानाच्या उद्देशिकेमधील दर्जाची समानता याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच आहे ते अंगीकारणे. प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था. कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही. या बरोबरच व्यक्तीची प्रतिष्ठा याचाही नेमका अर्थ काय हे जाणून घेणे ते अंगीकारणे अत्यंत महत्वाचं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा याचा अर्थ नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ असा मानवतावादी आहे. (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून) 

✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव. 

Tuesday, 20 April 2021

हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना समर्पित ' श्वासातल अंतर

 *“ जानते हो दुनिया का सबसे बडा बोझ क्या होता है...बाप के कंधोपर बेटे का जनाजा ....”*

 रमेश सिप्पी यांच्या गाजलेला शोले या चित्रपटातील हा संवाद. हा फक्त एक संवाद नव्हे तर एका बापाची खंत आहे. हीच खंत,हाताशा काल दिवसभर अस्वस्थ करत होती...

*साधारण अकरा वर्षापूर्वी मी लिहिलेली 'श्वासातल अंतर ' ही कविता पुन्हा डोळ्यासमोर आली आणि मग ती एवढ्या वर्षात पहिल्यांदा आपल्या सर्वांसोबत शेअर केली...*

सध्या येणारा प्रत्येक दिवस काही अप्रिय घटना घेऊन येणारा झालाय. तसाच कालचा दिवस होता, *सध्या मी ज्या तालुक्यात आहे  त्या धरणगाव तालुक्यासाठी अत्यंत दुःखद होता.*

'आपली माणसं *न सांगता सवरता आपल्यातून निघून जातात अशी खंत ' आपल्या अप्रतिम काव्यातून  शिक्षिका भगिनी जयश्रीताई काळवीट यांनी काल व्यक्त केली...*✍️

आपण सारेच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या परिवारांस सोबत आहोत.

काल संपुर्ण दिवसभर आणि आजही आपण सर्वांनी माझ्या कवितेला साद आणि दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.🙏

*परमेश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारं कुण्या एका शायराने खूप मार्मिक लिहिलंय तो म्हणतो,... ए खुदा अगर यह सच है दिलों के दिलों की मोहब्बत में तू बसता है,  तो क्यों टूट जाते हैं दिल और तेरा वजूद बिखर जाता है.....*

*हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना  समर्पित ' श्वासातल अंतर'*

             माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून '...श्वासातला अंतर.... मृत्यूशय्येवर असलेल्या चिमुकल्याची जन्मदात्याला आर्त हाक..... श्वासातला अंतर. रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा लढा माझा वाढतोय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... आईचं शहाणा बाळ म्हणताना पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय.. उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन् इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं डोळे भरून पाहायचय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... कळी उमलून कसा होतं फुल रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय.... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातल अंतर वाढवायचंय .... एवढे सारं बोलून दम लागतोय अन् मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचे... तुमचाच छकुला तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा मलाही जगवतेयम्हणून तर तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय. तुझाच बाबा शैलेश शिरसाठ. ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू)

              शैलेश शिरसाठ.(७३०४०८०१००)

Monday, 19 April 2021

श्वासातला अंतर... मृत्यूशय्येवर असलेल्या लेकराची जन्मदात्याला आर्त हाक

 


श्वासातलं अंतर....
मृत्यूशय्येवर असलेल्या लेकराची जन्मदात्याला आर्त हाक.

                  ll    श्वासातलं अंतर.   ll

रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा, लळा माझा वाढतोय..    
पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय..

आईचं शहाणा बाळ म्हणताना                                         पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय..                                 उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय..                     पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय..

श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन्                            इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं                                    डोळे भरून पाहायचयं...                                                    पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...

कळी उमलून कस होतं फुल,                                          रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि                   आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय
पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...

डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट,                  आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय,आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय..                              पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय....

