Wednesday, 12 March 2025

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली असा अहवाल तयार करा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रेमलाल दिगंबर पाटील हे होते. उज्वल भारतीय परंपरेतील दाखल्यांचा संदर्भ देत शाळेतील शिक्षक श्रीमती. वंदना पाटील श्री.विश्वास पाटील,श्री. भटू पाटील यांनी माहिती सांगितली. आभार प्रदर्शन शाळेतील प्रशिक्षणार्थी शिक्षक दिव्या कुमावत यांनी केले.



Monday, 3 March 2025

 I like मला आवडतं. 

I like apple 🍎 मला सफरचंद आवडते. 

वरील प्रकारची अधिकाधिक वाक्य खालील तक्त्यांच्या आधारे तयार करा. 

I like____________👇



1. Apple (ऍपल) - सफरचंद

2. Banana (बॅनॅना) - केळी

3. Mango (मेंगो) - आंबा

4. Orange (ऑरेंज) - संत्रा

5. Grapes (ग्रेप्स) - द्राक्षे

6. Pineapple (पायनॅपल) - अननस

7. Watermelon (वॉटरमेलन) - टरबूज

8. Peach (पीच) - आडू

9. Papaya (पपाया) - पपई

10. Cherry (चेर्री) - चेरी

11. Strawberry (स्ट्रॉबेरी) - स्ट्रॉबेरी

12. Lemon (लेमन) - लिंबू

13. Plum (प्लम) - आलुबुखारा

14. Pear (पिअर) - नाशपाती

15. Kiwi (कीवी) - कीवी

16. Coconut (कोकोनट) - नारळ

17. Fig (फिग) - अंजीर

18. Date (डेट) - खजूर

19. Raspberry (रॅस्पबेरी) - रास्पबेर

20. Blackberry (ब्लॅकबेरी) - ब्लॅकबेर

21. Blueberry (ब्ल्यूबेरी) - ब्ल्यूबेरी

22. Pomegranate (पोमाग्रॅनेट) - अनार

23. Guava (ग्वावा) पेरु 

24. Lychee (लिची) - लिची

25. Jackfruit (जॅकफ्रूट) - फणस

26.Custard Apple कस्टर्ड ॲप्पल-सिताफळ

27.Wood Apple वूड ॲपल- कवट

28.Sweet Lemon 🍋 स्वीट लेमन-मोसंबी


Sunday, 23 February 2025

 🤰🏻 गर्भधारणा ते बाळाच्या संगोपनापर्यंत – संपूर्ण मार्गदर्शन सत्र 🤱🏻

 Aruheal Solutions Private Limited

&

We Smart.A group for excellence.

 प्रस्तुत विशेष सत्र, जिथे तज्ज्ञ सुदृढ गर्भधारणा, तणाव व्यवस्थापन, बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी आणि प्रसूतीनंतर बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतील.


✨ मुख्य मुद्दे:

✅ निरोगी आणि सहज गर्भधारणेसाठी महत्त्वाचे उपाय

✅ गर्भधारणेदरम्यान तणाव कसा हाताळावा?

✅ बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी योग्य आहार आणि सवयी

✅ मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग व ध्यानधारणा

✅ प्रसूतीनंतर नवजात बाळाची काळजी – आहार, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन


👩‍⚕ प्रमुख वक्ते: डॉ. भावना चौधरी, स्त्रीरोगतज्ज्ञ, जळगाव 

📅 Date: 24 फेब्रुवारी 2025

🕙 Time: 4pm 

📍 Venue: ऑनलाईन ZOOM मीटिंग 


 आयोजक

 Aruheal Solutions Pvt Ltd.

 आम्ही ऑरगॅनिक आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी व मॅटरनिटी पॅड प्रदान करून महिलांचे आरोग्य व मासिक पाळी स्वच्छता सुधारण्यासाठी कार्यरत आहोत.

We Smart
A group for excellence.

🌿 चला, आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घेऊया!


