Tuesday, 26 November 2024

 संविधान दिन कार्यक्रमाचा अहवाल.

दिनांक: 26 नोव्हेंबर 2024

स्थळ: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव

26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रेेमलाल डिगंबर पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्री.विश्वास पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली.

शिक्षिका सौ. वंदना पाटील यांनी संविधानातील पायाभूत मूल्ये – स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करण्याचे व नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात  विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अभिमान निर्माण झाला.

मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संविधानाच्या तत्वांना जीवनात कसे अमलात आणायचे याबाबत मार्गदर्शन केले. श्री. भटू पाटील सरांनी संविधान दिनाच्या निमित्ताने देशाच्या एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु.दिव्या बेलदार यांनी  केले.



Tuesday, 5 November 2024

आज सहजच फ्रेड्रिक्स डग्लस यांचे एक वाक्य आठवले, ते म्हणतात...

 स्पोकन इंग्लिशच्या माझ्या विद्यार्थ्यांनो

 आज सहजच फ्रेड्रिक्स डग्लस यांचे एक वाक्य आठवले, ते म्हणतात...

Knowledge makes a man unfit to be a slave.

ज्ञान मनुष्याला गुलाम होण्यास अयोग्य बनवते. या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्ञान ही अशी शक्ती आहे जी मनुष्याला त्याच्या स्वातंत्र्याची आणि हक्कांची जाणीव करून देते.अज्ञानाने भय जन्माला येते भीतीमुळे अंधविश्वास जन्म घेतो अंधविश्वासामुळे अंधभक्ती जन्माला येते अंध भक्तीमुळे व्यक्तीचा विवेकशून्य होतो आणि विवेक शून्य झालेली व्यक्ती मानसिक गुलाम होते. ज्ञानामुळे तो गुलामीचे बंधन स्वीकारत नाही, सत्य जाणून घेतो चिकित्सा करायला शिकतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला सत्य आणि न्यायाचा मार्ग सापडतो. गुलामी म्हणजे स्वातंत्र्याची वंचना होणे, पण जेव्हा मनुष्य शिक्षित आणि जागरूक होतो, तेव्हा त्याच्यात आत्मनिर्भरता आणि स्वाभिमान निर्माण होतो. त्यामुळे, ज्ञान माणसाला स्वातंत्र्य आणि सन्मान यासाठी लढण्यास प्रेरित करते, आणि त्याला गुलाम होऊ देत नाही.

माझ्या विद्यार्थ्यांनो इंग्रजीचे वाक्य पाठ करू नका त्याचा अर्थ समजून घ्या कारण एखादी भाषा शिकत असताना त्यासोबतच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणाऱ्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत नाहीतर शिक्षण हे फक्त पुस्तकी आणि परीक्षेत गुण मिळवण्यापुरतेच मर्यादित राहते.











Video Courtesy and thanks to Navbharat Times 

Monday, 21 October 2024

मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात.

मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात.
"धर्म ही अफूची गोळी आहे" असं सांगणाऱ्या जगप्रसिद्ध विचारवंत,तत्त्वज्ञ, लेखक, सामाजिक सिद्धांतकार आणि अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्सची आठवण व्हावी असे प्रसंग सातत्याने घडत असतातच. 
दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करणे, आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांच्या घरांवर दगडफेक करणे, लहान बालकांचा अधिकार नाकारणे हा कुठल्या धर्माचा भाग असू शकतो? खरं पाहता असे वागणे हाच मुळी एक अधर्म आहे ,जो देवालाही कदापि मान्य होऊ शकत नाही. सदर लेख हा ब्रेन वॉश करण्यासाठी नसून मुळातच ब्रेन असण्याची किंवा नसण्याची मीमांसा करणारा आहे...

माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...
मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात. कारण मैदानी खेळ हे आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
नैसर्गिक संकटात,आपत्कालीन परिस्थितीत ओपन स्पेस मोकळ्या असल्यास उपयोगी ठरतात. याखेरीज ओपन स्पेस आणि मोफत खेळाच्या मैदानांचा उपयोग मुलांच्या शारीरिक,बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे, अन्यथा ही मुलं चौका चौकातील कट्ट्यांवर टवाळक्या करताना दिसू शकतात किंवा मोबाईल मध्ये आर्थिक आमिष दाखवणारे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यास बाधक खेळ खेळू शकतात.

