Wednesday, 13 March 2024
Sunday, 18 February 2024
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा विरोधात होता.
प्रिय नातवंडांनो...उद्या शिवजयंती उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे त्यानिमित्ताने हा पत्र प्रपंच...
भविष्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मत प्रदर्शित करणार असाल किंवा लहान मोठ्या सभेमध्ये व्याख्यान देणार असणार तर हे लक्षात ठेवा की,
शिवरायांचा लढा रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तांविरोधात होता हे मांडण्यााच भान म्हणजे 'शिव व्याख्यान'...
आणि
नफरतो के बाजार मे मोहब्बत की दुकान...
म्हणजे
'शिव व्याख्यान'.
या अर्थाने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात तुम्ही शिवरायांच्या मानवतावादी कल्याणकारी राज्याची भूमिका मांडली पाहिजे.
शिवरायांचा लढा कुण्या धर्माशी किंवा जातीशी नव्हताच तर शिवरायांचा लढा सर्वसामान्य कष्टकरी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तां विरुद्ध होता.
शिवरायांचा लढा हा मानव कल्याणकारी राज्यासाठी होता,ज्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी,शेत मजुर सर्वांनाच त्यांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करून देणारा,धर्म आणि जात निरपेक्ष लढा होता.
इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे
लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या. म्हणून शिवरायांचा वकील जन्मानं मुस्लिम असणारा काझी हैदर होता आणि अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता,ज्याने अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर तलवारीने हल्ला केला होता.त्याचवेळेस जीवा महालाने अफजलखानाचे सहकारी सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा देखील वध केला.औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यशाहीकडून लढणारा औरंगजेबाचा सर्वात महत्त्वाचा साथीदार मिर्झाराजा जयसिंग होता.
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्या नौसेनेतील प्रमुख सैनिक अधिकारी सिद्धी संभल,सिद्धी इब्राहीम (आरमार प्रमुख) मुस्लिम होते.शिवरायांचे चित्र सर्वप्रथम मीर मोहम्मद या चित्रकाराने काढले शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आणि गायला तर दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख या मुस्लिम शिवशाहीराने गायला.
शिवरायांचा तोफखाना सांभाळणारा शिवरायांवर जीवापाड प्रेम करणार त्यांचा सहकारी इब्राहिम खान होता जो बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे यांच्या सारखा स्वराज्यासाठी प्राणप्रणाने लढत होता.
अठरापगड जातींना सोबत घेणारे शिवराय जात-पात धर्म असा भेद मानत नव्हते म्हणूनच त्यांच्या अंगरक्षकांमध्ये येसाजी कंक,कोंडाजी कंक, संभाजी कावजी,काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड,सुरज कांडके, जीवा महाला,विसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम देखील होता.
शिवरायांचा पहिला सरनौबत नुरखान बेग हा होता. शिवरायांना अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे अशी खबर देणारा आणि
शिवराय अफजल खानाला भेटीला जाणार म्हणून सतत काळजी करणारा,शिवरायांना वाघनखे बनवून देणारा रुस्तुमे जमान या धर्मानं मुस्लिम असणाऱ्या शिवरायांच्या मित्राला विसरून कसे चालेल? पन्हाळगडावरील सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांना विशालगडाकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी शिवा काशिद ने आपले बलिदान दिले.हुबेहूब शिवाजी महाराजां सारखाच दिसणारा शिवा काशिद न्हावी होता. आपण मेलो तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा असणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे वाचले पाहिजे म्हणून त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली.
शिवरायांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि सचिव हैदर अली होते. आग्र्याहून सुटकेच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून "राजे आम्ही मेलो तरी चालेल पण स्वराज्यासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहात"असं म्हणणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे.
शिवरायांच्या सैन्यात सातशे मुस्लिम पठाण होते. शिवरायांचे दुसरे गुरु सुफी संत याकूब बाबा होते.
