भारतात डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग वनस्पतीला अज्ञानवश 'ब्रह्मकमळ' असे संबोधले जाते. मुळात या दोन्ही वनस्पती भिन्न भिन्न असून यांची कुळे पण वेगवेगळी आहेत.
सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे फूल हिमालयातील उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वाहायची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.
ब्रह्मकमळ हे एक अत्यंत सुंदर आणि दुर्लभ फूल आहे, ज्याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी आहेत:
१. दुर्लभ फुलांचे प्रतीक: ब्रह्मकमळ फुलणे एक अत्यंत दुर्मिळ घटना असते. हे फूल वर्षातून फक्त एकदाच फुलते आणि रात्रीच्या वेळीच फुलते. सूर्योदयापूर्वी हे फुल मावळते, ज्यामुळे अनेकांना ते पाहणे शक्य होत नाही.
२. सांस्कृतिक महत्त्व: ब्रह्मकमळाचे नाव 'ब्रह्मदेव' या हिंदू देवतेच्या नावावरून आले आहे. हे फूल अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की हे फूल देवांना प्रिय आहे आणि शुभ संकेत मानला जातो.
३. औषधी गुणधर्म: या फुलाचे विविध भाग औषधी गुणधर्मांसाठी वापरले जातात. विशेषतः हिमालयातील ब्रह्मकमळ वनस्पतीला आरोग्यवर्धक मानले जाते. ती औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते, जी वेदनाशामक आणि शरीरशक्तिवर्धक म्हणून ओळखली जाते.
४. हिमालयातील वनस्पती: ब्रह्मकमळ मुख्यतः हिमालयातील ३,००० ते ५,००० मीटर उंचीवर सापडते. तिथल्या थंड आणि विशिष्ट वातावरणातच ही वनस्पती तग धरते.
५. फुलण्याची प्रक्रिया: ब्रह्मकमळाची एक खास गोष्ट म्हणजे त्याचे फुलणे अत्यंत संथपणे घडते. रात्रीच्या वेळी, हे फूल हळूहळू उमलत जाते, ज्यामुळे लोक त्याचा फुलण्याचा सोहळा पाहण्यासाठी धीर धरतात.
६. सौंदर्य आणि सुगंध: हे फूल केवळ सुंदरच नसते, तर त्याला एक सुखद सुगंध असतो, जो वातावरणात प्रसन्नता आणतो. त्याचे पांढरे व शुभ्र फूल अत्यंत आकर्षक दिसते.
ब्रह्मकमळाचे अनोखेपण आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करते.
Thursday, 17 October 2024
आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव
दिनांक: 17 ऑक्टोबर 2024
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. विश्वास पाटील यांनी समर्थपणे केले.
उज्वल भारतीय परंपरेतील आद्यकवी वाल्मिकी यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ, वंदना पाटील, आणि दिव्या कुमावत यांनी विद्यार्थ्यांना वाल्मिकीजींच्या जीवनपटाची माहिती दिली. आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या महान कार्याचा सन्मान करताना भारतीय परंपरेतील दाखल्यांचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना अवगत करून दिले.
Tuesday, 15 October 2024
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे जागतिक अन्न दिवस साजरा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे 16 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु. दिव्या कुमावत यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात अन्न सुरक्षा आणि पोषणाविषयी माहिती देऊन करण्यात आली. यावेळी शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्व तसेच अन्नाची नासाडी टाळण्याचे महत्व पटवून दिले.
अन्ना खाण्याची योग्य पद्धत आणि पोषणतत्वांबाबत श्रीमती वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अन्नाचे महत्व आणि पोषण यावर भाषणे केली.
मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अन्न हे जीवनाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांनी मुलांना नियमित आणि संतुलित आहाराचे महत्व पटवून दिले व अन्नाची किंमत समजून घेण्याचे आवाहन केले.
शेवटी, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून अन्नाची नासाडी कशी टाळावी यावर शपथ घेतली. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने शाळेत अन्न विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्नाबद्दल आदर निर्माण झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Sunday, 6 October 2024
शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची खालील प्रमाणे माहिती.
Monday, 30 September 2024
वर्षभरात आवश्यकता असल्यास पालक, स्थानिक सुलभक, अभ्यास मित्र, विविध स्थानिक सेवाभावी संस्था यांचे शालेय विकासासाठी सहकार्य घेणे.
अर्थातच.
ऑपरेशन को-ऑपरेशन 365+
शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला चालना देण्यासाठी पालकांच्या भेटी घेतल्या जात आहे. या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीला प्रोत्साहन मिळेल.
Upgraded on 04-12-2025
🌻
“ऑपरेशन कोऑपरेशन ३६५+” हा उपक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून गाव, शाळा, पालक आणि समाज यांच्यातील सशक्त नातं निर्माण करणारा, शाळा आणि शिक्षकांना सहकार्य करणारा उपक्रम आहे.
‘सहकार्य, सातत्य आणि संवाद’ या तीन सूत्रांवर आधारित हा उपक्रम ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक मोकळा करू शकतो.
