Saturday, 13 September 2025

 लोककलेचा दैदिप्यमान वारसा असणाऱ्या मराठी मातेला आणि मातीला सलाम म्हणजे The Folk आख्यान. यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा, पारंपारिक वाद्य आणि एकूणच पारंपारिक संगीत विद्यार्थ्यांना माहीत व्हावं म्हणून कवायतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न....

 शरीरासोबतच मनाचा आणि आनंददायी अनुभवांची मांडणी तुम्हाला नक्की आवडेल. शालेय कवायतीच्या कार्यक्रमात अशा लोककला-आधारित आख्यानाचा समावेश केल्याने अनेक सकारात्मक परिणाम घडतात.

• सांस्कृतिक जाणीव निर्माण होते: विद्यार्थी आपल्या मातृभूमीच्या संस्कृतीशी जोडले जातात, परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो.

• शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक समाधान: कवायतीत हालचाल, लय, ताल आणि टीमवर्क यामुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त होतात.

• कलात्मक अभिव्यक्तीचा विकास: नृत्य, गाणी, वाद्य यांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःची अभिव्यक्ती करण्याची संधी मिळते.

• सामूहिकता आणि शिस्त: गटाने आख्यान सादर करताना विद्यार्थ्यांना शिस्त, समन्वय, सहकार्य आणि नेतृत्वगुण शिकायला मिळतात.

• आनंददायी अनुभव: पारंपरिक संगीताची लय, वाद्यांची गूंज, पोशाखांचे सौंदर्य आणि नृत्याची धडधड हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

थोडक्यात, शालेय कवायतीच्या माध्यमातून लोककलेचा आनंददायी अनुभव सादर केल्याने अनेक सकारात्मक परिणाम घडतात.

• सांस्कृतिक जाणीव निर्माण होते: विद्यार्थी आपल्या मातृभूमीच्या संस्कृतीशी जोडले जातात, परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो.

• शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक समाधान: कवायतीत हालचाल, लय, ताल आणि टीमवर्क यामुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त होतात.

• कलात्मक अभिव्यक्तीचा विकास: नृत्य, गाणी, वाद्य यांद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःची अभिव्यक्ती करण्याची संधी मिळते.

सामूहिकता आणि शिस्त: गटाने सादर करतांना विद्यार्थ्यांना शिस्त, समन्वय, सहकार्य आणि नेतृत्वगुण शिकायला मिळतात.

आनंददायी अनुभव: पारंपरिक संगीताची लय, वाद्यांची गूंज, गणवेशाचे सौंदर्य आणि नृत्याची धडधड हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊया, त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण घडवून आपल्या संस्कृतीची नाळ भावी पिढ्यांशी घट्ट बांधूया.

Thursday, 11 September 2025

स्व.विजय हिम्मतराव चौधरी यांच्या कुटुंबाचे दातृत्व.

स्व.विजय हिम्मतराव चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी,ता .धरणगाव जि जळगाव.येथे आज शाळेचे दिवंगत शिक्षक विजय हिम्मतराव चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्व.विजय चौधरी सर यांच्या कुटुंबीयांतर्फे विजय सरांच्या जन्मदिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामागील हेतू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होऊन त्यांच्या शिक्षणातील आवड वाढवणे हा होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री विश्वास पाटील यांनी व सूत्रसंचालन शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी दिवंगत शिक्षक विजय चौधरी यांच्या शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमा संबंधित आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री भटू पाटील सर यांनी आठवणींना उजाळा करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छायाताई घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात सांगितले की, पितृपक्षात श्राद्ध केले जाते त्याच भावनेतून कर्तव्यभावनेने समाजासाठी योगदान देणे अधिक महत्त्वाचे आहे आणि याच भावनेतून विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देऊन शिक्षकांच्या कार्याची आठवण करून देणे ही एक प्रेरणादायी कृती आहे असे प्रतिपादन केले.

 विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या सरांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेल्या शालोपयोगी वस्तूंच्या उपयोगाने शैक्षणिक स्वप्नांच्या पूर्ततेचा संकल्प केला. 

स्व.विजय चौधरींचे वडील हिंमतराव बोमटू चौधरी आणि आई सरलाबाई हिंमतराव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा पाठवल्या. याप्रसंगी विजय चौधरी सरांच्या पत्नी पल्लवी विजय चौधरी, मुलगा मयूर (साई)विजय चौधरी, मुलगी श्रद्धा विजय चौधरी, भाऊ निलेश हिंमतराव चौधरी, वहिनी योगिता निलेश चौधरी, विजय चौधरी सरांचे शालक हर्षल‌ भागवत चौधरी उपस्थित होते.

हा उपक्रम शाळेसाठी हृदयस्पर्शी आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना विजय सरांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरला.