सेशन जॉईन करण्याची लिंक 👇🏻

https://us06web.zoom.us/j/87309028283?pwd=6daGb4AUE4DZtxyLq2JT2UAxU9iQbT.1


📌 अश्याच इतर सत्रांबद्दल माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ग्रुप join करा. 


https://chat.whatsapp.com/Kh6QsQp4gDBB36lTwgclK3 


📌 सेशन मधे सहभागी होण्यास कोणतीही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता : 

+91 92099 39693, +91 87886 64860



Friday, 14 February 2025

 बिस्किट पाण्याच्या ग्लासात दहा सेकंदापेक्षा जास्त तरंगत नाही परंतु जर पाण्यात इनो किंवा सोडा टाकला आणि त्यानंतर बिस्किटला पाण्यावर तरंगताना ठेवलं तर ते का तरंगते..?

असे का होते..?

बिस्किट पाण्याच्या ग्लासात दहा सेकंदांपेक्षा जास्त तरंगत नाही कारण बिस्किटामध्ये असलेले घटक (जसे की पीठ, साखर, इ.) पाण्यात भिजतात आणि त्याचे वजन वाढते, त्यामुळे ते बुडते. परंतु जेव्हा पाण्यात इनो किंवा सोडा टाकला जातो, तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साइडच्या गॅसाचे लहान बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे बिस्किटाच्या पृष्ठभागावर चिकटतात, त्यामुळे बिस्किट हलके होते आणि त्याला पाण्यावर तरंगायला मदत करतात.

सोडा किंवा इनोमुळे तयार होणाऱ्या या गॅसामुळे बिस्किटाला पाण्यातून बाहेर ढकलले जाते आणि त्यामुळे ते अधिक वेळ तरंगू शकते.




Thursday, 13 February 2025

 होय तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.

धूम्रपान निषेधाचा संदेश मान्य करत तिने

 कुंभकर्णी मेळेतील गांजाने भरलेल्या चिलमीचा मात्र

 श्रद्धेने स्वीकार केलाय.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.


 तिचं सत्य नावाने असत्य कथांच पारायण

अन् माझ्या चिकित्सक प्रश्नांपासून तिचं पलायन झालय.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.


माझं जग विज्ञानावर आणि 

तिच जग शेषनागावर आहे.

तिच्या पुस्तकात शेषनागावरील जग तरल्याचा निकष

अन् माझ्या पुस्तकात 'कोपर्निकस' आहे.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.


द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या 

एकलव्यांच्या देशात सहजच काही होत नाही, 

आणि म्हणूनच ब्रेकअप आहे.


जन्मानं मिळालेला धर्मासाठी तिच्या डोक्यात युद्ध 

अन् माझ्या मेंदूत बुद्ध आहे.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय. 

- शैलेश शिरसाठ 



माझ्या कल्पनेतल्या चित्राला, संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात मदत करणाऱ्या Imagine ॲपचे आभार.

Courtesy- Imagine 

Sunday, 9 February 2025

आम्ही सेफ टेकऑफ केले आहे आता आम्हाला सेफ लँडिंग करू द्या..

आम्ही सेफ टेकऑफ केले आहे आता आम्हाला सेफ लँडिंग करू द्या.. 
Supervision OR Support vision.

 सर्व प्रवाशांना घेऊन वैमानिकाने (पायलटने) अडथळ्यांवर मात करत अतिशय सेफ आणि स्मूथ टेकऑफ केलेले होते... 
परंतु इच्छित स्थळी सेफ लँडिंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे त्याने जमिनीवरील अधिकाऱ्यांना त्याच्या लँडिंगसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून संपर्क साधला. "सर माझ्याकडे पुढील वीस मिनिट पुरू शकेल एवढाच इंधन साठा आहे कृपया मला लँडिंगसाठी जागा उपलब्ध करून द्या आणि कृपया मार्गदर्शन करा." त्याला मार्गदर्शन करणारा अधिकारी मात्र त्याला तो उडवत असलेल्या विमानाबद्दल तसेच प्रवाशांबद्दल माहिती विचारू लागला.जसे की, तू टेकऑफ केलेल्या विमानाच्या इंजिनाची क्षमता किती आहे ?, विमानाचे नेमके टेक्निकल स्पेसिफिकेशन काय ? त्याचप्रमाणे प्रवाशांमध्ये वर्गवारी कशा प्रकारची आहे ? त्या प्रवाशांच्या नावाची यादी वगैरे वगैरे. 