1. घरोघरी भेट (Home Visit):
शिक्षकांकडून आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या घरी नियमित भेटी.
पालकांशी संवाद व विद्यार्थ्याच्या अभ्यासाची माहिती.
शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि नैतिक शिक्षणाचा समन्वय.
विद्यार्थ्यांचा बाल ग्रामसभेत सहभाग.
9. आवश्यकता वाटल्यास किंवा आवश्यकतेनुसार सामाजिक संघटनांचा सहभाग घेणे.
10. त्रिसूत्री आधार:
सहकार्य – सातत्य – संवाद या तीन तत्वांवर आधारित उपक्रम.
ग्रामीण भागात उत्कृष्ट पालकत्व निर्माण करण्यासाठी शाळा आणि शिक्षकांना सहकार्य करण्यासाठी, ग्रामपंचायत, ग्रामसभा, महिला गट, युवक मंडळ, आणि स्वयंसेवी संस्था यांनी सहकार्याने आणि सातत्याने काम करणे गरजेचे आहे.
प्रत्येक उपक्रम पालकांना “माझं मूल, माझी जबाबदारी आणि माझा अभिमान” हे जाणवून देणारा असावा.
पालक प्रबोधनासाठी खालीलपैकी काही उपक्रम आपण राबवू शकतो.
१. पालक प्रबोधन शिबिरे (Parent Awareness Camps):
उद्दिष्ट: पालकांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि बालसंवर्धन याबद्दल जागरूक करणे.
उदाहरण:
शाळा आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 'सुजाण पालक, उज्वल भविष्य' या नावाने शिबीर आयोजित करणे.
तज्ज्ञांकडून व्याख्याने – जसे की बाल मानसशास्त्रज्ञ, आरोग्य अधिकारी, शिक्षक.
पालकांना संवादात्मक सत्रांमधून प्रश्न विचारण्याची संधी देणे.
२. उत्कृष्ट पालक गौरव सोहळा (Best Parent Award Programme):
उद्दिष्ट: विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेणाऱ्या पालकांचा सन्मान करून प्रेरणा निर्माण करणे.
उदाहरण:
शाळेतील 'उपस्थिती, वाचन संस्कार, घरगुती शैक्षणिक वातावरण' या निकषांवर निवड.
ग्रामसभेत प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन गौरव.
३. पालक-शिक्षक संवाद मेळावे (Parent-Teacher Meet cum Exhibition):
उद्दिष्ट: शाळा आणि घरातील शिक्षणात सुसंवाद वाढवणे.
उदाहरण:
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन.
पालकांसाठी “घरच्या घरी अभ्यासाचे तंत्र” या विषयावर मार्गदर्शन सत्र.
४. पालक मार्गदर्शन कार्यशाळा (Parent Guidance Workshops):
उद्दिष्ट: पालकांना मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाबद्दल माहिती देणे.
उदाहरण:
'मुलांच्या अभ्यासात उत्सुकता कशी वाढवावी?', 'मुलांना मार्गदर्शन कसे करावे? 'या विषयांवर कार्यशाळा.
स्थानिक आरोग्य अधिकारी, बाल मानसशास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन.
५. ग्रामसभा शिक्षण विशेष बैठक (Education-Focused Gram Sabha):
उद्दिष्ट: ग्रामस्तरावर पालक व समाजातील शिक्षणविषयक जबाबदारी वाढवणे.
उदाहरण:
'ग्रामशिक्षण सप्ताह' दरम्यान ग्रामसभेत शिक्षणावर विशेष चर्चा.
विद्यार्थी उपस्थिती, बालसंवर्धन, बालसंरक्षण यावर ठोस ठराव मंजूर करणे.
६. महिला बचत गटांमार्फत पालक जागरूकता (Through SHGs):
उद्दिष्ट: मातांना शिक्षण आणि पालकत्वाचे महत्त्व पटवून देणे.
उदाहरण:
बचत गटाच्या बैठकीत 'आई म्हणजे पहिली शिक्षिका' या विषयावर व्याख्यान आणि प्रश्न उत्तर सत्राचे आयोजन करणे.
वाचन कोपरा, कथा सत्र, साक्षरता उपक्रम.
७. बाल विकास व आरोग्य मेळावे (Child Development & Health Fairs):
उद्दिष्ट: पालकांना मुलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षण याबाबत माहिती देणे.
उदाहरण:
शाळेत आरोग्य तपासणी शिबीर.
बालकांमध्ये पोषण आहाराचे प्रदर्शन.
डॉक्टर आणि शिक्षक एकत्र पालकांना मार्गदर्शन देतील.
८. ग्रामपंचायत शिक्षण समितीमार्फत सहभाग:
उद्दिष्ट: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शिक्षण व पालक जागरूकता मजबूत करणे.
उदाहरण:
ग्रामपंचायत शाळा विकास निधीतून पालक कार्यशाळेसाठी अर्थसहाय्य.
सदस्यांना ' शिक्षण दूत ' म्हणून प्रशिक्षण देणे.