Miss You विजू भैय्या.....


Tuesday, 9 September 2025

 Listen and Follow Instructions

Class: Primary (Std.1,2. Or we can use it for any classes )

Subject: English (Vocabulary through Real Objects & Pictures)

Time: 40 minutes

Topic: Names of Common Objects

1. Warm-up (5 min)

Teacher’s Activity:

विद्यार्थ्यांशी थोडं इंग्रजी बोलणं सुरू करणे.

“Good morning, students!”

“How are you today?”

विद्यार्थ्यांना म्हणणे: “Today we will learn English words from our classroom and pictures.”

Students’ Activity:

“Good morning, teacher!”

“I am fine, thank you.”

Expected Response: विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल.

2. Real Object Activity (10 min)

Activity 1: Point and Say

Teacher shows chalk and says: “This is chalk. Say: chalk.”

Students repeat: “Chalk.”

Activity 2: Touch and Tell

Teacher: “Touch the blackboard.”

Students touch and say: “Blackboard.”

Activity 3: What is Missing?

Teacher keeps Pen, Book, Eraser on table. Then hides one object.

Teacher asks: “What is missing?”

Students: “The eraser is missing.”

3. Picture Reading Activity (15 min)

Activity 4: What is this?

Teacher shows flashcard of apple.

Teacher: “What is this?”

Students: “This is an apple.”

Activity 5: Guess the Picture

Teacher half covers a picture of bus.

Teacher: “Guess, what is this?”

Students: “It is a bus.”

Activity 6: Find and Match

Teacher pastes pictures of Dog, Cat, Ball on board. Below them writes words.

Teacher: “Match the word with the picture.”

Students draw lines or come forward to match.

Activity 7: Describe the Picture

Teacher shows a Garden picture.

Teacher: “What can you see?”

Students: “I see flowers. I see trees. I see children.”

4. Practice & Reinforcement (5 min)

Teacher’s Activity:

Quick revision through questions.

“Show me the book.”

“What is this?” (shows a fruit picture).

“Touch the window.”

Students’ Activity:

Respond with correct action/word.

Expected Response: विद्यार्थी शिकलेले शब्द आत्मविश्वासाने सांगतील.

5. Closing (5 min)

Teacher’s Activity:

“Good job, students! Today you learned many English words.”

Homework: “Draw 3 objects at home and write their English names.”

Students’ Activity:

Clap and repeat after teacher: “Goodbye, teacher!”




Sunday, 31 August 2025

कुठून...? The Folk आख्यानाच्या आख्यानातून...

थाट हा जुना खेळ हा नवा कुठून...? The Folk आख्यानाच्या आख्यानातून...
"थाट हा जुना खेळ हा नवा" असं म्हणत आपलीच लोककला माहीत नसणाऱ्या आणि विसरू पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अस्सल झणझणीत गावरान अंजन घालणारा तरुणांचा कार्यक्रम म्हणजेच The Folk आख्यान. 

 दर कोसाला वेगवेगळ्या भाषा आणि लेहजांनी समृद्ध असलेल्या मराठी मुलुखात महाराष्ट्राच्या लोकधारेच्या लोकगीतांची,पारंपारिक वाद्यांची ओळख नवीन पिढीतील तरुण The Folk आख्यानाच्या माध्यमातून करत आहेत. हल्ली नवीन पिढीवर सातत्याने टीका होताना आपण पाहतो परंतु नवीन पिढीत प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहेत  जुन्या पिढ्यांसह सर्वच पिढ्यांनी मात्र स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे आणणारा दैदिप्यमान इतिहास फुले,शाहू,आंबेडकर यांच्या प्रबोधनातून हस्तांतरित करत राहावा. हेे सर्व होत असताना सर्व वयोगटाच्या मराठी माणसांना जोडणारा आपल्या सर्वांच्या हृदयातील महत्त्वाचा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं स्पंदन आणि रुबाब.
 The Folk आख्यानाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच हे अनुभवलच पाहिजे. विशेषतः हा कार्यक्रम लहान मुलांना दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.मराठी लोकसंगीताची श्रीमंती अधोरेखित करणारं मराठी मातेचं आणि मातीचं आख्यान नक्की बघाव सतत बघत राहावं असंच आहे.
अंगावर शहारे आणणाऱ्या, रक्तात सळसळ निर्माण करणाऱ्या ,बेधुंद मनाच्या लहरींवर स्वार करणाऱ्या एकूणच निसर्गानं मानवाला दिलेल्या सर्व भावभावनांच्या क्षणांचे वाटेकरी होण्यासाठी The Folk आख्यान अगदी समर्पक आहे.
यातील सर्व गाणी, आणि अख्यानाच लेखन, सूत्रसंचालन युवा लेखक ईश्वर अंधारे (लमाणबंधू) यांनी लिहिलेली असून कंपोझिंग, संगीत आहे राऊत आणि विजय कापसे यांचं मुळात आख्यानाची ही संकल्पनाच हर्ष आणि विजय यांची आहे. तरुणांच्या या टीमनं स्वतःच अस्सल, युनिक अस केल अफाट आख्यान मांडलं आहे. कुठेही पूर्वी कोणी दुसऱ्याने गायलेल, संगीतबद्ध केलेल गाणं नाही सगळं काही अगदी Self Made. आख्यानाला ८० पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून संगीताचा साज शृंगार उपस्थिथितांना बेफाम होऊन ठेका धरायला लावतो.विशेष बाब म्हणजे या सर्व कलााावंत तरुणांचं वय कमी आहे सरासरी फक्त २५ असेल, या स्टेजवर जरी २५ कलावंत दिसत असले तरी बॅकस्टेजचे सहकारी मिळून एकूण ४० तरुण कलावंत आहेत. यांचा प्रत्येकच शो हा घोषित झाल्यावर लगेचच हाउसफुल होतो.