ओपन स्पेसचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकासाठी एक बाग म्हणून आणि मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण म्हणून असले पाहिजे कारण खाजगी जागेत क्वचितच कोणी मुलांना मोफत खेळू देईल,काही ठिकाणी तासांवर पैसे देऊन खेळण्याची सोय आहे, असे असले तरी मुलांच्या खेळण्याच्या हक्काच्या जागेवर जर इतर कुठलाही प्रकारच काही उभारल जात असेल तर मग मुलांनी कुठे खेळायला जावे ? कारण खिशात पैसे नसतानां  देखील मैदानावर घाम गाळता आला पाहिजे, म्हणजे शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि मैदानावरील सांघिक खेळामुळे संघभावनाही वाढीस लागेल.तुमच्या परिसरातील ओपन स्पेस फक्त मुलांना खेळण्यासाठी आणि गरज़ वाटल्यास शांतपणे अभ्यासासाठी पूर्णवेळ उपलब्ध आहेत का ?
- शैलेशकमल.


Friday, 18 October 2024

 

भारतात डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग वनस्पतीला अज्ञानवश 'ब्रह्मकमळ' असे संबोधले जाते. मुळात या दोन्ही वनस्पती भिन्न भिन्न असून यांची कुळे पण वेगवेगळी आहेत.

सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे फूल हिमालयातील उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वाहायची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.


ब्रह्मकमळ हे एक अत्यंत सुंदर आणि दुर्लभ फूल आहे, ज्याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी आहेत:

१. दुर्लभ फुलांचे प्रतीक: ब्रह्मकमळ फुलणे एक अत्यंत दुर्मिळ घटना असते. हे फूल वर्षातून फक्त एकदाच फुलते आणि रात्रीच्या वेळीच फुलते. सूर्योदयापूर्वी हे फुल मावळते, ज्यामुळे अनेकांना ते पाहणे शक्य होत नाही.

२. सांस्कृतिक महत्त्व: ब्रह्मकमळाचे नाव 'ब्रह्मदेव' या हिंदू देवतेच्या नावावरून आले आहे. हे फूल अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की हे फूल देवांना प्रिय आहे आणि शुभ संकेत मानला जातो.

३. औषधी गुणधर्म: या फुलाचे विविध भाग औषधी गुणधर्मांसाठी वापरले जातात. विशेषतः हिमालयातील ब्रह्मकमळ वनस्पतीला आरोग्यवर्धक मानले जाते. ती औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते, जी वेदनाशामक आणि शरीरशक्तिवर्धक म्हणून ओळखली जाते.

४. हिमालयातील वनस्पती: ब्रह्मकमळ मुख्यतः हिमालयातील ३,००० ते ५,००० मीटर उंचीवर सापडते. तिथल्या थंड आणि विशिष्ट वातावरणातच ही वनस्पती तग धरते.

५. फुलण्याची प्रक्रिया: ब्रह्मकमळाची एक खास गोष्ट म्हणजे त्याचे फुलणे अत्यंत संथपणे घडते. रात्रीच्या वेळी, हे फूल हळूहळू उमलत जाते, ज्यामुळे लोक त्याचा फुलण्याचा सोहळा पाहण्यासाठी धीर धरतात.

६. सौंदर्य आणि सुगंध: हे फूल केवळ सुंदरच नसते, तर त्याला एक सुखद सुगंध असतो, जो वातावरणात प्रसन्नता आणतो. त्याचे पांढरे व शुभ्र फूल अत्यंत आकर्षक दिसते.

 ब्रह्मकमळाचे अनोखेपण आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करते.



Thursday, 17 October 2024



आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव

दिनांक: 17 ऑक्टोबर 2024

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. विश्वास पाटील यांनी समर्थपणे केले.

उज्वल भारतीय परंपरेतील आद्यकवी वाल्मिकी यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ, वंदना पाटील, आणि दिव्या कुमावत यांनी विद्यार्थ्यांना वाल्मिकीजींच्या जीवनपटाची माहिती दिली. आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या महान कार्याचा सन्मान करताना भारतीय परंपरेतील दाखल्यांचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना अवगत करून दिले.




Tuesday, 15 October 2024

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे जागतिक अन्न दिवस साजरा 

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे 16 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील यांनी भूषविले.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु. दिव्या कुमावत यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अन्न सुरक्षा आणि पोषणाविषयी माहिती देऊन करण्यात आली. यावेळी शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्व तसेच अन्नाची नासाडी टाळण्याचे महत्व पटवून दिले. अन्ना खाण्याची योग्य पद्धत आणि पोषणतत्वांबाबत श्रीमती वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अन्नाचे महत्व आणि पोषण यावर भाषणे केली.

 मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अन्न हे जीवनाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांनी मुलांना नियमित आणि संतुलित आहाराचे महत्व पटवून दिले व अन्नाची किंमत समजून घेण्याचे आवाहन केले. 
 शेवटी, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून अन्नाची नासाडी कशी टाळावी यावर शपथ घेतली. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने शाळेत अन्न विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्नाबद्दल आदर निर्माण झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.