पायलट अधिकाऱ्याकडून सेफ लँडिंगसाठी मार्गदर्शनाची विनंती करत होता.पण अधिकारी मात्र त्याला ओरडून म्हणाला,"तू मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस मी सांगतो तेवढी माहिती मला आत्ताच्या आत्ता सांग." पायलट चे पाय लटलट करू लागले त्याला भीती वाटू लागली की बहुदा आता विमान क्रॅश होणार आणि आपल्या सकट प्रवासी देखील क्रॅश होणार.. आणि विमान जमिनीवर क्रॅश होऊ लागले.. मोठा आवाज झाला आणि मी मोठ्याने ओरडलो "वाचवा.." मी देखील सोफ्यावरून खाली फेकले गेलो कारण मी सोफ्यावर झोपलो होतो आणि मला हे स्वप्न पडलं होतं.

 मी आईला स्वप्न सांगितलं आई म्हणाली, "अरे तू शिक्षक आहेस पायलट नाही, पण काल तुझ्या बाबांसोबत गप्पा मारत असताना तुझ्या बाबांनी तुला सांगितलं की शिक्षकाचे काम देखील पायलटासारखाच असतं. तू त्याचा विचार केला असशील म्हणून कदाचित तुला असं स्वप्न पडलं असेल. तू प्रथम असा विचार करणं सोड नाहीतर असाच असर होईल असं म्हणून आई-बाबा हसू लागले पण मी सुन्न झालो होतो.✍️
 केवळ Supervision पेक्षा  Support vision अधिक महत्त्वाचे आहे.




Thursday, 6 February 2025

It is increasingly common nowadays for children aged two and a half to three years to be enrolled in pre-school classes. It is crucial for all stakeholders involved in the direct and indirect upbringing of the child (including parents and society) to understand one important thing: are we imposing academic activities (such as studying) on a three-year-old child in the name of school preparation?

The purpose of enrolling children in these classes is related to their nourishment, health, and understanding of the environment, which will naturally develop through play and fun. However, some parents, without understanding the true purpose, insist on giving children delicate tools like pencils and pens, pressuring them to write. Is it appropriate to insist on school preparation like this without considering the proper age for physical (fine motor skills) and mental development?

If establishing a system within the family is not possible, or if school preparation is voluntarily undertaken, it should be done with consideration for the child’s natural movements and nourishment. What kind of effort is this to prepare a three- to four-year-old child for the cutthroat competition in future education? In reality, this is a time for children to develop and be nurtured in a playful and joyful manner with their family members, including parents, grandparents, uncles, aunts, and siblings.

With the industrial revolution, increasing urbanization, and rapidly growing populations, the joint family system (extended family) has become increasingly rare. Unlike in the past, when joint families included grandparents, uncles, and aunts, the absence of such extended families now means there are fewer older family members available to watch over young children or play with them. In nuclear families, where both parents may not always have enough time to spend with their children, parents often turn to alternatives such as daycare or pre-school preparation programs.

If, due to various challenges, some parents are unable to devote time to their children from an early age, when those children grow up and their parents grow old, the children might also be unable to spend time with their elderly parents. As a result, they may seek a senior care facility for them. Just as a daycare serves as a facility for young children, remember that a senior care facility can serve a similar purpose for your elderly parents. Due to the intense pressure of education, children may feel that their childhood, which should have been carefree and joyful, has instead been filled with stress.

We, too, were enrolled in school only after we turned five or six. Until then, we spent our time at home with our grandmother, playing in the dirt, mud, and sand with all our siblings.

Shailesh Shirsath,India.


My Video of December 2022