शिवरायांनी आपल्या सैन्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना आपल्या आज्ञापत्रातून केल्या होत्या जसे की मोहिमेवर जात असताना शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताच्या कडेकडेने जावे उभ्या पिकांमधून जाऊ नये.असे कुठलेही कृत्य करू नये की ज्यामुळे शेतकऱ्यांचे, शेतीमालाचे नुकसान होईल.
शिवराय आपल्या आज्ञापत्रात म्हणतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील स्पर्श करू नये. कुठल्याही जाती धर्माचे असो त्या सर्व महिला,लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी.
या खेरीज शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रातून आपल्या सैनिकांना हेही सांगितले की कुराणाची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम बांधवांकडे सुपूर्त करावी तिचा अवमान करू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्वप्रथम साजरा करणारे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांचा उल्लेख कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असा अगदी यथार्थ करतात.
रयतेचे जाणते राजे शिवराय हे छत्रपती झाले कारण स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर,कोंडाजी फर्जंद,सूर्यराव काकडे, कान्होजी जेधे,फिरंगोजी नरसाळा, रामजी पांगेरा, हिरोजी इंदुलकर,दौलत खान,वेंटाजी भाटकर, मायनाक भंडारी,तुळाजी आंग्रे, सिद्धी मिस्त्री कान्होजी आंग्रे अजिंक्यतारा झुंजणारे प्रयागजी प्रभू बाजी पासलकर मुरारबाजी नेताजी पालकर आणखी असंख्य अशा लढवय्या मराठ्यांची साथ होती.(या ठिकाणी मराठा जात नाही तर समूह किंवा मराठा समाज ज्यात असंख्य मराठी अमराठी जाती आहेत या अर्थाने)
एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण समाजात विविध धार्मिक आणि
जातीय बाबींमुळे तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अफवांवर आपण
विश्वास ठेवायला नको कारण अनेकदा सत्तेच्या लढायांना धर्माच्या लढाया दाखवून
वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे
लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी
होत्या.थोडक्यात देशात शांततामय,बंधूभावाचे, सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी आपण
सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समाज माध्यमांचीही मोठी
जबाबदारी आहेच. अर्थात या ठिकाणी समाज माध्यम म्हणजे ती तांत्रिक उपकरणे नव्हे , तर
अशी तांत्रिक उपकरणे हाताळणारी 'हातं' या अर्थाने आहे. जबाबदार नागरिक आणि समाज
शिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रहितास प्रथम प्राधान्य द्यावे, त्याची गरज सर्वाधिक आहे.
बाकी इतर सारांश पुढील पत्रात मांडणारच आहे तोपर्यंत हे विसरू नका आपलं समाजाशी एकमेकांशी असलेलं नातं हे आई आणि लेकराच्या नात्यासारखं पवित्र असू द्या आणि म्हणूनच त्यासाठी हे सांगावेसे वाटते की, तुमचं आमचं नातं काय..?🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩
तुमचा आजोबा
शैलेश✍️
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा विरोधात होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत. कारण शिवशाही म्हणजे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.
Monday, 22 January 2024
'ओळखलत का भक्तांनो मला'?
'ओळखलत का भक्तांनो मला'?
ओळखलत का भक्तांनो मला?