 आपली लोककला किती समृद्ध आणि प्रचंड उत्साह, उमेद देणारी ऊर्जा आहे हे अनुभवण्यास मिळेल. या कार्यक्रमाचे गारुड आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील असा काहीसा अनुभव घेऊया.The Folk आख्यानाच्या उत्साहित तरुणांना साद घालूया ही साद केवळ तरुणांना नाही तर महाराष्ट्राच्या लोकधारीलाच असेल.

 पुण्यात पुस्तक महोत्सवात The Folk Akhyan च्या टीमने विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केले. या टीमचा युवा शाहीर चंद्रकांत माने यांच्या सुमधुर आवाजात गायलेले प्रेरणादायी गीत "शिवबा राजं छत्रपती झालं ग" तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतं. या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच आणि त्यागाच उत्तम वर्णन आहे. चला तर मग तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय‌ म्हणत स्फूर्तीदायी गीत (घाटोळी) ऐकूया !
✍️ शैलेशकमल,जळगाव.


🙏Special Thanks Amazing Memories
Fergusson College Pune.🙏
And factsforindia
घाटोळी लोकगीताचा महाविद्यालयीन तरुणाईस सोबतचा पूर्ण व्हिडिओ पहा दोन्ही चॅनेल सबस्क्राईब  करा. 👇





Thursday, 21 August 2025

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी ता. धरणगाव, जि. जळगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रामुख्याने “समावेशक भविष्यासाठी वृद्धांच्या आवाजांना सक्षम बनवणे” हा संदेश अधोरेखित करण्यात आला. शाळेचे शिक्षक श्री. भटू पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना आजी-आजोबांविषयी जिव्हाळा व आपुलकी निर्माण करणारी एक बोधकथा सांगितली. या बोधकथेतून वृद्धांचे अनुभव, ज्ञान व त्यांच्या मार्गदर्शनाचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून देण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रश्नोत्तरांचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे आपल्या आयुष्यातील स्थान, त्यांच्याशी असलेले नाते व त्यांच्यावरील कृतज्ञता अधिक दृढ केली.

शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील ज्येष्ठ शिक्षिका वंदना ताई पाटील  श्री विश्वास पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेश शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती छायाताई घुगे यांनी केले

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच एकंदरीत शाळेचा महत्त्वाचा वाटा राहील यावर भर देण्यात आला. यासाठी शाळा स्तरावर देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वृद्धांबद्दल सन्मान, आपुलकी व कृतज्ञतेच्या भावना वृद्धिंगत झाल्या. अशा प्रकारे शाळेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन शैक्षणिक व मूल्याधिष्ठित वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


Wednesday, 20 August 2025

 आटपाट नगर होते अर्थातच त्या नगरात एक राजा होता. 

एके दिवशी राजा दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यासाठी निघाला राजासोबत प्रधानाचे जाणंही आवश्यक असल्यामुळे दौऱ्यावर राजाने प्रधानाला देखील घेतले आणि राजा शेजारच्या राज्यात दौऱ्यासाठी गेला. जातांना राजाने त्याचा खाजगी सेवक असणाऱ्या म्हणजे राजाचे हातपाय दाबून देणाऱ्या महादू नावाच्या एका शिपाई सेवकाला राजाच्या गृहावर (घरावर) वर लक्ष ठेवायला सांगितले थोडक्यात त्याला राजाच्या स्वतःच्या Home चे guard बनवले  जेणेकरून राजा परत आल्यावर राजाला काही माहिती कळू शकेल. 