एवढं सारं बोलून दम लागतोय अन्                                  मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय..                    पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
तुमचाच                                                                        छकुला

तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा                                  मलाही जगवतेय होते म्हणून तर                                          तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय....           तुझेच                                                                      पप्पा                                                                                  शैलेश शिरसाठ.                                                                    ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू) ©


Saturday, 17 April 2021

We Smart- Speak Smart* 'Presents. *LFH* अर्थात *Learning From Home*


 *We Smart- Speak Smart* 'Presents. 

*LFH* अर्थात *Learning From Home*

सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना *Homonym (हाॅमनिम)* म्हणतात. चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.

*Except-एक्स्पेक्ट- शिवाय, व्यतिरिक्त, वगळता, अपवाद,* उदाहरणार्थ. No one is ready except Tope Sir. टोपेसरांखेरीज कोणीही तयार नाही.

*Expect-एक्सेप्ट- अपेक्षा करणे* उदाहरणार्थ  we  expect the decision.आम्ही निर्णयाची अपेक्षा करतो.

*Accept-अॅक्सेप्ट- स्वीकार करणे, मान्य करणे* Group head please accept the decision.गट प्रमुख कृपया निर्णय स्वीकारा.

______________________________________________ संवादाच्या माध्यमातून हे आणखी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात..

विजय सर: शैलेश सर शेवटी काल संध्याकाळी एकदाचा निर्णय झाला.

शैलेश सर:  विजय दादा आपण हे expect ( एक्स्पेक्ट) करत होतो पण Except (एक्सेप्ट) Some people काहींना ते Accept अॅक्सेप्टच नव्हतं.

To be continued   Learning from home

 क्रमशः  लर्निंग फ्रॉम होम.✍️

shaileshshirsath.blogspot.com

LFH अर्थात Learning From HomeHomonym & Homophones

 Z.P.Upper Primary School Sheri 'Presents. 😇👇🏻

LFH अर्थात Learning From Home

सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना Homonym (हाॅमनिम) म्हणतात.तर स्पेलिंग वेगवेगळे पण उच्चारण सारखे असणाऱ्या शब्दांना '


Homophones होमोफोंन्स' म्हणतात.

चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.

✍️ शैलेश सर.

1) Right - राइट- योग्य,बरोबर 

2) Right - राइट -  उजवी बाजू

3) Right - राइट - हक्क ,अधिकार

 4) Write - राइट - लिही, लिहिणे 

👉 The man sitting in the *right* is *right* because he *writes* about his *rights.*

*उजवीकडे* बसलेला माणूस *बरोबर/योग्य* आहे कारण तो आपल्या *हक्कांबद्दल* *लिहितो.*

_______________________________________

1)Add - ऍड *जोडणे मिळविणे भर घालणे*

2) Ad  - ऍड- *जाहिरात*

3) Aid - ऍड ऐड- *सहायता मदत साधन.*

4) Ad -ऍड- *इसवी सन* (इतिहासातील कलखंडांचा उल्लेख करतांना ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या तारखांपूर्वी वापरले जाते ) उदा. *AD 1857 म्हणजेच इसवी सन १८५७*

या ठिकाणी AD म्हणजे Anno Domini अँनो डोमिनाय Uk  अँनो डॉमिनी US

👉 *In Ad 1970 Ad helped them to add better selling results it was  best aid by Ad.Shirsath*

*इसवी सन १९७० मध्ये जाहिरातीने त्यांना चांगले विक्री परिणाम जोडण्यास मदत केली ती अ‍ॅड.शिरसाठ यांनी केलेली सर्वोत्तम मदत होती.*

_______________________________________

1) Ail  - इल/ ऐल - *आजारी*

2) Ale - इल/ ऐल - *एक बिअरचा प्रकार ₹* (फळाची गुळचट चव असणारा बियर या पेयाचा एक प्रकार)

👉 He was ill so he avoided to drink ale.

तो आजारी होता म्हणून त्याने बिअर पिणे टाळले.

*Stay Home Stay Safe.*🏡 *घरी रहा सुरक्षित रहा.*

..To be continued.. Learning from home

 क्रमशः  लर्निंग फ्रॉम होम.✍️

shaileshshirsath.blogspot.com