तुम्ही मला चार भिंतीत मातीच्या एका विशिष्ट आकारात पाहत आहात पण
मी तर पृथ्वी,जल,अग्नी,वायू,आकाश या पंचतत्वातील कणाकणात होतो,आहे आणि सदैव राहणार,
त्या कणाकणात बघा मला...आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
कर्णकर्कश गोंगाटात नव्हे तर
माझ्या लेकींची धिंड पाहणाऱ्या संवेदनाहीन झुंडींचा भाग होणाऱ्यांनो, तुम्ही मला कधी पाहणार ? मी तर लेकींसाठी लढणाऱ्या प्रत्येक बापात आहे,त्या लेकींच्या निष्पाप नजरेतून बघा मला.. आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
धर्मांधतेने माखलेल्या तिरस्काराच्या भिंतीवरील रूधिरांच्या धारा पाहून आसुरी आनंद घेणाऱ्या प्रवृत्तींनो, आसुरी,अविवेकी धर्मांधतेच्या संहारात बघा मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ? जाती-धर्म आणि स्त्री-पुरुष असा भेद न करता. समतेच्या घटनेची आणि घटनेच्या समतावादी मांडणीत मी आहे,मांडणी करणार्या त्या हातांमध्ये बघा मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
'रुद्रम रणम रुधिरम'
कर्णकर्कश गोंगाटात नव्हे तर
शांत,संयमी ध्यानधारणेत अनुभवा मला
आणि खरंच सांगा ओळखलंत का भक्तांनो मला ?जात,धर्म,लिंग असा भेद न करता मानवता स्थापन करणाऱ्या प्रत्येक
प्रयत्नात मी आहे त्या प्रत्येक प्रयत्नात बघा मला.... आणि खरंच सांगा ओळखलं का
भक्तांनो मला ?
माझ्या लेकींची धिंड पाहणाऱ्या संवेदनाहीन झुंडींचा भाग होणाऱ्यांनो, तुम्ही मला कधी पाहणार ? मी तर लेकींसाठी लढणाऱ्या प्रत्येक बापात आहे,त्या लेकींच्या निष्पाप नजरेतून बघा मला.. आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
धर्मांधतेने माखलेल्या तिरस्काराच्या भिंतीवरील रूधिरांच्या धारा पाहून आसुरी आनंद घेणाऱ्या प्रवृत्तींनो, आसुरी,अविवेकी धर्मांधतेच्या संहारात बघा मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ? जाती-धर्म आणि स्त्री-पुरुष असा भेद न करता. समतेच्या घटनेची आणि घटनेच्या समतावादी मांडणीत मी आहे,मांडणी करणार्या त्या हातांमध्ये बघा मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
एक राजा म्हणून 'माझे प्राण आणि माझी प्रतिष्ठा' माझी जनताच आहे.
'माझ्या नावाने होणाऱ्या तुमच्या सोहळ्यात' माझे प्राण आणि प्रतिष्ठा असणारी 'माझी शबरी आई' दिसली नाही मला ..
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
फक्त एक आणि एकाच रंगात आणि ढंगात निर्माण आणि स्थापित करू पाहणाऱ्या संकुचित मानवताद्रोह्यांनो 'फोडा आणि राज्य करा' या परकीय नीतीत नाही, तर विविधतेत एकात्मतेच्या रितीत बघा मला...आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
(Telugu, meaning "Rage, War, Blood") and Rise Roar Revolt (English/Hindi).
Courtesy Netflix
Courtesy Netflix
Wednesday, 3 January 2024
May I help YOU ?🙏
प्रिय नातवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही कुठेतरी साहेब झालात,अधिकारी झालाय आता तुम्हाला रुबाबात मिरवता येईल म्हणून नव्हे तर आता तुम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. माझ्या विद्यार्थी मित्रांनो कुठलाही अहंभाव न ठेवता हे लक्षात असू द्या की,आपली निवड 'लोकसेवेतून' झाली आहे. म्हणून तुम्ही बॉस जरूर आहात परंतु अधिकाधिक लोकांसाठी सेवा देणारे बॉस.पदाच्या अहंभावनेतून रुबाब लादणारे बॉस नव्हेच. लोक तुम्हाला तुम्ही आदर्श आहात म्हणून आदर भावनेतून (Reverence) घाबरत नसतील आणि तुम्ही तुमच्या पदाच्या माध्यमातून त्यांना त्रास देऊ शकतात या भीतीपोटी घाबरत असतील तर हे योग्य होणार नाही कारण अशा मुळे देश स्वातंत्र्य झाल्यावरही जुलमी राजवटीचा भास होत राहील... खरं म्हटलं म्हणजे साहेब हा शब्द ब्रिटिश काळात गोऱ्या साहेबांसाठी आपण मोठ्या प्रमाणात वापरत होतो.