९. प्रेरणादायी कथा व चित्रफिती प्रदर्शन:
उद्दिष्ट: पालकांना दृश्य माध्यमातून संदेश पोहोचवणे.
उदाहरण:
'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम' यांच्यावर आधारित लघुपट दाखवून मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करणे.
'सुजाण पालकत्वाचे महत्त्व' या विषयावर व्हिडिओ प्रदर्शन.
१०. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक जागृती (Student as Messenger):
उद्दिष्ट: विद्यार्थी हेच पालकांपर्यंत सकारात्मक संदेश नेणारे माध्यम बनावेत.
उदाहरण:
विद्यार्थी घरी जाऊन पालकांना “वाचन प्रेरणा पत्र” देतात.
“माझे पालक, माझे शिक्षक” स्पर्धा – विद्यार्थ्यांनी पालकांबद्दल निबंध लिहिणे.
११. स्थानिक समाजसेवी संस्था / NGO सहकार्य:
उद्दिष्ट: शिक्षणविषयक प्रकल्पांतून पालकांना प्रशिक्षण व सहाय्य.
उदाहरण:
NGO मार्फत “बाल हक्क, पालक जबाबदारी” कार्यशाळा.
शिक्षणसाक्षरतेसाठी स्थानिक स्वयंसेवकांचे प्रशिक्षण.
१२. ग्रामस्तरीय शिक्षण प्रेरणा मोहीम:
उद्दिष्ट: संपूर्ण गाव पातळीवर शिक्षणाचे वातावरण निर्माण करणे.
उदाहरण:
“शिक्षण दिंडी” काढून पालकांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती.
“प्रत्येक मुलगा-मुलगी शाळेत” हा संदेश सर्वत्र पोहोचवणे.
लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे त्या अनुषंगाने आजचे पत्र तुम्हासाठी लिहीत आहे.
मी या जगात नसताना तुम्ही पितृपक्षात आपल्या वाडवडील आणि पूर्वजांची आठवण ठेवून काही विधी करणार किंवा नाही करणार हे मला माहीत नाही कारण तुम्ही तुमच्या तार्किक बुद्धीने, विवेकी विचाराने आणि तुमच्यात असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधाराने काय करावे किंवा काय करू नये हे ठरवालच.
आपल्या वाडवडिलांच्या आणि पूर्वजांच्या आठवणींसाठी तुम्ही नातवंडे आणि वंशज म्हणून एकत्र येणार असाल आणि जुन्या आठवणींमधून आधीच्या पिढीत केलेल्या चांगल्या विचारांचा आणि कामांचा आदर्श घेणार असाल तर चांगलेच आहे कारण चांगले विचार तुमच्यासह समाजाला दिशादर्शक ठरतील.
याखेरीज किमान मलातरी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या कर्मकांडांची अपेक्षा मुळीच नाही. आता राहिला मला मोक्ष किंवा शांती मिळण्याचा विषय तर त्याचा अनुभव मी माझ्या जिवंतपणीच काही चांगले मानवतावादी विचार आणि कार्याच्या माध्यमातून मिळवणार आहेच. माझी सदगती आणि मोक्षप्राप्ती वगैरे काही असल्यास ते माझ्या सत्कर्मातूनच घडणार असल्यामुळे माझ्या मोक्षाची आणि सद्गती ची जबाबदारी देखील पूर्णतः माझी आहे माझ्या येणाऱ्या पिढ्यांची नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी काही वेगळे कर्मकांड करण्याची मुळीच गरज नाही.माझ्या चांगल्या विचारांवर भविष्यात काम करता आले तर तेवढे करा आणि तेही करणार नसाल तरीही माझी काही हरकत नाही. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझ्या श्राद्धासाठी उठाठेव केल्यास मला काहीही मिळणार नाही तुम्हाला मात्र भजेवडे मिळतील त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा.माझ्या आठवणीत तुम्ही सर्व हेवेदावे भेदभाव विसरून एकत्र येत असाल आणि समता,बंधुता आणि स्वातंत्र्याची पाठीराखाण करत असाल तर चांगलेच आहे.
तुमच्यासाठी लिहिलेलं हे पत्र कागदावर आहेच पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक युगात आपण प्रवेश करत आहोत तुमच्या जन्म दात्यांचा बाप अर्थात तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे मी सुद्धा टेक्नोसॅव्ही आहेच म्हणून तुमच्यासाठी हे पत्र डिजिटल स्वरूपात माझ्या ब्लॉगवरही आहेच.
तुम्ही वापरत असलेल्या विविध गॅझेटसह स्वतःला अपग्रेड करत राहणारच आहात कारण आपल्याला हे जग जसं मिळालंय त्यापेक्षाही अधिक सुंदर करून जगण्याच्या रिले रेस मधून एक्झिट व्हायच आहे.
तुमचा आजोबा
शैलेश शिरसाठ.
खालीलपैकी कुठला मार्ग स्वीकारावा हे ज्याने त्याने आपल्या तर्कानुसार,विवेकानुसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या समाजानुसार किंवा नासमजानुसार स्वीकारावे.