परंतु झालं भलतंच होम चा गार्ड असलेल्या शिपायाला आपण राज्याचे प्रमुख आहोत असं वाटू लागले आणि तो प्रत्येक सैनिक आणि राजदरबारातील कर्मचाऱ्यांशी अरेरावीने वागू लागला तो कधीही कोणाशी प्रेमाने बोलत नव्हता तर राज्याचा खूपच मोठा अधिकारी असल्याच्या अविर्भावात प्रत्येकाला दरडावून बोलत असे. त्याच्या अशा वागण्यामुळे, अर्वाच्य भाषेतील अश्लाघ्य,उर्मट वागण्या बोलण्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे देखील मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले होते आणि त्याचा विपरीत परिणाम अर्थातच त्यांच्या कामावर आणि राज्याच्या विकासावर विपरीतपणे झाला होता.

 राजा आपला दौरा आटपून पुन्हा राज्यात हजर झाले. राजा जसे आले तसे राजाने त्याचा सेवक असणाऱ्या महादू सेवक शिपायाने प्रत्येकाची कंप्लेंट करायला सुरुवात केली की, राज्यात कोणीच काम करत नाही असं म्हणत त्याने राजाच्या दरबारातील विशेष सैनिकांना बोलावले आणि राजासमोरच तो त्या दोन्ही सैनिकांना बोलू लागला तो एवढ्यावरच न थांबता त्याने एक चाबूक काढला होता आणि त्याने सांगितलं की राजे हा चाबूक घ्या आणि यांचे सालपटे काढून टाका. नाहीतर मग मीच यांना सरळ करतो. राजा त्या होमगार्ड महादूला म्हणाला अरे "महादू किती बोलतो, केवढ्या तावातवाने बोलतो जरा शांत हो आणि तू तर मलाच आदेश द्यायला निघालास आणि मला न विचारता तू चाबूक देखील आणून ठेवला आहेस या दोन्ही शिपायांना मारण्यासाठी." यावर महादू पुन्हा महाराजांनाच म्हणाला "महाराज हे दोनच नाही आणखी बरेच आहे आणि हो या दासीला पण चांगल चापकांनी फोडून काढा."महाराज महादू सेवकास म्हणाले ,"अरे पण मी तुला महिला कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं नव्हतं तरी देखील तू ते काम केलस. अरे महादू तोंड धु, केवढा बोलतोस अक्षरशः फेस आला तुझ्या तोंडाला.

अरे तू मलाच आदेश देतोय यांना शिक्षा करण्याची. मला तर एक वेळ वाटायला लागलं की मी या राज्याचा राजा आहे की तू? खरं म्हणजे तू पोलीस शिपाई देखील नाहीस तू केवळ एक सेवक आहेस.तुझा गार्डचा आणि शिपायाचा ड्रेस सारखा असल्यामुळे तुला तसा भास होतो आणि त्या भासातून काहीही वागून जातोय."

राजाने असे ठणकावून सांगितल्यावर देखील महादू पुन्हा दोन दिवसांनी राजाकडे गेला. आणि त्या शिपायांच्या आणि दासीच्या शिक्षा विषयी राजाला आठवण करून देऊ लागला तेव्हा राजा म्हणाले,"अरे मी दोन दिवसापासून बघतोय ही सगळी मंडळी तर खूप छान काम करत आहेत,अरे महादू मी ज्यावेळेला राज्याचा नेतृत्व करतो त्यावेळेला त्यांच्यावर हुकूम गाजवण्यासाठी नाही तर त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना कामात मदत करण्यासाठी नेतृत्व करतो त्यांना जीव लावतो म्हणून ते देखील मला जीव लावतात आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते पण हा मानवी स्वभाव आहे थोड्या बहुत चुका आपण सारेच करतो रे, म्हणून काय प्रत्येक वेळेला चाबूक हातात घ्यायचा असं नसतं. अरे आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करतो पण शिवाजी महाराजांचा नेतृत्वाचा हा गुण आपण घ्यायला पाहिजे की आपण आपल्या सोबत काम करणारा स्वराज्याचा प्रत्येक शिलेदार आपल्या सोबत काम करणार आहे असं मानलं पाहिजे आपल्या हाताखाली काम करणार आहे असं मानलं तर मग आपण हुकुमशहा होतो आणि शिवरायांनी हेच टाळलं सहकाऱ्यांसोबत आपल्या ताटात जेऊ घातलं त्यांना जीव लावला,प्रेम लावलं त्यामुळे ती स्वराज्यासाठी मरायला देखील तयार झाली.

अरे महाद्या , मी तुला दोन दिवसासाठी गृह शिपाई काय बनवलं तू तर हुकुमशहा झाला नेतृत्व करण्याची तुझी मुळीक क्षमता नाही हे माझ्या उशिरा का होईना लक्षात आले."

आता राजा दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेल्यावर त्या दुसऱ्या राज्यात त्याला काय अनुभव आला ते पुढच्या कथेत अवश्य वाचा.   ......................