इंग्रजांच्या काळात जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी एका रुबाबात मिरवत होता आणि तो रुबाब ब्रिटिश साम्राज्यशाहीच नेतृत्व करणार होता असे सर्वसाधारण चित्र भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीचे होते . भारतीयांना तुच्छ समजणाऱ्या प्रवृत्तीचे तेतृत्व करणाऱ्या गोऱ्या साहेबाचे दुर्गुण आपल्यात नको. भारत देश गुलाम असल्यामुळे मेहरबान साहेबास अत्यंत लीन दिन होऊन पत्र लिहिली जात होती (मेहेरबान साहेबांच्या सेवेत अशा आशयाने )मुजरे केले जात होते परंतु माझ्या प्रिय नातवांनो तुम्ही ज्या देशात अधिकारी झाला आहात तो देश आता स्वातंत्र्य झाला आहे आणि तुम्ही साम्राज्यशाही व्यवस्थेचे क्रूर अधिकारी नाहीत. स्वतःच्याच देशात स्वतःच्याच बांधवांच्या सेवेसाठी, त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पदावर आहात ,तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदासाठी तुम्ही लोकसेवा आयोगातून अधिकारी झालेला आहात यातील सर्वात महत्त्वाचा शब्द 'लोकसेवा' हा आहे म्हणून तुम्ही लोकांचे सेवक आहात. शक्य झाल्यास तुमच्या कार्यालयाबाहेर तुमचा हात जोडलेला फोटो लावा आणि त्या खाली लिहा May I help you..
In your service - xyz. मित्रानो तुम्ही पास झाल्याबरोबर तुमच्या मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या पदाचा गर्व अहंकार येऊ देऊ नका. लोकांनी तुम्हाला सलाम करण्यापेक्षा तुमच्याकडे येणाऱ्या माणसांना तुम्ही लोकसेवक म्हणून स्वतः सलाम करा. कारण पूर्वी पारतंत्र्यात लोक लिनदिन हीन होऊन या पदांना सलाम करत होते गुलामासारखे राबत होते ती परिस्थिती आता नाही कारण आता भारत हा देश स्वतंत्र आणि सार्वभौम झाला आहे.ब्रिटिशांची किंवा कुठल्याही राजवटीची गुलामगिरी आता नसल्यामुळे तुम्ही राजवटीचे क्रूर अधिकारी न होता नम्रतापूर्वक स्मित हास्य करून लोकांच्या समस्या सोडवा कारण तुम्हाला देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा तुम्ही परीक्षा पास झाला म्हणून नव्हे तर तुम्हाला अधिकाधिक लोकांची सेवा कमी वेळात, सुविधाजनक परिस्थितीत करता यावी यासाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत हे नेहमी ध्यानात ठेवा. तुमच्या ठाई रुबाब असावा पण तो रयतेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या छत्रपती शिवरायांसारखा जे सर्वसामान्य रयतेचा, कष्ट करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मानवतावादी दृष्टिकोनातून सदैव विचार करत असत.
तुमची लायकी तुमच्या ज्ञानावर आणि तुम्ही जगात असलेल्या मानवतावादी विचारांवर असते ती तुमच्या पदांवर नसते हे लक्षात ठेवा. पद ही संधी आहे तिचं न्याय मार्गाने लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने सोनं करा. तुमच्या चुकीच्या वागण्या बोलण्यामुळे लोकांना आज लॉर्ड एक्टन यांच एक वाक्य आठवायला नको जात ते म्हणतात
"Power corrupts and absolute power corrupt absolutely."
- तुमचा आजोबा तुमचा सुलभक
शैलेशकमल
"May I help you?" should be your attitude and duty as the most powerful servant of society for humanity.
चित्तोड (राजस्थान) चे माजी कलेक्टर IAS अधिकारी डॉ. समित शर्मा यांची आपल्या 'सत्यमेव जयते' या प्रेरणादायी कार्यक्रमात आमिर खान यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग. साभार🙏 Courtesy and Special Thanks 🙏 Satyamev Jayate 👇
Wednesday, 6 December 2023
शिक्षकांनी न शिकवता मुल हे कुठून शिकले ?
आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी परिपाठात भयंकर अनुभव आला.
विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या विनम्र अभिवादनानंतर
विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना परिपाठात प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीला किरकोळ अपघात झाल्यास तुम्ही काय काय उपाययोजना कराल ?कशा पद्धतीने मदत कराल?
सर्वसाधारणपणे अशा वेळेला प्रथमोपचार करू, अपघात झालेल्याला धीर देऊ,उपचारांसाठी दवाखान्यात नेऊ वगैरे वगैरे अशी उत्तरे येत असतात परंतु आज भयंकर उत्तर आलं. उत्तर असं होतं की, आम्ही अपघात झालेल्या व्यक्तीला एक लोटा जल अर्पण करायला सांगू म्हणजे तो लवकर बरा होईल आणि त्याच्या सर्व समस्या दूर होतील हे उत्तर ऐकून शिक्षक एकमेकांकडे बघू लागले आणि त्याच वेळेला वातावरण ढगाळ होत मी आकाशाकडे बघत होतो आकाशात नको असलेल्या ढगांच्या गर्दीतून लख्ख सूर्यप्रकाशासाठी ...
विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जरी शिकवला जात असला तरी विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,विविध माध्यमावरील भाकड कथांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो. कारण विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो..
विद्यार्थ्यांसह समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करावे लागणार आहे ,त्यासाठी राज्यघटनेनुसार कायद्याच मोठ पाठबळ आपल्याला आहे हे विसरता कामा नये.आपली भारतीय राज्यघटना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत अपेक्षा करते (There is one duty that is unique to India under Article 51A (h) that encourages the citizen to “develop scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform".)
*'वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधकबुद्धी,सुधारणावाद मानवतावाद याचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.* वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी शिक्षकांची आणि सर्वच व्यवस्थांची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य असलं तरी सामुदायिक मानवतावाद आणि विवेकवादास ते बाधक होता कामा नये...
म्हणून प्रत्येक व्यक्तीने आणि सर्वच माध्यमांनी जबाबदारीने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे भान ठेवले पाहिजे आणि अवैज्ञानिक,अंधश्रद्धा वाढवणाऱ्या बाबींचा प्रचार प्रसार आणि उदात्तीकरण न करता विरोध केला पाहिजे.
Sunday, 19 November 2023
आपण हरलो पण काय शिकलो ?
प्रिय नातवांनो आज आपण विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला.खेळात हरलात तर हरकत नाही पण थोतांड असणाऱ्या अवैज्ञानिक भाकितांवर आणि अंधश्रद्धेवर मात्र विश्वास ठेवू नका.हरण्याच्या निमित्ताने आपण एवढे जरी शिकलो तरी पुरे आहे विज्ञान नसणाऱ्या अवैज्ञानिक खोटे भविष्य सांगणार्यांवर अति विश्वास ठेवू नका.विश्वगुरू असणारा आपला भारतच अंतिम सामना जिंकेल असं नामवंत म्हणवणारे ज्योतिषी भारतीय संघाची आणि खेळाडूंच्या कुंडल्या काढून दावे करत होते आज ते सर्व दावे आणि त्यांनी मांडलेल्या कुंडलीच्या माध्यमातून त्यांचे भविष्य भाकीत देखील खोटं ठरल आहे म्हणून आपला भारतीय संघ हरला तर हरकत नाही या निमित्ताने भारतीयांना हे कळेल की अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही ज्यामुळे अंधश्रद्धा वाढते.
Sunday, 5 November 2023
Subscribe to:
Posts (Atom)
.jpeg)










